Archive | news
माझा बाप्पा भाग ३
युवा पर्यावरण प्रेमींनी बनवला इको गणेशा, यंग एन्वायरमेंटलिस्ट्स ट्रस्टचा उपक्रम
गणेशोत्सवाची सगळीकडे धूमधाम सुरु आहे. या उत्सवादरम्यान पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून मिठी नदी आणि पवई लेकच्या मातीपासून शेकडो पर्यावरण प्रेमी तरुणांनी लोकांनी पर्यावरणपूरक गणेशाची निर्मिती केली. यंग एन्वायरमेंटलिस्ट्स प्रोग्राम ट्रस्टने यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी निसर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘इको फ्रेंडली’ गणेशाची कार्यशाळा […]
माझा बाप्पा भाग २
दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपती बाप्पाचे मंगळवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. सोमवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दिड दिवस पाहूणचार घेतल्यानंतर मंगळवारी […]
माझा बाप्पा
शिंदे परिवाराचा एकदंत, आयआयटी मार्केट पवई शिंदे परिवाराच्या बाप्पाच्या आगमनाचे हे पाचवे वर्ष आहे. ‘श्रीं’ ची मूर्ती शाडूच्या मातीने साकारलेली आहे. श्री दत्त गुरुंच्या अवतारातील बाप्पाची ही सुंदर मूर्ती २१ इंचाची आहे. कागद, पुठ्ठा, छत्री, पेपर, फुले, लाकडी, पानाने सजावट करण्यात आली आहे.
“माय इंडिया” पवई तलावावर सेल्फी पॉईंट; आमदार निधीतून निर्माण
पवई तलावाचे पर्यटन महत्व लक्षात घेऊन आमदार निधीतून नुकतेच “माय इंडिया” सेल्फी पॉईंटची निर्मिती येथे करण्यात आली आहे. स्थानिक आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांच्या निधीतून याची निर्मिती करण्यात आली आहे. या सेल्फी पॉईंटचे रविवारी पवईतील शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या आमदारासोबत सेल्फी घेत उद्घाटन केले. यावेळी सुट्टीचा दिवस असतानाही आणि भर पावसात मोठ्या प्रमाणात पवईतील […]
आरेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींची मानवी साखळी
@संजय पाटील मुंबई : आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी एकत्र येत मानवी साखळी रचली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीने २२३८ झाडे तोडण्याची मंजुरी दिली. आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी झाडांची कत्तल केली जाणार आहे. या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी रचली. वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात तरुणाई आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत घोषणा दिल्या. आज सकाळी ११ […]
सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांना पोलिसांनी काढायला लावल्या उठाबशा
सार्वजनिक ठिकाणी नशा करायला बसताय? सावधान! तुम्हाला काढायला लागू शकतात उठाबशा. वायरल होणारया एका व्हिडीओमध्ये पवईत सार्वजनिक खेळाच्या मैदानात काही तरुण आपले कान पकडून उठाबशा काढताना दिसत आहेत. नाही, ही कोणत्याही शाळेने किंवा कॉलेजने आपल्या विद्यार्थ्यांना दिलेली शिक्षा नाही, तर पवई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्या तरुणांना दिलेली शिक्षा आहे. तरुणांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून ठेवण्यापेक्षा […]
संघर्षनगरकरांचा संघर्ष संपणार, नागरी सुविधांसाठी पालिकेकडून ८० कोटीची मंजूरी?
पाठीमागील १२ वर्षापासून नागरी सुविधांपासून वंचित असणाऱ्या चांदिवली येथील संघर्षनगरकरांना आता दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे. मंगळवारी स्थानिक नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी, मुंबई महापौर आणि पालिका आयुक्त यांच्यात झालेल्या संयुक्त चर्चेत या परिसरातील नागरी सुविधांसाठी पालिकेतर्फे ८० कोटीचा फंड मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार ऍड अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे […]
सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक, तिसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार महाराष्ट्रातील ४१ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आज (बुधवार) स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) मिलिंद खेतले यांचा सुद्धा समावेश आहे. विशेष सेवेसाठी यावर्षीचे राष्ट्रपती पोलीस पदक त्यांना जाहीर करण्यात आले आहे. पोलिस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार दिला […]
संघर्षनगरमध्ये सांडपाण्यात धुतल्या जातात भाज्या; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
संघर्षनगरमधील लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भाजीवाल्याला मनसेने शिकवला धडा चांदिवली, संघर्षनगर येथे गटाराच्या पाण्यात भाज्या धुवून त्या विक्रीस ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला आहे. येथील एका भाजीवाल्याचा लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा जीवघेणा प्रकार मनसे सैनिकांनी उघडकीस आणला आहे. संघर्षनगर येथील इमारत क्रमांक ११ येथे भाजी विक्री करणारा एक भाजी विक्रेता गटारात जाणाऱ्या सांडपाण्यात भाज्या […]
मुसळधार : पवई, चांदिवली भागात काय घडले?
