Tag Archives | cyber crime

online-cheating-2

गुगलची मदत घेणे पवईकराला पडले महागात, सायबर चोरट्यांनी घातला लाखोंचा गंडा

पवई येथील एका ६ वर्षीय व्यक्तीला आपल्या पुतण्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करायचे होते. यासाठी रुग्णालयाचा फोन नंबर गुगलवर सर्च करणे या पवई कराला चांगलेच महागात पडले आहे. डॉक्टरांना भेटायचे असल्यांस नोंदणी आवश्यक असल्याचे सांगत सायबर चोरट्याने कस्टमर सपोर्ट अँपची लिंक देत असल्याचा बहाणा करून सदर इसमाच्या मोबाईलचा ताबा घेत ४. ८८ लाखाची रक्कम लांबवली. पवई […]

Continue Reading 0
Remarkable action of Powai Police, within a few hours, recovered online fraud amount

पवई पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, काही तासातच परत मिळवली ऑनलाईन फसवणूकीची रक्कम

ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले असून, दिवसभरात कित्येक लोक या सायबर चोर आणि त्यांच्या फसवणुकीला बळी पडत आहेत. या गुन्ह्यांचा तपास आणि रक्कम मिळवणे मोठे आव्हान असते. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात बसून अनोळखी इसम फसवत असतो. मात्र पवई पोलिसांच्या सायबर टीमने नुकत्याच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची संपूर्ण मुंबईभर चर्चा असून, त्यांच्या या कार्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव […]

Continue Reading 0
INR notes cheating copy

आयफोन आणि २० हजार पौंड पाठवण्याच्या नावाखाली महिलेची ४.१५ लाखांची फसवणूक

सोशल मिडीयावर मैत्री करून आयफोन आणि २० हजार पौंड पाठवण्याच्या नावाखाली एका ३३ वर्षीय महिलेची ४.१५ लाखांची फसवणूक केल्याचे नुकतेच पवईत उघडकीस आले आहे. फसवणूककर्त्याने परदेशी नागरिक असल्याची तोतयागिरी करून इंस्टाग्रामवर तिच्याशी मैत्री करत भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. गिफ्ट मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी आणि इतर विविध शुल्क म्हणून ४.१५ लाख रुपये फसवणूककर्त्याने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने उकळले. […]

Continue Reading 0
INR notes cheating copy

तरुणी ऑनलाईन फसवणुकीची शिकार; ६ हजारांच्या कर्जाच्या बदल्यात २२ हजारांची मागणी, अश्लील व्हिडिओही बनवला

इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या या जगात ऑनलाइन फसवणूक सामान्य झाली आहे. दररोज अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत ज्यामध्ये लोक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडतात. अशीच एक घटना साकीनाका परिसरात घडली आहे. येथे एका विद्यार्थ्याने ऑनलाईन लिंकवर क्लिक करून ६ हजारांचे कर्ज घेतले. यानंतर ठगांनी तिच्याकडून १० हजार आणि २२ हजार रुपयांची मागणी केली आणि मुलीने नकार […]

Continue Reading 0
INR notes cheating copy

केवायसी अपडेट फसवणूक: ज्येष्ठ नागरिकाची २.७५ लाख रुपयांची फसवणूक

पवईस्थित एका ६७ वर्षीय व्यावसायिकाची (businessman) अज्ञात भामट्याने ₹२.७५ लाखांची ऑनलाईन फसवणूक (online cheating) केली आहे. टेलिकॉम कंपनीचा प्रतिनिधी (telecom company representative) असल्याचे भासवत ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) स्क्रीन शेअरिंग ऍप (screen sharing app) डाऊनलोड करण्यास सांगत, त्यानंतर त्याने ही रक्कम पळवली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिकाला एका अज्ञात व्यक्तीने (unknown […]

Continue Reading 0
online-cheating-2

बँक कर्मचाऱ्याला सायबर चोरट्याने ६० हजाराला गंडवले

एका राष्ट्रीयीकृत बँकेत (nationalised bank) व्यवस्थापक (manager) म्हणून काम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेला ऑनलाईन केवायसी अपडेटच्या (online KYC update fraud) नावाखाली ६० हजार रुपयांना सायबर चोरट्यांनी (cyber thieves) गंडवले आहे. पवई (Powai) येथे राहणार्‍या या महिलेने बचत खाते असलेल्या बँकेच्या अॅपवर तिच्या पॅनकार्डची माहिती (pan card details) अपडेट करण्यासाठी एसएमएस अलर्टमध्ये प्राप्त झालेल्या नंबरवर कॉल […]

