लोन अॅपच्या जाळ्यात अडकवून पवईकराला केले ब्लॅकमेल

एका खाजगी कंपनीत नोकरीला असणाऱ्या २८ वर्षीय पवईकराला लोन अॅपच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीविरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार याने घेतलेल्या ५,००० रुपयांच्या कर्जाच्या दुप्पट रक्कम ९,४६४ रुपये परत करूनही अधिक पैसे देण्यास सांगून त्याचा मॉर्फ केलेला फोटो त्याच्या मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टवरील शेकडो लोकांना प्रसारित करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल करण्यात येत आहे.

गेल्या महिन्यात हॅंडी लोन अॅपद्वारे त्याने हे लोन घेतले होते. व्याजासह ऑनलाइन फंड ट्रान्सफर पावती दाखवूनही तक्रारदाराला धमकावत जास्त पैसे देण्यास सांगितल्यानंतर पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

३ जून रोजी तक्रारदार यांना त्याने २२ मे रोजी घेतलेल्या कर्जाचे एकूण ९,४६४ रुपये व्याजासह परतफेड करण्यासाठी अॅपवरून संदेश आला होता. “लोन अॅप सेवा पुरवठादाराने कर्जासाठी अर्ज स्वीकारताना मोबाईलमधील सर्व डेटा हॅक केला असण्याची शक्यता आहे. एप निर्माता आणि कॉलर शोधण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. सध्या, आम्ही अॅपचा पत्ता शोधण्यात अक्षम आहोत,” असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

मी २ जूनपूर्वी मोठ्या व्याजासह संपूर्ण कर्जाची परतफेड केली आहे. दुसऱ्या दिवशी मला एका व्यक्तीने फोन करून ९,४६४ रुपये परत करण्यास सांगितले. मी त्यांना कर्जाची पूर्ण रक्कम परतफेड केल्याचे सांगत त्यांना त्याची रसीद सुद्धा दिली. मात्र कॉलरने धमकी दिली की त्याला संपूर्ण संपर्क यादी मिळाली आहे आणि जर त्याने ती रक्कम क्लिअर न केल्यास तो मॉर्फ केलेले फोटो सर्वांना पाठवेल. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात तक्रारदार याने म्हटले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!