हिरानंदानी, पवई येथील रहिवाशी व व्यावसायिक असणारे कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या संशयात शुक्रवारी पाकिस्तानने बलुचिस्तानमधील चमन येथून अटक केली आहे. ते भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चे अधिकारी असून, ते हेरगिरीसह बलुचिस्तानात फुटीरतावाद्यांना आर्थिक रसद पुरवण्याचे काम करत असल्याचा आरोप पाकिस्तानने त्यांच्यावर ठेवला आहे. भारताच्यावतीने याबाबत स्पष्टीकरण देताना ‘ते नौदलाचे निवृत्त अधिकारी असून, त्यांचा भारत सरकारशी सध्या […]


