Continue Reading 0
INR notes cheating copy

कोविडच्या नावाखाली विद्यार्थ्याची ४५,००० रुपयांची फसवणूक

मुंबईतील पवईमध्ये रहावयास असणाऱ्या एका विद्यार्थ्याला सायबर चोरट्यांनी ४५,००० रुपयाला गंडवले आहे. सायबर चोरट्याने दिल्लीहून त्याचा मेहुणा बोलत असल्याचा दावा करत तक्रारदार यांना फसवले आहे. तक्रारदार राहुल अग्रवाल (२२) यांनी आपल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, फोन करणार्‍याचा आवाज त्यांच्या मेहुण्यासारखा नसल्यामुळे संशय आला होता, परंतु कॉलरने दावा केला की, त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असून, […]

Continue Reading 0
Powai police arrest 3 accused from Noida for cheating people through social media

सोशल माध्यमाव्दारे मैत्री करून २०.४७ लाखाचा गंडा घालणाऱ्या आरोपींना उत्तरप्रदेशमधून अटक; पवई पोलिसांची कारवाई

पवईतील ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी परदेशी नागरिक असल्याचे भासवत सोशल माध्यमात बनावट खाते बनवून, मैत्री करून नंतर मोबाईलवर संपर्क साधत भारतातील गरीब कोविड रुग्णांना मदत म्हणून पैसे पाठवण्याच्या बहाण्याने २०.४७ लाखाची फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना पवई पोलिसांनी शनिवारी नोएडा, उत्तरप्रदेश येथून बेड्या ठोकल्या आहेत. राहुल विनोद तिवारी (वय २१ वर्ष), आसिम समशाद हुसेन (वय २३ […]

Continue Reading 0
Now-cyber-cells-at-every-police-stations-of-Mumbai-1

शाब्बास पवई पोलीस; सायबर चोरट्याने उडवलेले २ लाख मिळवले परत

सध्याच्या काळात सायबर चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, दररोज कोणी-ना-कोणी त्यांच्या फसवणुकीला बळी पडत आहे. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात बसून तांत्रिक मदतीने गुन्हे करत असल्याने त्यांना पकडणे म्हणजे एक दिव्यच असते. मात्र भल्या भल्या गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवत वठणीवर आणणाऱ्या मुंबई पोलिसांनी या सायबर चोरट्यांना सुद्धा वठणीवर आणण्यास सुरुवात केली आहे. पवई पोलिसांनी अशाच प्रकारे सायबर […]

Continue Reading 0
mobile cyber crime

सायबर फसवणुकीत ऑटोरिक्षा चालकाला १.४ लाखाचा फटका

पवई पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या एका ऑटोरिक्षा चालकाची डिजिटल वॉलेटवर आधारित पेमेंट अ‍ॅप्लिकेशन सेटअप करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने १.४ लाखाची फसवणूक केली आहे. अज्ञात आरोपीने त्या अ‍ॅप्लिकेशन कंपनीचा प्रतिनिधी असून, अ‍ॅप सेटअप आणि बँकेची नोंदणी करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने ऑटोरिक्षा चालकाला फसविले. यासंदर्भात पवई पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित […]

Continue Reading 0
online cheating

केवायसी फसवणूकीत आयआयटीच्या विद्यार्थिनीने गमावले ८६ हजार

पवईस्थित आयआयटी-मुंबईमध्ये एम टेकचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी केवायसी फसवणूकीची नवीनतम बळी ठरली आहे. सायबर चोरट्याने केवायसीच्या नावाखाली तिच्या खात्यातून ८६ हजार रुपये उडवले आहेत. यासंदर्भात पवई पोलीस ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. तक्रारदार तरुणी ही पवईतील आयआयटी-मुंबईमध्ये एम टेकचे शिक्षण घेत आहे. २४ एप्रिलला ती आपल्या कॅम्पसमध्ये असताना तिच्या मोबाईलवर एका […]

Continue Reading 0
online cheating

अभिनेत्याची ८६ हजाराची ऑनलाईन फसवणूक

३३ वर्षीय मालिका अभिनेता नुकताच नवीन ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला आहे. कर्जाची रक्कम सेटलमेंटच्या नावाखाली सायबर चोरट्याने त्याची ८६ हजाराची फसवणूक केली. ई-वॉलेटच्या माध्यमातून शिल्लक कर्जाची माहिती मिळवत सायबर चोरट्याने हा डाव साधला. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पैसे हस्तांतरित झालेल्या बँकेच्या मालाड येथील शाखेतील खाते गोठवत अधिक तपास करत आहेत. या संदर्भात […]

