पवईतील साकीविहार रोड परिसरातील एका घरात काम करण्यासाठी ॲपच्या माध्यमातून आलेल्या महिला कामगाराने घरात हात साफ केला आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार स्वप्नील लघाटे हे साकीविहार परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात. २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ११:४० वाजताच्या सुमारास तक्रारदाराच्या पत्नीने […]


