रविराज शिंदे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर बनवण्यात येणाऱ्या चार शौचालयांपैकी, आयआयटी मार्केट येथे पहिले शौचालय बनवण्यात आले आहे. या शौचालयाचे उद्घाटन रविवारी स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले असून, मंजुरीनंतर एक वर्षानंतर अखेर आता ते जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यात उरलेल्या शौचालयांचे काम पूर्ण करून ती जनतेसाठी खुली केली जाणार आहेत. […]




















