पवईत तरुणांकडून गरजू गरीबांना जेवणाची सोय
आपल्या परिसरातील एकालाही उपासमारीमुळे मरू द्यायचे नाही हा उद्देश समोर ठेवत तरुण जपत आहेत सामाजिक बांधिलकी. गरजू गरीबांना केली जेवणाची सोय. संपूर्ण देश लॉकडाऊन स्थितीत असताना गरीब आणि बेघर लोकांच्या पोटाची भूक मिटवण्यासाठी पवईतील तरुणांनी पुढाकार घेत, आज, २६ मार्चला विविध भागात उड्डाणपुलांखाली आसरा घेतलेल्या गरीब गरजू लोकांना अन्नदान केले. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या आणि […]
सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पवई, चांदिवलीत महानगरपालिकेकडून खबरदारी
महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांचा वाढता आकडा बघता वाढत्या प्रादुर्भावाला दुसऱ्या स्टेजवरच रोखण्यासोबतच सोशल डीस्टेन्सिंग (सुरक्षित अंतर) ठेवण्यासाठी पवई, चांदिवलीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठोस पाऊले उचलली आहेत. पालिका एस विभागातर्फे पवईतील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांसमोर सुरक्षित अंतरावर चौकोनी बॉक्स आणि रिंगण आखण्यात आले आहेत. या रिंगणात उभे राहिलेल्यांना सामान देण्यात यावे व सुरक्षित असे अंतर ठेऊन संसर्ग होण्यापासून […]
संचारबंदी कालावधीत पवईत दामदुप्पट किमतीने भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पोलीस, समाजसेवकांची तंबी
कोविड – १९ आजाराने जगभराला आपल्या विळख्यात घेतलेले असताना, नोविड कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पसरत जाणारया या आजाराला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने देशभर संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. २५ मार्च पासून लागू झालेले संचारबंदी आदेश २१ दिवसांकरिता असणार आहेत. या कालावधीत फक्त जीवनाश्यक वस्तू, मेडीकल, दूध, भाजीपाला, फळे विक्री सारखी दुकाने सुरू ठेवण्याकरिता […]
क्वारंटाईन केले असताना पळून गेलेल्या तिघांवर कारवाई
झारखंडचे निवासी असणारे आणि दुबईवरून भारतात परतल्यानंतर मुंबईत होम क्वारंटाईनमध्ये असताना पळून गेलेल्या त्रिकुटाला पकडून कारवाई करत पवई पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या अत्यंत सुरक्षित अशा विलगीकरण केंद्रात पाठवले आहे. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० मार्च रोजी दुबईमध्ये इलेक्ट्रिशीयन म्हणून काम करणारे दोघे तर भेटण्यासाठी गेलेला एक असे तीन भारतीय नागरिक मुंबईत विमानाने आले होते. एअरपोर्टवर […]
सात फुट लांब मगरीला पॉज मुंबईचे जीवनदान
संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असून, आवश्यकता नसताना कोणालाही घरातून बाहेर निघण्याची अनुमती नसताना शिकारीच्या शोधात बाहेर पडलेल्या ७ फुट लांब ७२ किलो वजनाच्या मगरीला पॉज मुंबई च्या प्राणीमित्रांनी तिला पकडून जीवनदान दिले आहे. नंतर तिला नैसर्गिक वास्तव्यात सोडून देण्यात आले आहे. भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जलवाहिनीखाली ही मगर आढळून आली होती. पूर्ण मुंबई शहर लॉकडाऊनमध्ये असताना […]
मा. नगरसेवक सोमनाथ सांगळे यांचे नागरिकांना आवाहन
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
‘मीच माझा रक्षक’ – मा. नगरसेवक ईश्वर तायडे यांचे नागरिकांना आवाहन
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
मीच माझा रक्षक: पवईतील तरुणाची अनोख्या पद्दतीने कोरोनाबद्दल जनजागृती
@प्रतिक कांबळे – दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव बघता महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनात जनजागृतीसाठी पवईतील समाजसेवक विलास कुशेर यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी पवई परिसरातील प्रमुख दोन रस्त्यांवर ‘गो कोरोना’ आणि ‘मीच माझा रक्षक’ असा संदेश लिहीत लोकांमध्ये याबाबत जनजागृती केली आहे. ‘महाराष्ट्र शासनाने लॉकआउटचा निर्णय घेत नागरिकांना घरी बसण्याच्या सूचना केल्या […]
आयआयटी पवईत ४० रुग्ण ठेवल्याची माहिती खोटी – जनसंपर्क अधिकारी
आयआयटी मुंबईत काम करणारे हाऊसकिपिंग कामगार सहीत अन्य विभागात काम करणाऱ्या काही लोकांकडून पवईत या कॅम्पसमध्ये ४० रूग्ण आणण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. आमची ड्युटी तिथेच आहे असं ‘डंके की चोट पर’ सांगितले जात आहे. यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या संदर्भात आयआयटी मुंबई जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती विचारली असता […]
आयआयटी मुंबईचे विलगीकरण केंद्र रद्द
