मुंबईत दिवसेंदिवस कोविड – १९ रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच पवईतील चाळसदृश्य लोकवसाहतीमध्ये आज, ०८ एप्रिल २०२० रोजी अजून दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. एकाच कुटुंबातील हे दोघे असून, यापूर्वी सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना या आजाराने ग्रासल्याची शक्यता आहे. पवईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आता ५ झाली आहे. पालिकेने आसपासचा परिसर सील […]
@सुषमा चव्हाण | ७ एप्रिल हा जगभर जागतिक आरोग्य दिवस (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. आज संपूर्ण देश कोविड -१९ सारख्या महाभयंकर आजाराशी लढत असताना, यात अतिमहत्त्वाचा भाग असणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टरांना मानवंदना देण्यासाठी पवईकर मोझेक आर्टीस्ट चेतन राऊत याने पुशपिनच्या साहाय्यातून डॉक्टरांचे पोर्ट्रेट साकारत जागतिक आरोग्य दिनी त्यांचे आभार मानले आहेत. जगात […]
@प्रमोद चव्हाण | मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग आणि बौद्ध विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानातून आज, ७ एप्रिल २०२० सकाळी १० ते २ या वेळेत चंद्रमणी बुद्ध विहार, माता रमाबाई आंबेडकर नगर येथे फिव्हर क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. सोशल डिस्टंन्सिंग पाळत परिसरातील जवळपास १५० नागरिकांनी याचा लाभ घेतला. सुदैवाने यातील एकही रुग्ण संशयीत असल्याचे समोर […]
कोरोना बाधित रुग्णांची ०६ एप्रिल २०२०ची अपडेट राज्यात आज १२० नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. यात मुंबई ५२६, पुणे (शहर व ग्रामीण) १४१, सांगली २५, ठाणे परिसर ८५, नागपूर १७, अहमदनगर २३, यवतमाळ ०४, उस्मानाबाद ०३, लातूर ०८, औरंगाबाद १०, बुलढाणा आणि सातारा प्रत्येकी ०५, जळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी आणि नाशिक प्रत्येकी ०२, तर सिंधुदुर्ग, गोंदिया, […]
@प्रमोद चव्हाण | कोविड – १९ रुग्णांचा महाराष्ट्रातील वाढता आकडा पाहता आणि पुढील काळात रक्ताचा तुटवडा भासू शकतो याला पाहता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. दिवसरात्र खाकीच्या माध्यमातून मुंबईला सुरक्षा पुरवणाऱ्या आणि कायदा – सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पवई पोलीस ठाण्यात कार्यरत विजय घागरे, अंबादास काळेल, शिवराज कोळी यांनी […]
भारत माता की जय, वंदे मातरम्, गणपती बाप्पा मोरया, गो कोरोना गो अशा घोषणा देत कोरोना विरोधात आज (०५ एप्रिल २०२०) पवईकर आणि चांदिवलीकर एकवटलेले पहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटे देत देशवासियांना एकत्रित येण्यासाठी घरातील इलेक्ट्रिक दिवे बंद करून, पणती, दिवे, मेणबत्ती, टोर्च लावण्याच्या केलेल्या आवाहनाला पवईकर […]
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने मुंबईतही प्रवेश केला आहे. या कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी आता शासनासह पालिकेने सुद्धा कंबर कसली आहे. यानुसारच ३ एप्रिल पर्यंत पवईतील ३ विविध परिसरांना सिल करण्यात आले आहे. जर पवईकर नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येणे बंद नाही केले तर पवईतील अजूनही काही परिसर सिल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यकता […]
@रविराज शिंदे, रमेश कांबळे: देशात कहर माजवणाऱ्या कोरोना वायरसशी लढा लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. देशात लॉकडाऊन असून, या काळात रक्ताची कमतरता जाणवण्याची शक्यता असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी छोट्या छोट्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर पवई बीजेपी वॉर्ड १२२ तर्फे आयआयटी पवई येथील जैन मंदिर हॉलमध्ये […]
