रस्त्यावरील बेघर मुलांसोबत वाढदिवस

आपला वाढदिवस आप्तस्वकीयांसोबत सेलिब्रेट करणारे अनेक नजरेस पडतात. मात्र गरीब गरजू, बेघर आणि रस्त्यावरील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरे करणारे क्वचितच. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली एकमेकांपासून लोक लांब पळत असतानाचा पवईतील एका तरुणीने चक्क रस्त्यावरील बेघर मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.

पवईतील तुंगागाव येथे राहणारी तरुणी हर्षु पवार हिचा २१ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. सर्वसामान्याप्रमाणे ती सुद्धा आपला वाढदिवस नातेवाईकांच्या गोतावळ्यात साजरा करू शकली असती. मात्र या कोरोना महामारीच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली नागरिक एकमेकांपासून दूर पळत आहेत. अशात सर्वसामान्यांचे सर्वच सण आणि उत्सव घराच्या चार भिंतीच्या मध्ये कोंडले गेले आहेत. अशात रस्त्यावर बेघर राहणाऱ्यांचे काय? हाच विचार करून तिने आपला वाढदिवस या मुलांसोबत साजरा करण्याचे ठरवले.

अंधेरी, एमआयडीसी येथील पुलाखाली, आणि फुटपाथवर राहणाऱ्या २५-३० मुलांना खाऊ, चॉकलेट, केक याची भेट तर दिलीच शिवाय त्यांच्यासोबत वेळ घालवत त्यांच्या सोबत आनंद वाटला.

“कोरोनामुळे लोक आमच्यापासून दूर पळतात. या काळात आम्हाला कोणी भिक किंवा अन्न द्यायला सुद्धा येत नाही, हे ऐकून माझे काळीज पिळवटून गेले. आमचे आईवडील आमचा वाढदिवस का साजरा करत नाहीत? हे ऐकल्यावर मी त्यांना प्रत्येकवर्षी आपण सगळे मिळून वाढदिवस साजरा करू असे सांगितले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसला,” असे याबाबत बोलताना हर्षाने सांगितले.

भविष्यात ही अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याच्या त्यांनी निर्णय घेतला असून, प्रत्येक वाढदिवस अशाच काही मुलांसोबत साजरा करणार असल्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!