छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अवमानाच्या निषेधार्थ चांदिवलीमध्ये कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेळगावमधील पुतळा कर्नाटक सरकारने हटविल्याबद्दल सोमवारी शिवसेनेचे आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यात आला. चांदिवली संघर्षनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमा होत नागरिकांनी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध केला.

कर्नाटक सरकारच्या या कृत्याच्या निषेधार्थ चांदिवली संघर्षनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कर्नाटक सरकार विरोधी घोषणा देत शिवसेनेने जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या प्रतिमात्मक फोटोचे दहन करण्यात आले.

“छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेळगावमधील अश्वारूढ पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटवून अवघ्या मराठी जणांचा अवमान केला आहे. आम्ही महाराजांचा हा अवमान कदापि सहन करणार नाही,” असे याबाबत बोलताना आंदोलकांनी सांगितले.

या निषेध आंदोलनात आमदार दिलीप लांडे यांच्यासह विधानसभा संघटिका अश्विनी मते, उपविभाग प्रमुख अशोक माटेकर, भास्कर पाटील, डॉक्टर एस अन्नामलाई, प्रमिला चव्हाण, जोत्सना दळवी, शाखाप्रमुख अनंत उतेकर, बाळकृष्ण गटे, शैलेश निंबाळकर, नितीन गोखले, उषा शेट्टी, प्रभावती पालव, धनश्री पवार, पूजा सुर्वे, पार्वती शिंदे, पार्वती दारकुंडे तसेच अभंगराव नांगरे, राजेश्री देसाई, प्रयाग लांडे, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!