एका खाजगी कंपनीत काम करणारा ५२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअर नुकताच परदेशी नोकरीच्या फसवणुकीला बळी पडला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी त्याला यूकेमध्ये नोकरीची ऑफर दिली आणि व्हिसाची व्यवस्था आणि इतर विविध शुल्कासाठी ९ लाख रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. फसवणूक करण्यापूर्वी एक बनावट व्हिडिओ मुलाखतही घेतली. साकीनाका पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, १३ एप्रिल रोजी तक्रारदाराच्या मित्राने त्याला पाठवलेल्या नोकरीच्या संधीचा एक ईमेलमध्ये युके येथील एका नामांकित कंपनीच्या नावाने असणाऱ्या वेबलिंकवर तक्रारदार याने आपला बायोडाटा पाठवला होता. काही तासांतच नोकरीच्या मुलाखतीस हजर राहण्यास सांगणारे उत्तर आले.
१५ एप्रिल रोजी तक्रारदाराला स्काईप व्हिडिओ कॉलने लेखी परीक्षा देण्यास सांगण्यात आले. चार दिवसांनंतर, त्याला एक ईमेल प्राप्त झाला ज्यात त्याला त्याची नोकरीसाठी निवड झाली असून, तीन वर्षांसाठी व्हिसाची व्यवस्था करण्यासाठी ईमेलवर त्याची कागदपत्रे पाठवण्यास सांगितले होते.
“फसवणूक करणार्यांनी त्याला बँक तपशील आणि नवी दिल्लीतील ब्रिटीश दूतावासात एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून असणाऱ्या जेम्स मूर नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर देखील दिला होता.” असे पोलिसांनी सांगितले.
तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदाराला प्रक्रिया शुल्क, पडताळणी शुल्क आणि प्रवास शुल्क भरण्यास सांगितले होते, ज्याचा परतावा मिळणार होता. तसेच व्हिसा अंतिमीकरण आणि वर्क परमिटसाठी त्याच्याकडे पैशाची मागणी करत राहिले. फसवणूक करणाऱ्यांना जेव्हाही पैसे द्यावे लागतील तेव्हा पैसे देणे सुरू होते.
एकूण ९.०९ लाख रुपये दिल्यानंतरही समोरील व्यक्तींनी तक्रारदाराला पुढील मुलाखती न देता नोकरी देण्यासाठी आणखी एक शुल्क मागितले आणि यूकेमध्ये प्रवेश करण्यासाठी अतिरिक्त प्रवास शुल्क आणि इतर शुल्क भरण्यास सांगितले. संशय आल्याने अभियंत्याने अनेक वेळा आरोपीला त्याचे पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र फसवणूक करणार्यांनी नंतर संपर्क तोडला आणि सिव्हिल इंजिनिअरकडे पोलिसांकडे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.
यासंदर्भात साकीनाका पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरु केला आहे.
No comments yet.