मोटारसायकल चोरी म्हणजे पुरुषाचा सहभाग असा समज आहे. पवई येथील एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात मात्र या उलट घडले आहे. पवई पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात एका २१ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पवई पोलिसांनी देवनार डम्पिंग ग्राउंड येथून तिने चोरी केलेली गाडी हस्तगत केली आहे. २६ वर्षीय तक्रारदार किरण पठाडे हे स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम […]
Tag Archives | मुंबई पोलीस
बुधन सावंत यांनी स्वीकारला पवई पोलीस ठाण्याच्या वपोनि पदाचा पदभार
पवई पोलीस ठाण्याचे (Powai police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) आबुराव सोनावणे यांची पदोन्नती झाल्यानंतर गेल्या महिनाभर रिक्त पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बुधन सावंत (SPI Budhan Sawant) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी त्यांनी आपला हा पदभार स्वीकारला. यापूर्वी साकीनाका पोलीस ठाणे (Sakinaka Police Station) येथे कार्यरत असल्याने परिसराची […]
रोटरी क्लब निर्मित पवई पोलीस ठाणे ऑफिसर रूमचे उदघाटन
पवई पोलीस ठाणेतील ऑफिसर रूमचे उदघाटन गुरुवारी रोटरी क्लबचे डिस्ट्रिकट गव्हर्नर राजेंद्र अग्रवाल आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) महेश्वर रेड्डी (DCP Maheshwar Reddy) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी रोटरी क्लब प्रेसिडेंट अमित सेठ, प्रोजेक्ट डायरेक्टर हनुमान त्रिपाठी, नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत (SPI Budhan Sawant), सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी उपस्थित होते. मुंबई पोलीस (Mumbai […]
विमानाने प्रवास करून २८० पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या तिकडीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सुमारे तीन आठवड्यांपूर्वी पवईतील हिरानंदानी भागातील सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरातून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा २४.७१ लाखांचा डल्ला मारल्याच्या आरोपाखाली पवई पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. जलवायू विहार येथे राहणारे माजी नौदल अधिकारी पत्नीसह आगरतळा येथे गेले होते. आपल्या घराची चावी त्यांनी घरकाम करणारी बाई शैला शिर्के यांच्याकडे सोपवल्या होत्या. “शिर्के फक्त घर […]
सोशल माध्यमाव्दारे मैत्री करून २०.४७ लाखाचा गंडा घालणाऱ्या आरोपींना उत्तरप्रदेशमधून अटक; पवई पोलिसांची कारवाई
पवईतील ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी परदेशी नागरिक असल्याचे भासवत सोशल माध्यमात बनावट खाते बनवून, मैत्री करून नंतर मोबाईलवर संपर्क साधत भारतातील गरीब कोविड रुग्णांना मदत म्हणून पैसे पाठवण्याच्या बहाण्याने २०.४७ लाखाची फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना पवई पोलिसांनी शनिवारी नोएडा, उत्तरप्रदेश येथून बेड्या ठोकल्या आहेत. राहुल विनोद तिवारी (वय २१ वर्ष), आसिम समशाद हुसेन (वय २३ […]
गुंडांना सोडण्याची मागणी करणाऱ्या आमदार राम कदमांवर गुन्हा दाखल करा – डॉ. राजन माकणीकर
आपले कर्तव्य बजावत असताना मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्या व्यक्तीला सोडून देण्याची फोनवरून मागणी करणारे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे. पवईतील हिरानंदानी भागात अपघात करून महिलेसोबत वाद घालणाऱ्या ३ तरुणांना पवई पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणारे पोलीस […]
फसवणूकीच्या गुन्ह्यात २ येमेन नागरिकांना पवई पोलिसांनी पुण्यातून केली अटक
मुंबईत उपचार घेत असलेल्या येमेन देशातील सहा सैनिकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन येमेन नागरिकांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. पुणे येथे लपून बसलेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेड्या ठोकल्या आहे. फहद रदवान अल मस्तारी (३३) आणि अली अब्दुलघानी अली अल गौझी (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. येमेनमधील सुरू असलेल्या गृहयुद्धात जखमी झालेले […]
पवईतील तरुणीने कोरोना वॉरिअर्ससोबत साजरा केला आपला वाढदिवस
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलेला असताना कोरोना वॉरिअर्स असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पोलीस असा सगळ्यांबद्दल जनमानसात एक मोठा आदर निर्माण झाला आहे. याचेच एक उदाहरण काल, ४ मे रोजी पवईत पहायला मिळाले. एका तरुणीने आपल्या वाढदिवसाचा आनंद चक्क पवई पोलिसांसोबत साजरा केला. पवईत राहणाऱ्या मलकावा बोमिडी या तरुणीचा ४ मे […]
रुग्णवाहिका चालकांकडून पोलिसांचीही लूट
