चांदिवली येथे राहणाऱ्या आणि एका नामांकित पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकारयाला भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मिळवून देण्याच्या बहाण्याने ७ लाखाला ऑनलाईन गंडविल्याची घटना नुकतीच पवईत समोर आली आहे. २१.५४ लाख रुपये त्याच्या पीएफ खात्यात जमा असून, ते मिळवण्यासाठी विविध फीच्या नावावर भामट्यांनी त्यांना ७ लाखाचा गंडा घातला आहे. १० वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले […]




















