सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, वाहनातील वस्तूंची चोरी, वाहन चोरी, पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची लुटालूट करणाऱ्या प्रख्यात इराणी टोळीच्या २ सदस्यांच्या हिरानंदानी कमांडोनी शनिवार, ०३ जानेवारीला मुसक्या आवळल्या आहेत. पकडलेल्या २ तरुणांना पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करत आहेत. मिसम गुलाम अब्बास शेख (२०) आणि अली अजीज सय्यद (१८) अशी […]
Tag Archives | Powai Police
एल अँड टी कंपनीजवळ सिमेंट मिक्सर पलटला
शुक्रवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पवईतील एल अँड टी कंपनीजवळ एक सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास २ तासानंतर क्रेनच्या मदतीने मिक्सर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. यासंदर्भात पवई पोलिसांनी […]
झाडाच्या फांद्या तोडत असताना फांदी पडून एकाचा मृत्यू
पवईमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे वाढलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी कंत्राटदाराने नेमलेल्या २५ वर्षीय कामगाराचा झाडाची फांदी तोडत असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झाडावरील फांद्या तोडत असताना त्यातील एक फांदीखाली चिरडला गेल्याने ही घटना घडली. पवई पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदविला आहे. जसीन साकीर हाश्मी असे या व्यक्तीचे नाव आहे. आंबेडकर उद्यान […]
सराईत मोटारसायकल चोराला अटक, ४ एक्टिवा हस्तगत
पवई परिसरातून फक्त एक्टिवा मोटारसायकली चोरी करणाऱ्या सराईत मोटारसायकल चोराला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पवई पोलिसांनी ४ एक्टिवा मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. नसीर सद्दान खान (५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वीही २०१५ साली त्याला पवई पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ३२ एक्टिवा आणि ४ कार हस्तगत करत मुंबईतील सर्वांत मोठ्या वाहन […]
हिरानंदानीत कुत्रीसोबत अत्याचार करणाऱ्या दुकान कामगाराला अटक
पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या गलेरिया मॉलमध्ये भटकी कुत्री नुरी हिच्यासोबत अत्याचार करून, तिच्या गुप्तांगात लाकडी पट्टी घालून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शंबूनाथ ओटोकांथो प्रधान (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो याच मॉलमधील एका मिठाईच्या दुकानात काम करतो. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्या भागातील डझनभर सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज […]
हिरानंदानीतून पार्क केलेल्या रिक्षाची चोरी
सावधान ! तुमची वाहने कुठेतरी पार्क करून घरी जात असाल तर सावधान. तुमचे वाहन होऊ शकते चोरी. हिरानंदानीतील रस्त्यांवर पार्क केलेली एक ऑटो रिक्षाची चोरी झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. याबाबत रिक्षा मालकाने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. यापूर्वी तुंगागाव येथून एक मोटारसायकल चोरी झाल्याचे समोर येत असून, […]
पवईत उच्चभ्रू इमारतीत चोराने मारला मोठा डल्ला
पवईतील लेक फ्रंट सॉलीटेअर इमारतीत एका चोरट्याने घरफोडी करत मोठा डल्ला मारल्याची घटना सोमवार, २० जुलै रोजी घडली आहे. इमारतीच्या ५व्या मजल्यावर असणाऱ्या ५०२ फ्लॅटमधून चोरट्याने ९ लाख २५ हजाराचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आणि रोकडीवर हात साफ केला आहे. चोरीला गेलेल्या मालमत्तेची नोंद घेणे सुरु असून, हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष […]
हिरानंदानीतील पेन्शनधारक फिशिंगचे बळी; गमावले दोन लाख
अनोळखी व्यक्तीला ओटीपी शेअर केल्यामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन येथील एका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक यांना पाच व्यवहारांच्या माध्यमातून १.९५ लाखाचा गंडा पडला आहे. तुम्ही दूरसंचार नियामक प्राधिकरण (टेलिकॉम रेग्युलेटरी औथोरीटी ऑफ इंडिया) म्हणजेच ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. पुढील काळात तुम्हाला पेन्शन बंद होवू शकते. असे कारण देत सायबर भामट्याने हिरानंदानी येथील एका ज्येष्ठ नागरिक […]
मेडिकल स्टोअर मालकाची ऑनलाईन फसवणूक
पवई येथील मेडिकल आणि जनरल स्टोअरच्या मालकाची ₹ २०,०००ची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी आपली ओळख सैन्य अधिकारी म्हणून करून देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळात नागरिकांना आवश्यकता असणाऱ्या मेडिकल किटची गरज लक्षात घेता, आरोपीने हँड सॅनिटायझर, मास्क आणि हँड ग्लोव्हज ऑर्डर करून त्याचे पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड पाठवत मेडिकल मालकाची ऑनलाईन […]
