प्रमोद चव्हाण | केवळ एक धूसर सीसीटीव्ही फुटेज व्यतिरिक्त इतर कोणताच पुरावा हातात नसतानाही प्रयत्नाची पराकाष्टा करत पवई पोलिसांनी पवईतील लेक फ्रंट सॉलिटीअर इमारतीत पाईपच्या साहाय्याने चढत २७ लाखाच्या मौल्यवान वस्तू, दागिने चोरी करणाऱ्या स्पायडर चोराच्या २० दिवसाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता १९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. […]




