विहार तलाव भरला मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असलेला विहार तलाव बुधवारी रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी पूर्ण भरून वाहू लागला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. मुंबई, ठाणे भागात दमदार पाऊस होत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरून वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात […]
उद्या, ५ ऑगस्टला मुंबईतील शाळांना सुट्टी
उद्या ५ ऑगस्टला मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शाळा व कॉलेजना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जे पाहता शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा […]
आयआयटी पवईच्या क्लासरूममध्ये भटक्या गाईचा फेरफटका
आयआयटी बॉम्बेच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बैलांच्या जोडीने धावपळ करताना एका इंटर्नला जखमी केल्याची घटना अजून ताजी असतानाच, येथील एका क्लासरूममध्ये भटकी गाई घुसल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. भटकी जनावरे येथील विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत असतानाच त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात प्रशासन गुंतले असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करत आहेत. एका क्लासरूममध्ये लेक्चर सुरु असताना एक गाय त्या […]
गांधीनगर उड्डाणपुलावर कंटेनर पलटला, जेव्हीएलआरवर दोन तास वाहतूक कोंडी
आज (शुक्रवार) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर येथील उड्डाणपुलावर कचरा घेवून जाणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून पूर्व धृतगती मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक रोखण्यात आली होती. पुलाच्या खालून वाहतूक वळवल्याने जवळपास २ तास वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर क्रेनच्या मदतीने कंटेनर हटवल्यानंतर दुपारच्या आसपास वाहतूक सुरळीत […]
पवईत शालेय वेळेत शाळेजवळ वाहने पार्क करताय? सावधान ! भरावा लागू शकतो ५००० रुपयांचा दंड
साकीनाका वाहतूक विभागाकडून गुरुवारी शाळेजवळ आणि मुख्य रस्त्यांवर पार्क गाड्यांवर करण्यात आली कारवाई. दुपारी १२ ते १ वेळेत शाळेजवळ आणि त्याच्या मुख्य रस्त्यांवर नो पार्किंग’. पवई भागात सध्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात शालेय वेळेत पालक, शालेय विद्यार्थ्यांना घेवून येणारी खाजगी वाहने रस्त्यांवर पार्क केल्याने वाहतूक कोंडी जास्तच वाढत असते. या समस्येवर […]
मेट्रो-६ प्रकल्पाचे आक्षेप दोन महिन्यानंतरही बेदखल, एमएमआरडीएकडून अद्याप प्रतिसाद नाही
या प्रकरणात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाची मुंबईकरांची मागणी. मेट्रो-६ (स्वामी समर्थ नगर – विक्रोळी) या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कामाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यानंतर नागरिकांच्या सूचना आणि आक्षेप मागवले होते. यासाठी घेतलेल्या बैठकीत मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवत आक्षेप आणि सूचना नोंदवल्या, मात्र दोन महिने उलटूनही त्याच्यावर एमएमआरडीएकडून कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. […]
आयआयटी कॅम्पसमध्ये उभा राहणार भटक्या गायी-बैलांसाठी निवारा
आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याला झुंज करणाऱ्या बैलाने धडक देवून जखमी केल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेची आयआयटी प्रशासनाने गंभीर दखल घेत कॅम्पस परिसरात फिरणाऱ्या गाई-बैलांसाठी शेल्टर उभारण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी आयआयटी व्यवस्थापन मंडळाने कॅम्पस परिसरात योग्य अशी जागा पाहण्यास देखील सुरुवात केली आहे. पवईतील आयआयटी मुंबईमध्ये इंटर्नशिप करत असणाऱ्या अक्षय […]
पूर्व वैमनस्यातून पवईत एकाचा खून
मोबाईल चोरीच्या वादाचे कारण पुढे करत पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना काल (शनिवार) रात्री ८.३५ वाजण्याच्या सुमारास पवईत घडली. विनोद पाल उर्फ काली असे मृत तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यात शैलेंद्र उर्फ नन्नु यादव आणि रघू राजभर यांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि पाल याचा एकेकाळचा मित्र […]

