सध्या सुरु असणाऱ्या विणीच्या हंगामाची दख़ल घेत पक्ष्यांच्या घरटी संरक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) पवई तलावाच्या साफसफाईला १० जूनपर्यंत विराम दिला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (BNHS) सुरू असलेल्या स्वच्छता उपक्रमांचा पक्ष्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत उपस्थित केलेल्या चिंतेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेने ८ मार्च रोजी तलाव स्वच्छतेचा प्रकल्प सुरू केला असून, ८.४ कोटी रुपये खर्चून […]
