अक्षय भालेराव याला न्याय मिळाला पाहिजे, मागणी घेऊन पवई पोलिस ठाण्यात निवेदन केले सादर नांदेड येथे अक्षय भालेराव या तरुणाने गावात भिम जयंती साजरी केली म्हणून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येच्या घटनेने सर्वत्र आंबेडकरी समाजात आक्रोश दिसून येत असून, निषेध व्यक्त होत आहे. पवईमधील सर्व आंबेडकरी पक्ष संघटना यांनी सोमवारी एकत्रित येत हत्येच्या निषेधार्थ […]
Tag Archives | powai newspaper
पवई चांदिवलीतील दोन माजी नगरसेविका शिंदे गटात
चांदिवली येथील प्रभाग क्रमांक १५६च्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका अश्विनी अशोक माटेकर आणि प्रभाग क्रमांक १२१च्या माजी नगरसेविका चंद्रावती मोरे शिंदे समर्थकात सहभागी झाल्या आहेत. दोघींनीही अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे समर्थकांना धक्का बसल्याचे म्हटले जात असतानाच ठाकरे समर्थकांनी याला संपूर्णपणे नाकारले […]
आमदार फंडातून गोखलेनगर येथे १६ सिटर सार्वजनिक शौचालय
पवईतील गोखलेनगर भागात राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांना पाहता विक्रोळी विधानसभा आमदार सुनील (भाऊ) राऊत यांच्या आमदार निधीतून गोखलेनगर येथील १६ सीटच्या सार्वजनिक शौचालयाच्या नूतनीकरणाचे तसेच तरुण मित्र मंडळच्या कार्यालयाचे काम करण्यात आले आहे. वॉर्ड क्रमांक १२२ शाखाप्रमुख सचिन मदने यांच्या प्रयत्नाने मुं. झो. सु. मं. (म्हाडा) अंतर्गत बांधण्यात आलेल्या या सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण मंगळवारी पार पडले. […]
चांदिवलीतील ४०० कोटींच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या चांदिवली, संघर्षनगर येथील महापालिका रुग्णालयाचा संघर्ष संपला आहे. मंगळवार, ६ जूनला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले. या रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, २५० खाटांचे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधायुक्त १२ मजली रुग्णालय आणि क्रीडा संकुलाचे भूमिजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. या रुग्णालयामुळे पवई, चांदिवलीसह […]
आयआयटी स्टाफ कॉटर्स समोरील रोडच्या सिमेंटीकरण कामाचा नारळ फुटला
चांदिवलीला हिरानंदानी कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या पंचसृष्टी कॉम्प्लेक्स मार्गे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या आयआयटी स्टाफ कॉटर्स रोडच्या सिमेंटीकरण कामाचा नारळ रविवार, ४ जूनला फोडण्यात आला. पंचसृष्टी कॉ. ऑप. हौ. सोसायटी फेडरेशनच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आमदार दिलीप मामा लांडे यांच्या प्रयत्नातून अखेर या कामाला सुरुवात होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आयआयटी स्टाफ कॉटर्स ते भग्तानी क्रीशांग पर्यंतच्या […]
एटीएम चोरी करण्यासाठी हरियाणातून विमानाने मुंबईत; साकीनाक्यातून एकाला अटक
कल्याण पूर्व येथील दोन एटीएम फोडून २७ लाख रुपये चोरणारे कुशल आणि हायटेक चोर आपल्या सहकाऱ्यांना चोरीचे मार्गदर्शन करण्यासाठी हरियाणामधून विमानाने मुंबईत आणि तेथून कल्याणमध्ये आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी साकीनाका येथून एकाला अटक केली आहे. सरफुद्दीन खान असे साकीनाका येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरीच्या प्रकरणात […]
गंमत म्हणून चोरायचा रिक्षा; पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबईत रिक्षाने फिरण्यासाठी आणि गंमत म्हणून रिक्षा चोरी करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला पवई पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. शाहदत हुसेन शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो पवईतील फिल्टरपाडा भागात राहतो. पवईतील विविध भागातून रिक्षा चोरी झाल्याची तक्रार पवई पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. साकीविहार रोड येथून रिक्षा क्रमांक एमएच ०३ बीवाय १५०९ […]
आईशी भांडणाऱ्या वडिलांचा मुलाच्या मारहाणीनंतर मृत्यू
जेवणाच्या कारणावरून आईला मारहाण करत असलेल्या वडिलांना मुलाने केलेल्या मारहाणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याची घटना पवई परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादवी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवून मुलाला अटक केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईच्या आयआयटी परिसरात राहणाऱ्या शिवशरण यांचे १२ जूनला आपल्या पत्नीशी जेवणावरून भांडण सुरु […]
पंचसृष्टी रोड वाहतुकीसाठी खुला; आमदारांकडून पाहणी
चांदिवली – हिरानंदानी परिसराला जोडणाऱ्या पंचसृष्टी रोडचे सिमेंट कॉंक्रीटीकरण काम पूर्ण झाले असून, हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. चांदिवली विधानसभा आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर शुक्रवारपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पंचसृष्टी रोड वर्षानुवर्ष विकासक आणि पालिका यांच्या अनुमतीत अडकून पडल्याने दुरावस्थेत होता. यासंदर्भात आवर्तन पवई आणि स्थानिक […]
ज्येष्ठ नागरिकाचे ई-फ्रॉडने पळवलेले ७४.५ हजार रुपये पोलिसांनी काही तासात दिले परत मिळवून
ऑनलाईन फसवणूकीत एका ज्येष्ठ नागरिकाने गमावलेले ७४,५०० रुपये काही तासातच साकीनाका पोलिसांनी कारवाई करत परत मिळवून दिले आहेत. घर भाड्याने घेण्याच्या बहाण्याने रिअल इस्टेट ब्रोकरच्या माध्यमातून कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून, लष्करात अधिकारी असल्याचे सांगत महिलेने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली होती. पोलिसांच्या या कारवाईची प्रशंसा करताना ज्येष्ठ नागरिक यांनी मुंबई पोलिस दलाची स्कॉटलंड यार्डशी तुलना केली आहे. […]