मोटारसायकल चोराच्या ८ तासाच्या आत आवळल्या मुसक्या; पवई पोलिसांची कारवाई
पवई पोलिसांच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्याच्या ८ तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. सरफराज शेख (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत केली असून, अजूनही काही गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत. व्यवसायाने फोटोग्राफर असणारे हर्षद दिलीप जिमकाडे […]
१.६ किलो गांजासह पवईत एकाला अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) आबुराव सोनावणे यांनी पवई पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रेते आणि सेवन करणारे यांच्यावर धडक कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडले आहे. शनिवारी पवई पोलिसांनी पुन्हा कारवाई करत १.६ किलो गांजासह एका विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. इर्शाद सरताज अली शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. […]
जेविएलआरवर आयआयटी मार्केट गेटजवळ धावत्या कारला आग
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर पवई येथील आयआयटी मार्केट गेटजवळ एका कारला आग लागल्याची घटना आज, शुक्रवार १२ मार्चला संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. जोगेश्वरीच्या दिशेने आलेली ह्युंडाई एक्सेंड कार क्रमांक एमएच ४७ एन ५८७६ ही टूरिस्ट कार गांधीनगरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. गाडीच्या इंजिन भागातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी बाजूला घेतल्याने […]
रामबाग उड्डाणपुलाजवळ डिव्हायडरला धडकून अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यू
पवई, रामबाग उड्डाणपुलाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी रात्री पवईत घडली. २० वर्षीय तरुण विक्रोळीच्या दिशेने जात असताना डिव्हायडरला (दुभाजक) धडकून हा अपघात झाला आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरु आहे. स्वप्नील सुभाष अहिवले (२०) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्रपाळी कर्तव्यावर असणाऱ्या पवई […]
कोरोना उद्रेकात लढा देणारा कोरोना योद्धा हरपला; साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश नांगरे यांचे निधन
देशभर थैमान घातलेल्या कोरोना (corona) महामारीच्या काळात हॉटस्पॉट असणाऱ्या मुंबईतील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) कर्तव्य बजावत कोरोना प्रसार नियंत्रण आणण्यासाठी जीवाचे रान करणारे पोलीस अधिकारी रमेश नांगरे (ACP Ramesh Nangare) यांचे हृद्यविकाराने निधन झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग म्हणून पदभार सांभाळला होता. गुरुवारी सकाळी ही बातमी पोलीस खात्यात […]
सावधान पवईकर: पोलीस असल्याची बतावणी करत हिरानंदानीत ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न
ज्येष्ठ नागरिकांना घाबरवून, भोळेपणाचा फायदा घेवून फसवण्याचे, लुटण्याचे प्रकार मुंबईत सर्रास घडू लागले आहेत. ८ मार्च रोजी पवईतील हिरानंदानी भागात सुद्धा एका ज्येष्ठ जोडप्याला ४ लोकांनी मिळून पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली. मात्र, ज्येष्ठ नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्यांचा हा इरादा पूर्ण होऊ शकला नाही. ज्येष्ठ नागरिक, भोळे सहज विश्वास […]
आमच्यासाठी प्रत्येक दिवस असतो ‘महिला दिन’; जागतिक महिला दिनी पवई पोलिसांकडून ‘ती’चा सन्मान
८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून देशभर साजरा केला जातो, याच महिला दिनाचे औचित्य साधत पवई पोलिसांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला. कोरोना काळात आपआपल्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांना परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. चांदिवली येथील मेगारुगास हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात […]
‘शासन तुमच्या दारी’: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिरानंदानीत जन बैठकीचे आयोजन
‘शासन तुमच्या दारी’ संकल्पने अंतर्गत हिरानंदानी भागात रविवार, ३ मार्चला जन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग); महेश्वर रेड्डी, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०); रमेश नांगरे, सहाय्यक आयुक्त (साकीनाका विभाग); आबुराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस ठाणे); पोलीस निरीक्षक दिलीप धामुनसे (गुन्हे); आमदार दिलीप (मामा) लांडे, हिरानंदानी […]
सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई परिसरात घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी गुरुवारी पार्कसाईट येथून बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय उर्फ लंब्या अरुण बाईत (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पवई येथील एक घरफोडी आणि चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला आहे. २ मार्च रोजी पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या लेबर कॅम्पमध्ये घुसून मौल्यवान वस्तू आणि रोकड […]
बसमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नागेश शंकर गायकवाड (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. पवई परिसरात जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेविएलअर) मार्गावरून बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल, मौल्यवान […]
