पवई पोलीस ठाणेतील ऑफिसर रूमचे उदघाटन गुरुवारी रोटरी क्लबचे डिस्ट्रिकट गव्हर्नर राजेंद्र अग्रवाल आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) महेश्वर रेड्डी (DCP Maheshwar Reddy) यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी रोटरी क्लब प्रेसिडेंट अमित सेठ, प्रोजेक्ट डायरेक्टर हनुमान त्रिपाठी, नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत (SPI Budhan Sawant), सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी उपस्थित होते.
मुंबई पोलीस (Mumbai Police) हे जगात दुसऱ्या स्थानावर आहेत. मुंबईतील कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करत असतात. त्यांच्या या मेहनतीच्या काळात त्यांना योग्य आणि चांगल्या वातावरणात काम करता यावे यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉंबे पवई (Rotary Club of Bombay Powai) तर्फे पोलीस ठाण्यातील ऑफिसर रूमचे रिनोवेशन करण्यात आले आहे.
“पोलीस अधिकाऱ्यांना योग्य वातावरण देणाऱ्या रूमचे निर्माण रोटरीतर्फे करण्यात आले आहे याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यामुळे अधिकाऱ्यांची काम करण्याची क्षमता नक्की वाढेल” असे यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त परिमंडळ १० महेश्वर रेड्डी म्हणाले.
No comments yet.