पवई पोलीस ठाण्याचे (Powai police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) (Senior Police Inspector) बुधन सावंत ३० ऑगस्टला सेवानिवृत्त (retired) झाले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सिताराम सोनावणे (Sr. PI Jitendra Sonavane) यांनी पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्रभर विविध पदांवर काम करणाऱ्या सोनावणे यांनी अकोला किडनी रॅकेट गुन्ह्याच्या तपासाचे नेतृत्व केले होते. गुरुवार, १४ सप्टेंबरला त्यांनी पवई […]
Tag Archives | powai police station
चोरीचे मोबाईल विकणाऱ्या चौघांना अटक
मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये साकीनाका पोलिसांनी मंगळवारी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून सुमारे ५,१०,००० रुपये किंमतीचे ४६ चोरीचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. इम्रान अकबर अली सय्यद (वय ३५, राहणार पवई), दिपक रतनलाल जैस्वाल (वय ३१, रा. पालघर), सुभाष रामपालत बिंद (वय ३४, रा. विक्रोळी) आणि अतिक-उर रहमान चौधरी (वय ४१, रा […]
लग्नास टाळाटाळ करणाऱ्या प्रियकराचा गळा आवळून खून
आपल्या प्रियकरासोबत पवईमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. झोरा शाह (३२) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती गेल्या वर्षाभरापासून रमजान शेख या व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. तिने आपल्या प्रियकराकडे लग्न करण्याची मागणी केली असता तो सातत्यानं टाळाटाळ करत असल्याने महिलेने हे टोकाचे पाऊस उचलले. त्यानंतर […]
हिरानंदानीत ज्वेलरला बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी; सतर्क पोलिस अंमलदारामुळे टळला अनर्थ
गुन्ह्यात वापरलेली होंडा अमेझ कार; चौकटीत गुन्हातील मुख्य सुत्रधार यतीन जैन आणि अमित सिंग एका ज्वेलरला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याची घटना हिरानंदानीतील हायको मॉलसमोर घडत असतानाच पवई पोलीस ठाण्याच्या पोलिस अंमलदार सुनील मसुगडे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मसुगडे यांनी दाखवलेल्या शौर्य आणि सतर्कतेसाठी पोलीस उपायुक्त डॉ महेश्वर रेड्डी यांनी त्यांचे कौतुक करत सन्मान […]
निर्जनस्थळी सोडलेल्या दोन पैकी एक मांजराचे पिल्लू मिळून आले; पवई पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
दोन नवजात मांजरीच्या पिल्लांना एका सोसायटीच्या सफाई कर्मचाऱ्यांने क्रूरपणे आणि बेकायदेशीरपणे निर्जनस्थळी सोडले होते, त्यातील एक मांजर पवई परिसरात मिळून आले आहे. प्राणीप्रेमी नेहा शर्मा यांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात रामचंद्र नावाच्या सफाई कर्मचाऱ्या विरोधात याबाबत गुन्हा नोंद केला होता. “आम्हाला आनंद आहे की दोन हरवलेल्या मांजरीच्या पिल्लांपैकी एक पिल्लू आमच्या लेकहोम सोसायटीच्या जवळ असलेल्या […]
मांजरीच्या पिल्लांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
सोसायटीच्या आवारात काळजी घेत असलेल्या दोन आठवड्यांच्या २ मांजरांच्या पिल्लांना बेकायदेशीररित्या बाहेर निर्जनस्थळी सोडल्याबद्दल पवई स्थित, प्राणीप्रेमी नेहा शर्मा यांनी त्यांच्या सोसायटीचा सफाई कर्मचारी रामचंद्र याच्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार शर्मा या एक मांजर आणि त्याच्या दोन पिल्लांचे पवईतील लेकहोम कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या आवारात काळजी घेत होत्या. “४ सप्टेंबर रोजी, मी […]
कोरोना काळात पोलिसांना मदत करण्यासाठी पवई पोलिसांतर्फे ‘कोविड पोलीस’ नियुक्त
मुंबई पोलिसांवर कोरोना वाढीचा वेग आणि कामे पाहता मोठा तणाव आहे. या तणावाला कमी करण्यासाठी पवई पोलिसांनी एक पर्याय निवडला असून, ‘कोविड पोलिस’ (Covid Police) हा स्वयंसेवक उपक्रम सुरू केला आहे. ज्यामध्ये स्थानिक तरुणांना या कोरोना काळात परिसरात नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केले गेले आहे. यामुळे पोलीस खात्यातील मनुष्यबळावर असणारा ताण कमी होतानाच समाजातील होतकरू आणि […]
विवाह जुळवणाऱ्या साइटवर बनावट प्रोफाइल तयार करून महिलेने २३ लाखाला गंडवले
