मुंबई- येत्या शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा होणार आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने घोषित केलेल्या या दिनामध्ये मुव्हीमॅक्स ही सिनेमागृहांची शृंखला देखील सामील होणार आहे. राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त मुव्हीमॅक्सच्या कोणत्याही सिनेमागृहात अवघ्या ७५ रुपयांमध्ये सिनेमा पाहता येणार आहे. भारतातील सुमारे ४००० मल्टिप्लेक्स सिनेमागृह हा दिन साजरा करणार आहेत. […]
