Tag Archives | Powai Lake
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते सोमवारी पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन करण्यात आले. शाह यांच्यासमवेत उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपस्थित होते. मंत्र्यांचे स्वागत करताना शाळेचे संस्थापक श्री. नाईक म्हणाले की, “शाळेची स्थापना प्रामुख्याने मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आणि नवीन पिढीमध्ये राष्ट्रीय […]
माझा बाप्पा २०२२
दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे गुरुवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. मुंबई – पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. परंतु पाठीमागील २ वर्ष कोरोनाच्या संकटामुळे […]
एस एम शेट्टी इंटरनॅशनल स्कूलतर्फे ‘अमलगाम’, हवामान बदल स्पर्धेचे आयोजन
बंट संघाच्या एस एम शेट्टी शैक्षणिक संस्थांच्या वर्षभर चाललेल्या रौप्यमहोत्सवी उत्सवाचा एक भाग म्हणून, इंटरनॅशनल स्कूलने शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी अवर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या आर एन शेट्टी इनडोअर सभागृहात राज्य मंडळ आणि आंतरराष्ट्रीय शाळा यांच्यातील स्पर्धांची मालिका आयोजित केली होती. यावेळी अमलगम नामक हवामान बदल केंद्रीय थीमवर आधारित स्पर्धा होती. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ८ वेगवेगळ्या […]
पवई तलाव भरुन वाहू लागला
१८९० मध्ये ४० लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक ०५.०७.२०२२) सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरली जाते. गेल्या काही दिवसात या […]
पवई तलावात मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीचा हल्ला
पवई तलावात शनिवारी मासेमारी करत असताना एका ४० वर्षीय आदिवासी व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. व्यक्तीच्या पायाला मगरीने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. विजय काकवे असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पवई तलावात मोठ्या प्रमाणात […]
चांदीवली म्हाडा वसाहतीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; एक किरकोळ जखमी
चांदीवली येथील म्हाडा वसाहतीत असणाऱ्या निसर्ग हाऊसिंग सोसायटीमधील दोन माळ्यांचा स्लॅब कोसळल्याची घटना रविवारी घडली. सुदैवाने दोन्ही घरात कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरात काम करणारा एक कामगार यात किरकोळ जखमी झाला. चांदीवलीतील म्हाडाची ही इमारत सुमारे तीस वर्षे जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. या इमारतीचे बांधकाम साधारणपणे १९९२ – ९३च्या दरम्यान झालेलं आहे. […]
पवईतील समस्यांवर पोलीस, पत्रकार, सामजिक कार्यकर्ते यांच्यात संवाद
पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी शनिवार, १८ जूनला पवई पोलीस ठाण्यातर्फे पोलीस, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात एका संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच तरुणाईमधील वाढती गुन्हेगारीसह विविध प्रश्नावर यावेळी चर्चा करण्यात आली. पोलिस, जनतेच्या समन्वयातून कायदा सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनसेतू तयार होत […]
आमदार लांडेंकडून पावसाळापूर्व कामांची पाहणी; ओपन जिमचे उद्घाटन
मुंबईत पाठीमागील काही दिवसात पावसाच्या हलक्या सरी बरसत मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिलेले आहेत. अशावेळी आपल्या विभागातील पावसाळापूर्व नाले, बंदिस्त गटारे, मलनि:स्सारण वाहिन्या यांच्या स्वच्छतेची कामे व्यवस्थित रित्या झालेली आहेत का? याचा शुक्रवार, १७ जून रोजी स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांनी पाहणी करून आढावा घेतला. तसेच हिरानंदानी येथील उद्यानात बनवण्यात आलेल्या ओपन जिमचे उद्घाटन त्यांच्या […]
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यंग एन्व्हायर्नमेंटतर्फे पवई तलावाच्या किनाऱ्याची स्वच्छता
यंग एन्व्हायर्नमेंट ट्रस्टतर्फे ४ आणि ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पवई तलावाच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुण पर्यावरणवादयांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. हेव्हन्स अॅबोड फाऊंडेशन आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये सुमारे ३०० पेक्षा अधिक सदस्यांसह मोठ्या प्रमाणात महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी […]
लोन अॅपच्या जाळ्यात अडकवून पवईकराला केले ब्लॅकमेल
एका खाजगी कंपनीत नोकरीला असणाऱ्या २८ वर्षीय पवईकराला लोन अॅपच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीविरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार याने घेतलेल्या ५,००० रुपयांच्या कर्जाच्या दुप्पट रक्कम ९,४६४ रुपये परत करूनही अधिक पैसे देण्यास सांगून त्याचा मॉर्फ केलेला फोटो त्याच्या मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टवरील शेकडो लोकांना प्रसारित करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल […]
