पहिल्याच पावसात पवईच्या नालेसफाईची पोलखोल View this post on Instagram A post shared by AVARTAN POWAI (@avartanpowai) पावसाळ्याच्या सुरुवातीला नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्व कामे पूर्ण झाल्याचा गाजावाजा करणाऱ्या पालिका आणि लोकप्रतिनिधींची पहिल्याच पावसात पोलखोल होत असते. पवईमध्ये देखील सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे पालिका आणि लोक प्रतिनिधींनी केलेल्या कामांचे पितळ उघडे पडलेले पाहायला मिळाले. दोन दिवस […]
Tag Archives | Mumbai Rain
पवई कैलासनगर भागात दरड कोसळली
मंगळवारी मुंबईसह उपनगरात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पवई कैलासनगर भागात दरड कोसळण्याची घटना घडली. मंगळवार दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने नागरिकांची कसलीही हानी झाली नाही. दरड कोसळल्याने मोठे दगड रस्त्यात आल्याने रस्ता बंद झाला होता. शिवसेना माजी नगरसेविका सौ चंद्रावती मोरे यांना कळताच त्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्ता साफ […]
पवईत भूस्खलन, गाड्यांचे नुकसान
भूस्खलन झाल्याने इमारतीची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना पवईमध्ये शुक्रवार सकाळी घडली. सुदैवाने येथे कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची नोंद झाली नसून, काही गाड्यांचे मात्र नुकसान झाले आहे. पवईतील मुंबई महानगरपालिकेच्या प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी भूस्खलन झाल्याने सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना घडली. जवळपास १० मीटरपर्यंत जमीन धसल्याची घटना घडली आहे. कोरोना रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी येथे कोविड केअर सेंटर (सिसिसि) […]
मुसळधार : पवई, चांदिवली भागात काय घडले?
विहार तलाव भरला मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असलेला विहार तलाव बुधवारी रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी पूर्ण भरून वाहू लागला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. मुंबई, ठाणे भागात दमदार पाऊस होत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरून वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात […]
उद्या, ५ ऑगस्टला मुंबईतील शाळांना सुट्टी
उद्या ५ ऑगस्टला मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शाळा व कॉलेजना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जे पाहता शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा […]
अस्मानी संकट; पवई, चांदिवली भागात दिवसभरात काय घडले?
उशिराने एन्ट्री घेतलेल्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांची चांगलीच धुलाई केली आहे. पावसाने रौद्ररुप धारण केल्याने मुंबईवर अस्मानी संकट कोसळले असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. मुसळधार पावसामुळे साकीनाका, चांदीवली, आयआयटी पवई परिसरातील अनेक घरात पाणी भरल्याने स्थानिकांच्या घरातील किंमती वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबईत गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने जून महिन्यातील […]