फसवणूकीच्या गुन्ह्यात २ येमेन नागरिकांना पवई पोलिसांनी पुण्यातून केली अटक
मुंबईत उपचार घेत असलेल्या येमेन देशातील सहा सैनिकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन येमेन नागरिकांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. पुणे येथे लपून बसलेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेड्या ठोकल्या आहे. फहद रदवान अल मस्तारी (३३) आणि अली अब्दुलघानी अली अल गौझी (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. येमेनमधील सुरू असलेल्या गृहयुद्धात जखमी झालेले […]
ऑनलाईन दारु मागवणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला ८२ हजारांची टोपी
‘अनलॉक १’ मध्ये काही दुकाने आणि व्यवसाय चालू झाली असली तरीही काही दुकानांना उघडण्यास अद्याप बंदी करण्यात आली आहे. या काळात एका बँक कर्मचाऱ्याला ऑनलाईन दारु मागवणे चांगलेच महागात पडले आहे. आपल्या क्रेडीट कार्डचे डिटेल्स दिल्यामुळे खात्यातून चोरट्यांनी ८२ हजार ५०० रुपयांची रक्कम लांबवत त्याला टोपी घातली आहे. महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वीच दारु ऑनलाईन विक्रीला […]
वृद्ध दाम्पत्याला दिलासा: वृद्ध दाम्पत्याचे रिक्षात विसरलेले १३ लाखांचे दागिने पवई पोलिसांनी केले परत
पवईत ६ दिवसात २७ लोकांना कोरोनाचा संसर्ग
पवईत कोरोना बाधित मिळण्याचा वेग आता हळूहळू मंदावू लागला आहे. २९ मे ते ३ जून २०२० या पाठीमागील ६ दिवसात २७ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. शुक्रवार २९ मे रोजी ४ जणांना, शनिवार ३० मे रोजी ६ जणांना, रविवार ३१ मे रोजी ५ जणांना, सोमवार १ जून ३ जणांना, मंगळवार २ जून […]
पवईत तीन दिवसात २८ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
पवई (Powai) परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह बाधितांचा आकडा २७० वर पोहचला असून, पाठीमागील तीन दिवसात यात २८ बाधितांची भर पडली आहे. यात मंगळवार २६ मे रोजी ३, बुधवार २७ मे रोजी ९ तर गुरुवार २८ मे रोजी १६ कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) मिळून आले आहेत. एका बाजूला पवईतील बाधितांचा कोरोनामुक्त होत रिकवरी रेट वाढत असतानाच मोठ्या […]
फुलेनगर कोरोना मुक्तीच्या दिशेने, ८५% बाधित बरे होऊन घरी परतले
पवईसह मुंबईत कोरोना बाधितांचा ‘रेड झोन’ म्हणून ओळखले जाणारे पवईतील आयआयटी मार्केटजवळ असणारा महात्मा ज्योतिबा फुलेनगर परिसर आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पूर्वी मिळालेल्या बाधितांपैकी ८५% बाधित कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. पवईच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची नोंद होत असतानाच, पाठीमागील १० दिवसात फक्त ५ बाधितांची नोंद आयआयटी मार्केटजवळ असणाऱ्या फुलेनगर […]
पवईत आज ६ कोरोना बाधितांची नोंद
पवईतील कोरोना बाधितांच्या संख्येने २०० बाधितांचा टप्पा पार केला आहे. सोमवार, २५ मे रोजी यात ६ बाधितांची वाढ झाली आहे. सोमवारी मिळालेल्या बाधितांमध्ये एकाच कुटुंबातील दोघे तर अगोदर मिळून आलेल्या बाधिताच्या परिवारातील व्यक्तीचा समावेश आहे. पालिकेतर्फे हे संपूर्ण परिवार सिल करण्यात आले असून, नागरिकांना सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई भोवती कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस […]
न्यूज अपडेट: गणेशनगर (पंचकुटीर) येथील लेक विव्ह सोसायटीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण
न्यूज अपडेट: रविवार २४ मे, पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) येथील लेक विव्ह सोसायटीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. ते पोलीस खात्यात कार्यरत आहेत. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
न्यूज अपडेट: भवानी टॉवरमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
न्यूज अपडेट: शनिवारी आयआयटी पवई समोरील भवानी टॉवरमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
न्यूज अपडेट: शनिवारी पवईत १० बाधितांची नोंद
न्यूज अपडेट: शनिवारी पवईत १० बाधितांची नोंद. आयआयटी पवई समोरील गरिबनगर, चैतन्यनगर, हनुमान रोड, टाटा पॉवर कॉलोनी येथे कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
पवईत आत्तापर्यंत १७८ कोरोना बाधितांची नोंद; रिकव्हरी रेट ३८%
पवई परिसरात कोरोना बाधितांचा आकडा हा वाढत चालला असून, २१ मे पर्यंत पवई परिसरात १७८ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात ६६ महिला तर ११२ पुरुषांचा समावेश आहे. या आकड्यात सर्वात कमी मार्च महिन्यात तर सर्वात जास्त ही मे महिन्यात कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. दिलासादायक बातमी म्हणजे यात रिकव्हरी रेट हा ३८% वर […]