नॅशनल मास्टर स्पर्धेत एअर रायफल शूटिंग खेळात पवईकराला गोल्ड
जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या पवईतील राजेंद्र जाधव यांनी नॅशनल मास्टर स्पर्धेत एअर रायफल शूटिंग खेळात गोल्ड मिळवत पवईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. यानंतर टोकीओ येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील त्यांची निवड झाली आहे. केरळ (ञिवेद्रम) येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या नॅशनल मास्टर स्पर्धेमध्ये १०मिटर एअर रायफल शूटिंग (पीप साईट) या खेळात […]
स्काईप कॉलवर चाचणी; सिव्हिल इंजिनिअरला परदेशी नोकरीच्या बहाण्याने नऊ लाख रुपयांचा गंडा
एका खाजगी कंपनीत काम करणारा ५२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअर नुकताच परदेशी नोकरीच्या फसवणुकीला बळी पडला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी त्याला यूकेमध्ये नोकरीची ऑफर दिली आणि व्हिसाची व्यवस्था आणि इतर विविध शुल्कासाठी ९ लाख रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. फसवणूक करण्यापूर्वी एक बनावट व्हिडिओ मुलाखतही घेतली. साकीनाका पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, १३ […]
पवईसह मुंबईत अंमलीपदार्थ पुरवठा करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अटक
अटक आरोपी हा पवईसह अंधेरी- गोरेगाव येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच रस्त्यावरील पेडलर्सना मेफेड्रोनचा पुरवठा करत होता. झडतीत त्याच्याकडून ६० लाख किंमतीचे मेफेड्रोन मिळून आले. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे, जो मुंबईतील टॉप ड्रग्ज पुरवठादारांपैकी एक आहे. आरोपीची दिवसाच्या कोणत्याही वेळी कितीही प्रमाणात मेफेड्रोनची डिलिव्हरी करण्यास सक्षम […]
बॉलीवूड संगीत दिग्दर्शकाला सायबर चोरट्यांचा २० हजारांचा गंडा
एका बॉलीवूड संगीत दिग्दर्शकाची २०,००० रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच पवईमध्ये घडली आहे. सायबर चोरट्यांनी पाठवलेल्या एका संदेशावर विश्वास ठेवून त्यातील लिंकवर क्लिक केल्याने संगीत दिग्दर्शकाला २० हजार रुपये गमवावे लागले आहेत. संदेशामध्ये पॅन कार्ड अपडेट न केल्यामुळे त्याचे बँक खाते निलंबित केले जाणार आहे, खाते निष्क्रिय करणे टाळण्यासाठी पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले आणि त्याचे […]
पवई सायकल मार्गिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला राखून
पवई तलावा लगत उभारण्यात येत असलेल्या सायकल मार्गिकेच्या बांधकामाला उच्च न्यायालयात देण्यात आलेल्या आव्हानाचा निर्णय उच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला. पवई तलावा लगत उभारण्यात येत असलेल्या सायकल मार्गिकेच्या बांधकामाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला. या निर्णयावर पालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहणार की जाणार हे अवलंबून असणार […]
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते पवई चांदिवलीत विकास कामांचे उदघाटन
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार, १३ मार्च रोजी पवई, चांदिवली येथील विकास कामांच्या उदघाटनांचा नारळ फुटला. चांदिवली संघर्षनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम, पवई येथील बौद्ध विहाराचे नुतनीकरण, विस्तार सोबतच समाजकल्याण केंद्र उभारणे आणि स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती स्थळ सुशोभिकरण कामाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थानिक आमदार […]
पवई तलावात पुन्हा मगर दर्शन
मुंबईच्या पर्यटन स्थळांपैकी एक असणाऱ्या पवई तलावाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे असणाऱ्या मगरी. पाठीमागील काही वर्षापासून त्यांचे येथील दर्शन दुर्लभ झाले होते, मात्र काही दिवसांपूर्वी पवई तलावावर पुन्हा एकदा मगरीचे दर्शन घडले. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरी असल्याचे सांगितले जाते. आयआयटी मुंबईतील पवई तलाव जवळील परिसर, रेनिसंस हॉटेलजवळील भाग, पवई उद्यानातील तलावाला लागून असणारा […]
पवई तलावाचे पर्यावरणीय मूल्यांकन
मुंबई महानगरपालिकेमार्फत पवई तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करत असताना पर्यावरणीय मापदंड राखले जावेत, यादृष्टिने पालिकेतर्फे पवई तलाव पर्यावरणीय मूल्यमापन संस्था नियुक्त केली जाणार आहे. तलावात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण, तलावाच्या भागातून नियोजित सायकल ट्रॅकच्या कामांसह विविध कारणांमुळे तलावाची होणारी हानी रोखण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी आपले आक्षेप नोंदवले आहेत. […]