Continue Reading 0
online cheating

चार्टर्ड अकाऊंटंटला ४८ हजाराला गंडा

पवईतील एका चार्टर्ड अकाऊंटंटला त्याच्या घरातील वाय-फाय ब्रॉडबँड सेवेसाठी ऑनलाईन केवायसी करण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने ४८ हजार रुपयाला गंडा घातला आहे. सायबर चोरट्याने एक अॅप डाउनलोड करण्यास सांगत तक्रारदार यांच्या फोनचा रिमोट एक्सेस मिळवून प्रत्येकी २४ हजाराच्या दोन व्यवहाराद्वारे पैसे ट्रान्सफर केले. ७ एप्रिल रोजी तक्रारदार यांनी आपल्या घरात ब्रॉडबँड सेवा सुरु केली होती. […]

Continue Reading 0
phishing

एज्युकेशन लोनच्या नावाखाली आयटी प्रोफेशनलला एक लाखाचा गंडा

पवईकर आणि आयटी प्रोफेशनल असणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी १.१ लाख रुपयांना ऑनलाईन फसवले आहे. सदर महिला एमबीएमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन माहिती शोधत होती. कर्ज घेण्यासाठी आर्थिक संस्थेचा शोध घेत असताना या महिलेने इंटरनेटवर सापडलेल्या नंबरवर संपर्क साधला, परंतु ती तिच्या बचतीतून १.१ लाख रुपये गमावून बसली. या संदर्भात […]

Continue Reading 0
online cheating

ऑनलाईन मोटारसायकल खरेदी करणे तरुणाला पडले महागात; गमावली तिप्पट रक्कम

सेकंडहॅन्ड मोटारसायकल ऑनलाईन खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या २५ वर्षीय तरुणाला ऑनलाईन फसवणूकीत ७२,००० रुपयांची टोपी लागली आहे. २५,००० रुपये किंमतीच्या त्या मोटारसायकल खरेदीत रस असणाऱ्या तरुणाला त्याच्या जवळपास तिप्पट रक्कम गमवावी लागली आहे. यासंदर्भात साकीनाका पोलिस भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करत या प्रकरणाची चौकशी करत […]

Continue Reading 0
online cheating

हिरानंदानीतील पेन्शनधारक फिशिंगचे बळी; गमावले दोन लाख

अनोळखी व्यक्तीला ओटीपी शेअर केल्यामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन येथील एका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक यांना पाच व्यवहारांच्या माध्यमातून १.९५ लाखाचा गंडा पडला आहे. तुम्ही दूरसंचार नियामक प्राधिकरण (टेलिकॉम रेग्युलेटरी औथोरीटी ऑफ इंडिया) म्हणजेच ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. पुढील काळात तुम्हाला पेन्शन बंद होवू शकते. असे कारण देत सायबर भामट्याने हिरानंदानी येथील एका ज्येष्ठ नागरिक […]

Continue Reading 0

ऑनलाईन दारु मागवणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला ८२ हजारांची टोपी

‘अनलॉक १’ मध्ये काही दुकाने आणि व्यवसाय चालू झाली असली तरीही काही दुकानांना उघडण्यास अद्याप  बंदी करण्यात आली आहे. या काळात एका बँक कर्मचाऱ्याला ऑनलाईन दारु मागवणे चांगलेच महागात पडले आहे. आपल्या क्रेडीट कार्डचे डिटेल्स दिल्यामुळे खात्यातून चोरट्यांनी ८२ हजार ५०० रुपयांची रक्कम लांबवत त्याला टोपी घातली आहे. महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वीच दारु ऑनलाईन विक्रीला […]

Continue Reading 1
atm-skimming

डेबिट कार्ड क्लोनिंगद्वारे पवईकराचे १.५ लाख सायबर चोरट्याने पळवले

४२ वर्षीय पवईकराच्या खात्यातील १ लाख ५ हजार रुपयांवर कार्ड क्लोनिगच्या माध्यमातून सायबर चोरट्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पवईमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर येथे राहणारे राम शर्मा (४२) हे सुतारकाम करतात. त्यांचे इंडीयन बँकेच्या भांडूप […]

Continue Reading 3

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!