नवीन पूल बांधताना त्याचे रुंदीकरण करत पुलाची लांबी ३३.६ मीटर तर रुंदी ९.३ मीटर करण्यात येणार आहे. पवईत मोरारजी नगर परिसरात मिठी नदीवर असलेला जुना पूल पाडून आता नवीन पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. आधीच्या पुलाची दुरावस्था झाल्याने नवीन पूल बांधला जाणार आहे. यासाठी निविदेद्वारे एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन […]
Tag Archives | Mithi River
पवईतील प्रकल्प स्थळाजवळ दिसले मासे, ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ प्रकल्पाला यश
नदीचा नाला झालेल्या मिठी नदीमध्ये मासे दिसणे म्हणजे एक दुर्मिळ बाब. मात्र त्याच मिठी नदीत आता थोड्याफार प्रमाणात का होईना मासे दिसू लागले आहेत. ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ या प्रकल्पाद्वारे मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता वृद्धिंगत करून ते पाणी पुन्हा मिठी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे प्रकल्प परिसरातील नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारत त्यात आता […]
पवई – आरे जोडणारा मिठीनदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला, आमदार रमेश लटके यांच्या हस्ते लोकार्पण
वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या या पुलाच्या निर्मितीचे काम अवघ्या ५ महिन्यात आणि पावसाळापूर्व पूर्ण करत नागरिकांचा ज्वलंत प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पवई आणि आरे कॉलनीला जोडणारा मिठीनदीवरील नवीन पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. स्थानिक आमदार रमेश लटके यांच्या हस्ते या पुलाचे उदघाटन आज, बुधवार, २ जूनला पार पडले. यावेळी विधानसभा संघटक, उपविभागप्रमुख […]
पवईत पुलाचा भाग कोसळला; आरेकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद
पूल धोकादायक असल्याने आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून, प्रवाशांनी जेवीएलआर मार्गे प्रवास करण्याचे आवाहन पालिका आणि वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. पवईतील आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर असणारा मिठी नदीवरील पुलाचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी घडली. विशेष म्हणजे २ वर्षापूर्वी हा पूल धोकादायक घोषित करण्यात आला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव […]
पवई तलावावर जलपर्णींचे साम्राज्य; सहा महिन्यांपासून स्वच्छता नाही
कंत्राटदाराची नेमणूक करणे बाकी असल्यामुळे मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळ असणाऱ्या पवई तलावाला सहा महिन्यांपासून साफ केले गेले नाही. जर लवकरात लवकर जलपर्णीना काढून टाकले नाही तर लवकरच तलावाचा संपूर्ण पृष्ठभाग व्यापला जाईल अशी चिंता पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. मुंबईचे वैभव असणारा पवई तलाव दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची पाणी साठवण्याची क्षमता हळू हळू […]
पवई तलावाची स्वच्छता जागतिकस्तरावर; भारतातील पहिलाच प्रयोग
परदेशातील नद्या, तलावे इतके स्वच्छ असतात की त्यांच्या सौंदर्याची कुणालाही भुरळ पडते. भारतातील नद्या आणि तलाव गटारगंगा झाल्या आहेत. जे पाहता मुंबई महानगर पालिकेने प्रदूषित मिठी नदी आणि पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच दासून इंटरनॅशनल या कॅनेडियन कंपनीसोबत एक करार करण्यात येणार आहे. पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिका कॅनडातील […]