महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशन म्हणजेच मासा संस्थेतफे पवईत मासेमारी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या दरम्यान पवई तलाव येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मेंटोर आली हुसेन यांच्या स्मरणार्थ आयोजित या फिशिंग चम्पिअनशिप २०२१ स्पर्धेत पहिले बक्षीस रोख रक्कम १०००१, दुसरे बक्षीस ५००१ तर तिसरे बक्षीस ५००१ असणार आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या स्पर्धकाला अनुक्रमे २००१ आणि १००१ रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहेत. तसेच विजेत्यांना करंडक, सर्टिफिकेट व मासेमारीचे साहित्य बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत एका स्पर्धाला दोन फिशिंग रॉड वापरण्याची मुभा असणार आहे. मासे संवर्धनासाठी काम करणाऱ्या या संस्थेतर्फे गळाने मासे पकडण्याच्या क्रिडाप्रकाराला उत्तेजन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गळाने मासे पकडून त्याचे वजन व फोटो काढून माशांना पुन्हा पाण्यात सोडण्यात येते.
हा खेळ पाश्चात्य देशात खूपच लोकप्रिय आहे. मुंबईत गळाने मासेमारी करण्याची स्पर्धा आयोजित करणारी महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशन ही पहिली संस्था आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी संस्थेच्या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधत किंवा संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिल देसाई, सेक्रेटरी कमलेश शर्मा, खजिनदार- कोषाध्यक्ष फिरोज एम खान, फिल्ड सेक्रेटरी रझीउद्दिन सिद्दिकी, सह जॉईट सेक्रेटरी सुजित पांडा पर्यावरण तज्ञ विजय अवसरे, मुराद शेख यांनी केले आहे.
No comments yet.