महागडे फोन कस्टम भावात देण्याच्या बहाण्याने फसवणूक करून, काचेचे तुकडे देणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या दोन सदस्यांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पवईतील हिरानंदानी गार्डन भागात फसवणुकीच्या प्रयत्नात असताना हिरानंदानी कमांडोच्या मदतीने पवई पोलिसांनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे विमानाने प्रवास करून ही टोळी मुंबईत येवून गुन्हे करून पुन्हा त्याच मार्गे परतत होती. मोहंमद शेहजाद इरफान सिद्दीकी […]
