आयआयटी बॉम्बे कॅम्पस स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सुवर्ण महोत्सवी स्पर्धांमध्ये पीईएचएसच्या विद्यार्थ्यांची कार धावली सुसाट

पवई इंग्लिश हायस्कूलमधील (पीईएचएस) तरुण दूरदर्शी विद्यार्थ्यानी आयआयटी बॉम्बे कॅम्पस स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने आयोजित केलेल्या स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये चमकदार कामगिरी करत कौतुकाची थाप मिळवली आहे. शाळेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शाळेच्या “स्वर्ण-संपदा” सुवर्ण महोत्सवी उत्सवाचा भाग म्हणून या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धांचे आकर्षण होते रोमांचक बॉटरेझ – रेस फ्युचर स्पर्धा, जिथे पीईएचएसच्या संघाने प्रभावी आपला ठसा उमठवत दुसरे पारितोषिक मिळवले. इयत्ता ९ मधील विद्यार्थी शौर्य मदने, दक्ष पांडे आणि सचिन सुथार यांनी ब्लूटूथ, मोबाइल अॅपद्वारे नियंत्रित केलेली एक अत्याधुनिक रोबोट कार तयार केली.

त्यांच्या बॉटने सहा मिनिटांच्या आव्हानात्मक ट्रॅकवर कुशलतेने मार्गक्रमण केले. वक्र-अरुंद वळणे, अडथळे पार करत त्याच्या क्षमतांची चाचणी देण्यासोबतच त्यांचे तांत्रिक कौशल्य आणि टीमवर्क सिद्ध केले.

पीईएचएसच्या इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवले:

इयत्ता ६ अ’मधील सार्थक यादवला रोल प्ले स्पर्धेत त्याच्या कामगिरीसाठी तिसरे पारितोषिक मिळाले, जिथे त्याने ऐतिहासिक व्यक्तिरेखा चाणक्यचे उत्कृष्टपणे मूर्त रूप साकार केले.

दक्ष दळवी आणि कौस्तुभ मोंडे (इयत्ता ८ वी) यांना “ब्रेन बूस्ट बोनान्झा” मध्ये प्रेरणार्थक पारितोषिक मिळाले, जी एक आव्हानात्मक विज्ञान आणि गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा होती.

“यश हे दिवसेंदिवस पुनरावृत्ती होणाऱ्या लहान प्रयत्नांचे आहे,” आणि हे विद्यार्थी निश्चितच त्या विधानाचे सत्य सिद्ध करत आहेत.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!