वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) आबुराव सोनावणे यांनी पवई पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रेते आणि सेवन करणारे यांच्यावर धडक कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडले आहे. शनिवारी पवई पोलिसांनी पुन्हा कारवाई करत १.६ किलो गांजासह एका विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. इर्शाद सरताज अली शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. […]


