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना केलेल्या असतानाच मुंबईतील कोरोना पॉजिटिव्ह किंवा संशयित मिळून आलेल्या १४६ इमारती/भागांना पालिकेतर्फे प्रतिबंधित करण्यात आले आहे. या उपाययोजने अंतर्गत पालिका ‘एस’ विभागांतर्गत येणारी पवईतील दोन ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. या भागांना पालिकेने सुरक्षित करत मुंबई पोलिसांची सुरक्षा सुद्धा ठेवण्यात आली आहे. सूचना देणारे बॅनर्स या भागात […]
जेजे स्कूल ऑफ आर्टचा विध्यार्थी असलेल्या पवईकर चेतन राऊत ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संकट समयी नेहमीच देशाच्या सोबत असणाऱ्या टाटांसमूहाच्या रतन टाटा यांचे एक अनोखे पोट्रेट साकारले आहे. त्यांनी कोरोनाच्या लढाईच्या काळात दिलेल्या योगदान आणि कार्याला मानवंदना चेतनने आपल्या या कलेतून दिली आहे. यापूर्वीही त्याने आपल्या कलेच्या माध्यमातून विश्वविक्रमी पोर्ट्रेट साकारली आहेत. देशात कोरोनाचा […]
@प्रतिक कांबळे: देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी सरकार व अनेक सामाजिक संस्थांकडून गरजूंना अन्न आणि धान्याचे वाटप केले जात आहे. याच सेवेत आपला खारीचा वाटा उचलत पवईस्थित आशा फॉर एज्युकेशन मुंबईतर्फे पवईतील २०० गरजूंना लॉकडाऊनच्या या काळात प्रत्येक आठवड्याला मोफत तांदूळ, ५ किलो पीठ, २ किलो डाळ, २ किलो साखर, १ लीटर […]
सिनेमा ग्राउंड, हरीचंद्र शर्मा उद्यान आणि हिरानंदानीतील दिनदयाल उपाध्याय मैदानावर भरणार भाजी मार्केट. @रमेश कांबळे कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पवईतील आयआयटी मार्केटमध्ये होत असणारी गर्दी कमी करण्यासाठी १४ एप्रिल २०२०पर्यंत येथील मार्केट तात्पुरत्या स्वरूपात जवळच असणाऱ्या सिनेमा ग्राउंड आणि हरिचंद्र शर्मा मैदान येथे हलवण्यात आले आहे. तर हिरानंदानी आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हिरानंदानी गार्डन येथील […]
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
@सुषमा चव्हाण: पूर्वी फक्त चूल आणि मूल यात अडकून पडलेली तरुणी आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. कोरोना व्हायरसने आता देशभर हाहाःकार माजवलेला असतानाच लॉकडाऊन स्थितीत अनेक तरुण गरीब गरजूंच्या मदतीला आणि अविरत सेवा पुरवणाऱ्या मुंबई पोलिसांच्या मदतीला पुढे आलेले असतानाच आता पवईतील तरुणी सुद्धा यात मोठा सहभाग नोंदवत असल्याचे समोर आले आहे. कोरोना […]
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
आपल्या परिसरातील एकालाही उपासमारीमुळे मरू द्यायचे नाही हा उद्देश समोर ठेवत तरुण जपत आहेत सामाजिक बांधिलकी. गरजू गरीबांना केली जेवणाची सोय. संपूर्ण देश लॉकडाऊन स्थितीत असताना गरीब आणि बेघर लोकांच्या पोटाची भूक मिटवण्यासाठी पवईतील तरुणांनी पुढाकार घेत, आज, २६ मार्चला विविध भागात उड्डाणपुलांखाली आसरा घेतलेल्या गरीब गरजू लोकांना अन्नदान केले. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या आणि […]
महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांचा वाढता आकडा बघता वाढत्या प्रादुर्भावाला दुसऱ्या स्टेजवरच रोखण्यासोबतच सोशल डीस्टेन्सिंग (सुरक्षित अंतर) ठेवण्यासाठी पवई, चांदिवलीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठोस पाऊले उचलली आहेत. पालिका एस विभागातर्फे पवईतील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांसमोर सुरक्षित अंतरावर चौकोनी बॉक्स आणि रिंगण आखण्यात आले आहेत. या रिंगणात उभे राहिलेल्यांना सामान देण्यात यावे व सुरक्षित असे अंतर ठेऊन संसर्ग होण्यापासून […]
कोविड – १९ आजाराने जगभराला आपल्या विळख्यात घेतलेले असताना, नोविड कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पसरत जाणारया या आजाराला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने देशभर संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. २५ मार्च पासून लागू झालेले संचारबंदी आदेश २१ दिवसांकरिता असणार आहेत. या कालावधीत फक्त जीवनाश्यक वस्तू, मेडीकल, दूध, भाजीपाला, फळे विक्री सारखी दुकाने सुरू ठेवण्याकरिता […]