लोकांनी हरवलेले १८ मोबाईल फोन पवई पोलिसांनी दिले मालकांना परत मिळवून
पवईकरांचे हरवलेले १८ महागडे मोबाईल फोन परत मिळवण्यात पवई पोलिसांनी यश संपादन केले असून, ते सर्वच्या सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त साकीनाका विभाग यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले. अन्न, वस्त्र आणि निवारा इतकीच मोबाईल सुद्धा आता माणसाची गरज बनून राहिली आहे. मात्र अनेकदा मुंबईकर […]
कोरोना प्रसार रोखण्यासाठी पवई, भांडूपमधील सोसायटींवर कडक निर्बंध; स्विमिंग पूल जिम बंद
मुंबईत कोरोना व्हायरसमुळे पुन्हा वाढती बाधितांची संख्या हे चिंतेचे कारण बनले आहे. गेल्या काही दिवसांत महानगरपालिका ‘एस’ प्रभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बरीच वाढली आहे. जे पाहता पालिका एस विभागाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपाययोजना म्हणून प्रभागातर्फे कडक निर्देश देण्यात आले आहेत. गर्दी करणे टाळणे, स्विमिंग पूल, जीम बंद ठेवणे […]
चांदिवलीत इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग
चांदिवली येथील नहार अमृत शक्ती परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागल्याची घटना सोमवार, १ मार्चला घडली. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, नहार अमृत शक्ती येथील वोईला अल्बा नामक इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका […]
पवईत गांजासह एकाला अटक
पवई परिसरातील मिलिंदनगर भागात गस्त घालत असताना पवई पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीला १ किलो गांजासह अटक केली आहे. कैलाश शेषराव साबळे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवई पोलीस त्याला गांजा विकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था नियंत्रणासाठी पोलिसांकडून पायी गस्त घातली […]
पवई खून प्रकरण: दोन आरोपींना हत्यारासह पवईतून अटक; गुन्हे शाखेची कारवाई
पवई येथील ४० वर्षीय राजेश भारद्वाज याचा खून करून पसार झालेल्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेला मोबाईल फोन, सीम कार्ड आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत केले आहे. नूर युनुस खान (वय २२ वर्ष) आणि सलीम आरिफ खान (वय २१ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. […]
ज्येष्ठ नागरिकाचे ई-फ्रॉडने पळवलेले ७४.५ हजार रुपये पोलिसांनी काही तासात दिले परत मिळवून
ऑनलाईन फसवणूकीत एका ज्येष्ठ नागरिकाने गमावलेले ७४,५०० रुपये काही तासातच साकीनाका पोलिसांनी कारवाई करत परत मिळवून दिले आहेत. घर भाड्याने घेण्याच्या बहाण्याने रिअल इस्टेट ब्रोकरच्या माध्यमातून कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून, लष्करात अधिकारी असल्याचे सांगत महिलेने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली होती. पोलिसांच्या या कारवाईची प्रशंसा करताना ज्येष्ठ नागरिक यांनी मुंबई पोलिस दलाची स्कॉटलंड यार्डशी तुलना केली आहे. […]
साकीनाका येथे गोडाऊन फोडून १८ लाखाची चोरी करणाऱ्या चोरट्यांना ३ तासात अटक
साकीनाका येथील अरिहंत इंडस्ट्रीजमध्ये असणाऱ्या एमएमपीएम या कंपनीची भिंत तोडून लाखोंचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरुन नेणाऱ्या ३ आरोपींना साकीनाका पोलिसांनी अवघ्या तीन तासात बेड्या ठोकल्या आहेत. इमरान मेहरान शेख (१९) आणि अक्षय शर्मा (२४) अशी अटक आरोपींची नावे असून, त्यांचा अजून एक साथीदार दिनेश दुमडिया मात्र फरार आहे. साकीनाका पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत […]
करन्सी एक्स्चेंजच्या नावाखाली महिलेला ५ लाखाचा गंडा
ऑस्ट्रेलिया येथील क्रुज जहाजावर सुरक्षा अधिकारी असणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेला चलन विनिमयच्या (करन्सी एक्स्चेंज) नावाखाली २ महिलांनी ५ लाखाचा गंडा घातला आहे. मरीना गोन्साल्वीस असे फसवणूक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. यासंदर्भात तिने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एक ६० वर्षीय महिला आणि तिची विशीतील महिला साथीदार यांनी मिळून मरीनाची फसवणूक केली […]
बसमध्ये गर्दीचा फायदा घेवून हातसफाई करणाऱ्या त्रिकुटाला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बसमधील गर्दीचा फायदा घेवून हातसफाईने चोरी करणाऱ्या टोळीच्या तिघांना साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इरफान इलियाज खान, रियाजुद्दीन करीममुल्ला सय्यद, सिकंदर मोहम्मद युनुस अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नोव्हेंबर महिन्यात घाटकोपर येथे राहणारे व्यावसायिक असल्फा येथून घाटकोपर येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत उभे होते. बस आल्यावर त्यांनी आपल्या जवळील कागदपत्रे आणि पैसे […]
अवैध डंपर वाहतूक, पार्किंग आणि हॉकर्स विरोधात पवईमध्ये शिवसेनेचे आंदोलन
पवईतील हिरानंदानी, जलवायू विहार भागात अवजड वाहनांना बंदी असतानाही, अवैधरित्या चालणारी डंपर वाहतूक, अवैध पार्किंग आणि हॉकर्स विरोधात पवईमध्ये बुधवार, २४ फेब्रुवारी रोजी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जलवायू विहार चौकात पार पडले. यावेळी आमदार लांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) रमेश नागरे, साकीनाका वाहतूक विभागाचे सपोनि […]