पवईतील दोन ठिकाणी सी कॅटेगरीमधील बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी केंद्र उभी करण्याची लगबग सुरु होती. आयआयटी पवई आणि रहेजा विहार येथील प्रशिक्षण केंद्रात हे विलगीकरण कक्ष बनवण्यात येणार होते. मात्र ही लगबग सुरु असतानाच आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बनवण्यात येणारे विलगीकरण केंद्र शासनातर्फे रद्द करण्यात आल्याचे तहसीलदार मिलिंद बोरीकर यांनी स्पष्ट केले आहे. जगभर […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदीची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदीची घोषणा. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आज (रविवारी २२ मार्च २०२०) मध्यरात्रीपासून नागरी भागात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली. #powai #जनता_कर्फ्यू #युद्ध_कोरोनाशी #CMMaharashtra #पवई
‘जनता कर्फ्यु’ला पवईकरांचा मोठा प्रतिसाद
जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना वायरसचा फैलाव जास्त प्रमाणात गर्दीच्या ठिकाणी होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार २२ मार्चला ‘जनता कर्फ्यु’ची घोषणा करत जनतेला घरातच राहण्याची विनंती केली. या जनता कर्फ्युला पवईमध्ये नागरिकांनी घरात राहत मोठा प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या हाकेला साथ देत पवई, चांदिवलीतील रहिवाशांनी घरातच राहण्याचा मार्ग निवडत याला मोठा प्रतिसाद दिला […]
पवईत धावत्या मोटारसायकलला आग
@रविराज शिंदे पवई जेवीएलआरवरील गणेशनगर गणेशघाट येथे गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारसायकलला अचानक भीषण आग लागल्याची घटना शुक्रवार, २० मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता घडली. सुदैवाने चालक बचावला असून, मोटारसायकल जळून खाक झाली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत झाल्टे नामक तरुण आपली यामाहा मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ डीजे ३११५ वरून गांधीनगरच्या दिशेने […]
पवईत दोन ठिकाणी तयार होत आहेत विलगीकरण केंद्र
जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने (कोव्हीड १९) भारतात प्रवेश केला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १६६च्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मिळून सध्या ४८ पॉजीटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात पोहचलेल्या या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने सुद्धा ठोस पाऊले उचलली असून, ठिकठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी सेंटर उभी करण्याची लगबग सुरु […]
बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या ३ बांग्लादेशींना अटक; साकीनाका, पवई एटीसीची कारवाई
चौकशी दरम्यान पोलिसांनी त्यांना भारतीय नागरिक असल्याचे दर्शविणारी कागदपत्रे दाखविण्यास सांगण्यात आले मात्र ते तसे करण्यास अक्षम ठरले त्यानंतर त्या बांग्लादेशींना अटक करण्यात आली. मरोळ आणि सहार परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या २ बांग्लादेशींना साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींपैकी एक जण मरोळ, चिमटपाडा येथे राहत होता आणि टेलर म्हणून काम करीत होता. तर त्याचा मामा […]
कौटुंबिक वादातून मुलाचा वडिलांकडून खून
कौटुंबिक वादातून जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोलीस शिपाई असणाऱ्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना १६ मार्चला पवई येथील गणेशनगर परिसरात घडली. हरिष गलांडे (४०) असे या मुलाचे नाव असून, घटनेनंतर पवई पोलिसांनी आरोपी वडील गुलाब गलांडे यांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना पुढील चौकशीसाठी २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या […]
७२ तासांत वसतिगृहे खाली करण्याचा आयआयटी मुंबईचा विद्यार्थ्यांना आदेश
जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा महाराष्ट्रात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयआयटी मुंबईमधील सर्व विद्यार्थ्यांना ७२ तासांत म्हणजेच शुक्रवार, २० मार्चपर्यंत वसतिगृहे खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी संस्थेच्या सर्व विभागप्रमुख आणि प्रशासकीय प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन येणाऱ्या ७२ तासांत आयआयटीमधील येण्या-जाण्यावर कडक निर्बंध लादण्याचा, वसतिगृहे खाली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेचे संचालक सुभाषिश चौधरी […]
एनआरआय असल्याचे सांगत महिलेला ३ लाखाचा ऑनलाईन गंडा
साकीनाका येथील ३२ वर्षीय महिलेला तिच्यासोबत विवाहास इच्छुक असल्याचे सांगत एका भामट्याने ३ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. नीरज कपूर असे या भामट्याचे नाव असून, महिलेने वैवाहिक वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर दोघांची ओळख झाली होती. या भामट्याने आपण एनआरआय असल्याचा दावा करत तिला आपल्या जाळ्यात अडकवले. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,साकीनाका येथे राहणाऱ्या आणि खाजगी कंपनीत नोकरी […]