पवईतील कॉर्पोरेट कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीशी विवाह जुळवणाऱ्या साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे मैत्री करून, वडिलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी पैसे देण्याच्या प्रत्याशावर एका महिलेने २३.४४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय तक्रारदाराने गेल्या वर्षी लग्न जुळवणाऱ्या साईटवर एका महिलेच्या प्रोफाइला […]
माकडाची पवई पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; पाहुणचारानंतर रिक्षाने पवई उद्यानात परतले
नेहमीच तक्रार, कायदा-सुव्यवस्था यांच्या घेऱ्यात अडकलेल्या पोलिसांना विरंगुळा मिळणे अवघडच. मात्र गुरुवारी रात्री पवई पोलिसांनी जवळपास दीड तास हा विरंगुळा अनुभवला. निमित्त होते पोलीस ठाण्यात आलेल्या माकडाचे. पोलीस ठाण्यात आलेल्या या पाहुण्याने तक्रारदार, पोलीस यांच्यासोबत मस्ती करत सर्वांचे मनोरंजन तर केलेच, शिवाय जाताना रिक्षाने ऐटीत परतले. गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एक माकड अचानक पोलीस […]
पवई पोलीस ठाण्यात साजरा झाला तक्रार देण्यासाठी आलेल्या दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस
पवई पोलीस ठाण्यात किरकोळ वादातून तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारांपैकी एका जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस आहे, हे कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच केक मागवून दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करत, दोघांच्यामधील वाद मिटवून समजूत घालून हसतमुखाने परतवले. गुन्हेगारी आणि पोलीस यांचे अतूट नाते असते. पोलीस ठाण्यात केवळ चोरी, मारामारी, खून, बलात्कार, अत्याचार अशा घटनांचीच नोंद होत […]
स्वस्तात गाडी मिळवून देण्याच्या बहाण्याने ठगणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बँकेने जप्त केलेल्या गाडय़ा कमी किमतीत मिळवून देतो सांगून मुंबईकरांना लाखो रुपयांना ठगणाऱ्या भामटय़ाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सुनील किशनचंद जगतीयानी उर्फ मनीष लालवाणी (४१) असे अटक आरोपीचे नाव आहे. सुनीलने मुंबई, ठाणेसह पुणे, दिल्ली आणि हरियाणा भागात अनेकांची फसवणूक केली असून, त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे. हप्ते न-भरल्याने बँकेने जप्त […]
वाहन चोरीच्या गुन्ह्यात फुलेनगरमधून एकाला अटक
@प्रमोद चव्हाण पवई आणि आसपासच्या परिसरातून चार चाकी वाहने चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किशोर वानखेडे (बदलेले नाव) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याचा टूअर्स अंड ट्राव्हल्सचा व्यवसाय असून, त्यासाठी तो या चोरीच्या गाड्या वापरत होता. आतापर्यंत पवई पोलिसांनी त्याच्याकडून इनोव्हा, सुमो आणि स्विफ्ट डीजायर अशा गाड्या हस्तगत केल्या आहेत. […]
पवई पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाला लाच घेताना अटक
पवई पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक (सपोनि) मधुकर पांडुरंग यादव यांना आज दुपारी ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. आरोपीला मदत करण्यासाठी त्यांनी पन्नास हजाराची लाच मागितली होती. तक्रारदार हे पवईतील आयआयटी परिसरात राहतात. राहण्याच्या ठिकाणाच्या जागेवरून त्यांचे व त्यांच्या नातेवाईकामध्ये वादविवाद होता. ज्यावरून नातेवाईकाने पवई पोलीस ठाण्यात तक्रारदार […]
पवई पोलीस ठाण्याच्या पोलीस नायकाला लाच घेताना अटक
रिक्षा चालकाला चरित्र पडताळणीचा दाखला देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्विकारताना पवई पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस नाईक संजय बोडके (३५) याला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पवईतील तुंगागाव येथील एका तरुणाने रिक्षाचा परवाना मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी त्यास चरित्र पडताळणीचा अहवाल सादर करण्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. यासाठी […]