कोरोनाच्या काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस असे सगळेच आपल्या जीवावर उदार होत नागरिकांच्या रक्षणासाठी लढत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही काही लोकांनी आपले धंदे जोमात आणले आहेत. सार्वजनिक रुग्णवाहिका सगळीकडेच पोहचू शकत नसल्याने काही खाजगी रुग्णवाहिका चालक/मालक मनमानी करत लूट करत असल्याचे समोर येत आहे. नागरिकांना वाचवण्यासाठी काम करणाऱ्या देवदूतांना सुद्धा यांनी सोडले नसून, […]
पवई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
कोरोना विषाणूच्या पकडीपासून कोणीही वाचू शकलेले नसून, आता पवई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पोलीस ठाणे हद्दीत आपले कर्तव्य बजावत असताना दोघांना लागण झाल्याचे समोर येत आहे. दोघानांही त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासोबतच पोलीस ठाण्याच्या ४ कर्मचाऱ्यांना खाजगी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जगभर […]
पोलीस नाईक बावधने यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह – वैद्यकीय अधिकारी
पवई पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असणारे पोलीस नाईक धोंडीबा जाणू बावधने (४८ वर्षे) यांचे राजावाडी रुग्णालयात २० एप्रिल रोजी निधन झाले होते. हा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याची माहिती सोशल माध्यमांसह काही माध्यमांनी प्रसारित केली होती. मात्र, बावधने यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याचे डॉ. विद्या ठाकुर, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय यांनी सांगितले. घाटकोपर येथील […]
पवई पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
देश लॉकडाऊन असताना पवई परिसरात गांजा विक्री करणाऱ्या टोळीतील २ आरोपींना पवई पोलिसांनी अटक केली आहे. इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीकडून पवई पोलिसांनी ४०,५०० रुपये किमतीचा १ किलो ७०० ग्राम वजनाचा गांजा आणि रोकड हस्तगत केली आहे. पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन काळात पवई परिसरात कायदा सुव्यवस्था सुस्थितीत राहावी म्हणून परिसरात नियमित […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९व्या जयंतीनिमित्त चेतनने साकारले पोर्ट्रेट
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
पोलिसांना चेतनची आपल्या कलेतून मानवंदना
@सुषमा चव्हाण | देशावर, समाजावर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या वेळी त्या संकटाशी निधड्या छातीने सामना करायला देशांचे सैन्य आणि पोलीस सदैव तत्पर असतात. सध्या देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबतच पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या या वीरांना पवईकर मोझेक आर्टिस्ट चेतन राऊत याने मास्क धारक पोलीस कर्मचाऱ्याचे पोर्ट्रेट […]
मा. नगरसेवक सोमनाथ सांगळे यांचे नागरिकांना आवाहन
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
‘मीच माझा रक्षक’ – मा. नगरसेवक ईश्वर तायडे यांचे नागरिकांना आवाहन
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांचे नागरिकांना आवाहन
पवई पोलीस ठाणेच्या वपोनि पदी सुधाकर कांबळे
पवई पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) अनिल फोपळे हे सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या जागी वपोनि म्हणून सुधाकर कांबळे यांनी नुकताच पदभार सांभाळला आहे. भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पोलीस दलात सेवा बजावणे पसंत केले आहे. कांबळे हे १९९६च्या बॅचचे अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी डोंगरी, पायधुनी, एमएचबी, आझाद मैदान पोलीस ठाणे अशा अतिसंवेदनशील भागातील पोलीस […]
पवईची वाहतूक कोंडीची समस्या वाहतूक पोलिसांच्या नजरेतून
अरित्रा बॅनर्जी आणि गौरव शर्मा पवईतील वाहतुकीच्या दैनंदिन समस्येमुळे निराश झालेल्या पवईकरांनी गेल्या आठवड्यात फॉरेस्ट क्लब येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमता, भ्रष्टाचार अशी कारणे पुढे करत त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. मात्र मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या नजरेतून ही समस्या एवढी मोठी आहे का? आणि कसे निराकरण करता येईल, त्यांच्यासमोर काय आव्हाने […]
ऑनलाईन गाड्या विकणाऱ्या साईटवर फसवणूक करणाऱ्यास अटक
ऑनलाईन गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटवर गाडी विक्री करणाऱ्या व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने पवई येथून अटक केली आहे. मोहम्मद अय्याज सय्यद (२८) असे त्याचे नवा असून, त्याच्या अटकेमुळे २०१८ पासून अद्यापपर्यंत मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेले अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. गाडी विक्री करणाऱ्या मालकाशी संपर्क साधून त्याला न वटणारा […]