मेट्रो कामात जलवाहिनी फुटली; रात्री ९ नंतर पाणी येण्याची शक्यता

मेट्रो कामात जलवाहिनी फुटली महाराष्ट्रात सध्या अनलॉक १ सुरु झाला असून, विविध ठिकाणी लॉकडाऊन काळात अडकलेल्या कामांना गती दिली जात आहे. असेच काम सुरु असताना जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर ‘मेट्रो-६’च्या कामात आयआयटी मेनगेट समोर जलवाहिनी फुटली. यामुळे बुधवारी दिवसभर पवईतील अनेक भागात पाणीपुरवठा खंडित झाला होता. रात्री ९ नंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता पालिका पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे.

फोटो: रमेश कांबळे

८ जूनपासून महाराष्ट्रासह मुंबईत अनलॉक १ सुरु झाले आहे. लॉकडाऊन घोषित केल्यानंतर कामगार आणि सुविधेचा अभावाने मुंबईत अनेक कामे अडकून पडली होती. ज्यात पालिकेकडून केल्या जाणारया पावसाळापूर्व कामांचा समावेश सुद्धा आहे. मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकलवर पडणारा ताण कमी करण्यासाठी मुंबईत मेट्रोचे जाळे पसरवले जात आहे. यातील एक मेट्रो-६ मार्गिका जेविएलआरवरून पवईतून जाते. या मार्गिकेच्या कामात खोदकाम करताना अनेकवेळा जलवाहिनीला धक्का लागून मेट्रो कामात जलवाहिनी फुटली असल्याचे प्रकार घडले आहेत. बुधवारी सुद्धा कामावेळी जलवाहिनी फुटल्याचा प्रकार पवईत घडला.

आयआयटी मेनगेट समोर काम सुरु असताना ही घटना घडली. यामुळे दिवसभर पवईतील विविध भागात पाणीपुरवठा खंडित झाला होता. मात्र त्वरित या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. “काम जवळपास पूर्ण होत आले असून, रात्री ९ नंतर परिसरात हळूहळू पाणीपुरवठा पूर्ववत होईल,” असे याबाबत बोलताना नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी सांगितले.

शेवटची माहिती हाती आली तेव्हा दुरुस्तीचे काम पूर्ण झाले होते. काही वेळातच पाणीपुरवठा सुरु होणार असल्याचे सांगतानाच सुरुवातीला घाण पाणी येण्याची शक्यता पालिकेतर्फे वर्तवण्यात आली आहे.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!