महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार, १३ मार्च रोजी पवई, चांदिवली येथील विकास कामांच्या उदघाटनांचा नारळ फुटला. चांदिवली संघर्षनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम, पवई येथील बौद्ध विहाराचे नुतनीकरण, विस्तार सोबतच समाजकल्याण केंद्र उभारणे आणि स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती स्थळ सुशोभिकरण कामाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थानिक आमदार […]
Tag Archives | chandivali news
चोरीच्या मोटारसायकलवरून ४० दिवसात ४ चोऱ्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
साकीनाका परिसरातून मोटारसायकल चोरी करून मुंबईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सरफराज उमर कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रिमांड होममधून बाहेर येताच केवळ ४० दिवसात या चोरट्याने ४ गुन्हे केले आहेत. एका अल्पवयीनच्या खुनाच्या गुन्ह्यात त्याला डोंगरी रिमांडहोममध्ये ठेवण्यात आले होते. १५ जानेवारी रोजी त्याची रिमांड […]
पोलीस असल्याची बतावणी करून पवईत ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी पळवली
मास्क न घातलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) पोलिस (Police) असल्याचे भासवून फसवणूक (Cheating) केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्याची रुपये ४५,०००० किंमतीची सोनसाखळी (Gold Chain) घेऊन पळ काढला. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. […]
चीनमधील कंपनीचे बनावट ईमेल खाते तयार करून व्यावसायिकाची ३.३ लाख रुपयांची फसवणूक
पवईस्थित एका ५५ वर्षीय व्यावसायिकाची चीनस्थित कंपनीकडून व्यवसायासाठी सुटे भाग मागवण्याच्या बहाण्याने ३.३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदाराने खात्यात पैसे पाठवल्यानंतरही जेव्हा त्याला शिपमेंट प्राप्त झाले नाही तेव्हा त्याने कंपनी आणि बँकेकडे तपासणी केली असता त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात फसवणूक आणि तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला […]
पवईत भाजीच्या टेम्पोने शिक्षिकेला उडवले
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर एका भाजीच्या टेम्पोने शिक्षिकेला उडवल्याची घटना आयआयटी मेनगेटजवळ घडली आहे. या संदर्भात पोलिसांनी भादवि कलम २७९, ३३८ नुसार गुन्हा नोंद करत टेम्पो चालक विजय यादव याला अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा येथून भाजी भरून टेम्पो क्रमांक एमएच ४७ एएस ५०५१ हा पहाटे गोरेगाव येथे भाजी पोहचविण्यासाठी जात […]
मासातर्फे पवईत मासेमारी स्पर्धा
महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशन म्हणजेच मासा संस्थेतफे पवईत मासेमारी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या दरम्यान पवई तलाव येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मेंटोर आली हुसेन यांच्या स्मरणार्थ आयोजित या फिशिंग चम्पिअनशिप २०२१ स्पर्धेत पहिले बक्षीस रोख रक्कम १०००१, दुसरे बक्षीस ५००१ तर तिसरे बक्षीस […]
लोकसभेत सायकल ट्रॅकचा मुद्दा उपस्थित; प्रकल्प बंद करण्याची खासदार मनोज कोटक यांची मागणी
७ डिसेंबर रोजी पवई तलावावरील सायकल ट्रॅक प्रकल्पाचा मुद्दा भाजप खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत उपस्थित केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅकमुळे पवई तलावातील जैवविविधतेला धोका असल्याने हा प्रकल्प लवकरात लवकर थांबवावा अशी मागणी कोटक यांनी केली. पर्यावरण तज्ज्ञांच्या समितीने यापूर्वी सायकल ट्रॅकच्या बांधकामाचे सर्वेक्षण करून हे काम तातडीने थांबविण्याची मागणी केली होती. […]
महागाईच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस ब्लॉक १२२ तर्फे पदयात्रेचे आयोजन
देशात वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने सुरू केलेल्या जन जागरण अभियानाअंतर्गत ब्लॉक क्रमांक १२२च्यावतीने २८ नोव्हेंबर रोजी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई काँग्रेस सचिव डॉ. त्रिलोकीनाथ मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत कपिल देव सिंग, जिल्हा उपाध्यक्ष विजय तिवारी, महेश लिप्चा, गणेश शिंदे, ब्लॉक अध्यक्ष प्रदीप वर्मा, सुनील सिंग, भरत सिंग, अजमत अली […]
मोटारसायकल चोरट्याने अर्ध्या तासात उलगडली गाडी; तासाभरात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई पोलीस ठाणे हद्दीपासून काहीच अंतरावर पार्क केलेली मोटारसायकल पळवून नेऊन अर्ध्या तासात त्याचे पार्ट काढून विकण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या तासाभरात बेड्या ठोकल्या आहेत. इब्राहीम अकबर शेख उर्फ झिपी (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी मोहमद गणी शेख हे कुर्ला कोर्टाजवळ राहतात. १८ तारखेला त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्याने ते […]
३० लाखाचे दागिने चोरी करून पसार झालेल्या इसमास पवई पोलिसांनी ६ तासात ठोकल्या बेड्या
पवईतील ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करून ३० लाख किंमतीच्या दागिन्यांसह पसार झालेल्या एका २६ वर्षीय व्यक्तीला पवई पोलिसांनी अवघ्या ६ तासात बेड्या ठोकल्या आहेत. हिरालाल लेहरुलाल कुमावत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिरालाल यावर्षी २० मे रोजी जामिनावर सुटला होता. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत. दोन वर्षापूर्वी जुगारात हरल्याने कर्ज फेडण्यासाठी […]
पवई, चांदिवलीत मंगळवारी ४९ कोरोना बाधितांची नोंद
मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच पवई आणि चांदिवलीत सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवार, २३ मार्चला एकाच दिवसात पवई आणि चांदिवली परिसरात मिळून ४९ नव्या बाधितांची नोंद पालिकेकडे झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण वर्षभरातील या परिसरातील कोरोना बाधितांची ही सर्वांत मोठी वाढ आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या बाधितांमध्ये इमारत भागात राहणाऱ्या रहिवाशांची […]
पवईत मंगळवारी १२ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित; मुंबईत काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
पवईतील अँकर ब्लॉक येथे तानसा पूर्व सागरी ९०० मी.मी. व्यासाच्या झडपाच्या दुरुस्ती आणि पवई उच्चस्तरीय जलाशय-१च्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. मंगळवार, २३ मार्चला या कामामुळे पालिका ‘एस’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवईतील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व, धारावी, वांद्रे भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पालिका जल […]
१.६ किलो गांजासह पवईत एकाला अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) आबुराव सोनावणे यांनी पवई पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रेते आणि सेवन करणारे यांच्यावर धडक कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडले आहे. शनिवारी पवई पोलिसांनी पुन्हा कारवाई करत १.६ किलो गांजासह एका विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. इर्शाद सरताज अली शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. […]
रामबाग उड्डाणपुलाजवळ डिव्हायडरला धडकून अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यू
पवई, रामबाग उड्डाणपुलाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी रात्री पवईत घडली. २० वर्षीय तरुण विक्रोळीच्या दिशेने जात असताना डिव्हायडरला (दुभाजक) धडकून हा अपघात झाला आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरु आहे. स्वप्नील सुभाष अहिवले (२०) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्रपाळी कर्तव्यावर असणाऱ्या पवई […]
‘शासन तुमच्या दारी’: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिरानंदानीत जन बैठकीचे आयोजन
‘शासन तुमच्या दारी’ संकल्पने अंतर्गत हिरानंदानी भागात रविवार, ३ मार्चला जन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग); महेश्वर रेड्डी, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०); रमेश नांगरे, सहाय्यक आयुक्त (साकीनाका विभाग); आबुराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस ठाणे); पोलीस निरीक्षक दिलीप धामुनसे (गुन्हे); आमदार दिलीप (मामा) लांडे, हिरानंदानी […]
पवईत गांजासह एकाला अटक
पवई परिसरातील मिलिंदनगर भागात गस्त घालत असताना पवई पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीला १ किलो गांजासह अटक केली आहे. कैलाश शेषराव साबळे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवई पोलीस त्याला गांजा विकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था नियंत्रणासाठी पोलिसांकडून पायी गस्त घातली […]
करन्सी एक्स्चेंजच्या नावाखाली महिलेला ५ लाखाचा गंडा
ऑस्ट्रेलिया येथील क्रुज जहाजावर सुरक्षा अधिकारी असणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेला चलन विनिमयच्या (करन्सी एक्स्चेंज) नावाखाली २ महिलांनी ५ लाखाचा गंडा घातला आहे. मरीना गोन्साल्वीस असे फसवणूक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. यासंदर्भात तिने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एक ६० वर्षीय महिला आणि तिची विशीतील महिला साथीदार यांनी मिळून मरीनाची फसवणूक केली […]
‘Crocodile Safari’ at Powai Lake: Aditya Thackeray talks with municipal officials
On Wednesday, February 17 Tourism and Environment Minister Aditya Thackeray discussed the ‘Crocodile Safari’ project at Powai Lake with senior officials of the Mumbai municipal corporation (BMC). Along with Aditya Thackeray, Transport Minister Anil Parab, MLA Ramesh Korgaonkar, Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal, corporators and concerned officials were also present in the meeting. A meeting was held on 17 […]
सराईत मोटारसायकल, मोबाईल चोराला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई आणि आसपासच्या परिसरात मोटारसायकल आणि मोबाईल फोन चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमित मिठ्ठूलाल चौहान (२०) उर्फ बल्ली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, पोलिसांनी त्याच्याकडून एक मोटारसायकल आणि एक महागडा फोन हस्तगत केला आहे. पवई पोलीस परिसरातील मोटारसायकल आणि मोबाईल चोरीचा तपास करत […]
गांजा विक्रेत्याला पवईत अटक
मुंबई अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे नेतृत्व सांभाळणारे आबुराव सोनावणे यांनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) म्हणून कार्यभार सांभाळतच परिसरात अंमलीपदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्या यंत्रणेचे कंबरडे मोडायला सुरुवात केली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच १.९२ लाखाचा गुटखा जप्त केल्यानंतर गुरुवारी कारवाई करत त्यांनी एका गांजा विक्रेत्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. रितिक वाघमारे (२०) असे अटक करण्यात आलेल्या […]