दारूच्या नशेत मित्रांनीच केली मित्राची दगडाने ठेचून हत्या

aropi murderवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोरारजीनगर परिसरात एका ३३ वर्षीय युवकाच्या हत्येची घटना समोर आली आहे. मृत इसमाचे नाव सुभाष गोळे असून, दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ भांडणातून मित्रांनीच त्याची हत्या केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत तीन तरुणांना अटक केली आहे. रवी कांबळे (२२), निखिल गायकवाड (२४), मनोर अरेन (२३) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

जयभीमनगर, फिल्टरपाडा येथे राहणारे सुभाष व त्याचे तीन मित्र हे नेहमीप्रमाणे जवळच असणाऱ्या बारमध्ये शनिवारी रात्री दारू पिण्यास गेले होते. नशेत बेधुंद झालेल्या या चौघात त्यानंतर शुल्लक कारणावरून वाद उफाळून आला. रागाच्या भरात त्याच्या तीन साथिदारांनी त्याच्या चेहऱ्यावर हाता-पायाने मारहाण करून, त्याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूने दगडाने आघात करून त्यास गंभीर जखमी केले.

गस्तीसाठी त्या भागात गेलेल्या पवई पोलिसांना याबाबत समजताच त्यांनी त्वरित सुभाष याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे आणण्यापूर्वीच सुभाषचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

“डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, सुभाषच्या चेहऱ्यावर हातापायांनी मारहाणीसह डोक्याच्या पाठीमागील बाजूस घातक, टणक वस्तूने आघात केल्याचे स्पष्ट होत असल्याने आम्ही हत्येचा गुन्हा नोंद करत तपास सुरु केला होता” असे आवर्तन पवईशी बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आम्ही त्वरित घटनास्थळासह बारमध्ये चौकशी केली असता, अजून तीन मित्र त्याच्यासोबत दारू पिण्यास त्या रात्री उपस्थित असल्याचे समोर आले. त्यांच्या जवाबात विसंगती आढळून येत असल्याने त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनीच नशेत त्याची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे.”

पवई पोलिसांनी याबाबत भादंवि कलम ३०२ (खून), ३४ (एकापेक्षा अनेक गुन्हेगार) नुसार गुन्हा नोंद करत तिन्ही आरोपींना अटक करून सोमवारी कोर्टात हजर केले असता १६ एप्रिल पर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes