Tag Archives | sakinaka

lutale

लैंगिक छळाच्या आरोपाखाली तरुणाचे अपहरण करून लुटले

बहिणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करीत पवई पोलिसांच्या हद्दीत तीन अज्ञात इसमांनी एका २६ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्यांच्याजवळील मौल्यवान वस्तू लुटल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पवई पोलिसांनी याबाबत जबरी चोरीच्या आरोपाखाली भारतीय दंड संहिता कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. साकीनाका येथील एका आर्थिक सेवा कंपनीमध्ये तक्रारदार सुनील पाटील सहाय्यक म्हणून […]

Continue Reading 0
eve-teasing-482x300

मराठी अभिनेत्रीच्या विनयभंग प्रकरणी तिघांविरुद्ध साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

५ फेब्रुवारीला पुणे येथील रांजणगाव येथे कार्यक्रमात सादरीकरण करत असताना मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या एका अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नृत्य तारका म्हणून प्रसिद्ध असणारी ही अभिनेत्री चांदिवली येथील नहार कॉम्प्लेक्समध्ये राहते. अभिनेत्रीचा विनयभंग केल्यानंतर तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ज्यानंतर या अभिनेत्रीने साकीनाका […]

Continue Reading 0
arrested

साकीनाका येथे लपून असणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक; अँटी-टेरर सेलची कारवाई

साकीनाका पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाने (एटीसी) आठ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालच्या मार्गाने देशात घुसखोरी करणार्‍या बांगलादेशातील तीन बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली आहे. पाठीमागील ८ वर्षापासून ते साकीनाका येथे वास्तव्यास आहेत. मुनीर शेख (वय ४४) सैफुल मुस्लिम (वय २७) आणि अब्दुल हलीम (वय ३२) वर्षे हे भारतीय नागरिक असल्याचे सांगत या भागात राहत होते. या प्रकरणाच्या सखोल पोलिस […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

चांदिवलीत लवकरच उभे राहणार भव्य प्रसूतिगृह, पालिका दवाखाना

प्रातिनिधिक छायाचित्र @सुषमा चव्हाण स्थानिक नगरसेविका चित्रा सोमनाथ सांगळे यांच्या प्रयत्नातून लवकरच चांदिवलीत सुसज्ज असे प्रसूतिगृह आणि दवाखाना पालिकेच्या माध्यमातून उभे राहणार आहे. हे प्रसूतिगृह चांदिवली म्हाडा परिसरातील आरक्षित भूखंडावर उभे राहणार असून, यासाठी १० कोटी ७१ लाख रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. सदर कामाचा शुभारंभ फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे. पुढील अडीच वर्षात […]

Continue Reading 0
transplant-deceased-building with decease

केस प्रत्यारोपण: डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच मृत्यू; जेजे रुग्णालयाच्या पॅनेलचा अहवाल

केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रक्रियेनंतर चांदिवली येथील ४३ वर्षीय व्यावसायिक श्रवण कुमार चौधरी यांचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी याबाबत चौकशीची मागणी केल्याच्या नऊ महिन्यांनतर अनेक पातळीवर निष्काळजीपणा आढळून आल्याचे राज्यस्तरीय जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणात नुकताच एफआयआर दाखल करण्यात आला असून, डॉक्टरला अध्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक […]

Continue Reading 0
parasailing

पॅरासेलिंगसाठी गेलेल्या साकीनाका येथील युवकाचा मृत्यू

साकीनाका येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षांच्या युवकाचा मालवण किनाऱ्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी पॅरासेलिंग करताना हा अपघात घडला. अझर अन्सारी असं या युवकाचं नाव आहे. तो आणि त्याची पत्नी दोघेही १६ जणांच्या एका गटासोबत पॅरासेलिंग करण्यासाठी गेले होते. साकीनाका येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षांच्या युवकाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनाऱ्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. […]

Continue Reading 0
hidden camera pic

तरुणीचे कपडे बदलताना चित्रीकरण करणाऱ्या नोकराला अटक

आपल्या सहकारी तरुणीचे कपडे बदलाताना चोरुन मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पवईत समोर आला आहे. याबाबत तरुणीच्या लक्षात येताच तिने पवई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पवई पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीच्या आधारावर चित्रीकरण करणारा तरुण प्रदीप रॉय याला बेड्या ठोकल्या आहेत. २३ वर्षीय पिडीत तरुणी आणि आरोपी तरुण हे पवईतील एकाच घरात काम करत असून, एकमेकांना […]

Continue Reading 0
JVLR traffic problem

पवईची वाहतूक कोंडीची समस्या वाहतूक पोलिसांच्या नजरेतून

अरित्रा बॅनर्जी आणि गौरव शर्मा पवईतील वाहतुकीच्या दैनंदिन समस्येमुळे निराश झालेल्या पवईकरांनी गेल्या आठवड्यात फॉरेस्ट क्लब येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमता, भ्रष्टाचार अशी कारणे पुढे करत त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. मात्र मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या नजरेतून ही समस्या एवढी मोठी आहे का? आणि कसे निराकरण करता येईल, त्यांच्यासमोर काय आव्हाने […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

बँक व्यवस्थापक आणि साथीदाराला पाच कोटीची एफडी चोरल्याप्रकरणी अटक

इंडियन ओव्हरसीज बँक साकीनाका शाखेचे माजी व्यवस्थापक त्रिभुवनसिंग रघुनाथ यादव (वय ५०) आणि त्याचा साथीदार मुबारक वाहिद पटेल (वय ५४) यांना साकीनाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. माथाडी कल्याण मंडळाच्या सहा मुदत ठेवींमधून पाच कोटी रुपयांच्या अपहार केल्याच्या आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुबारक पटेल हा आयुर्वेद डॉक्टर आहे. कापड बाजार आणि […]

Continue Reading 0
mumbai police return stolen gold property

वृद्ध दाम्पत्याला दिलासा; रिक्षात विसरलेल्या ४० तोळय़ांच्या दागिन्यांचा छडा लावत गुन्हे शाखेने परतवले

रिक्षातील प्रवासादरम्यान ४० तोळे सोन्याचे दागिन्यांची पिशवी हरवल्यानंतर आयुष्यभराची कमाई गेल्याने निराश झालेल्या एका वृद्ध दाम्पत्याला गुन्हे शाखेने दिलासा मिळवून दिला आहे. आपले  तपास कौशल्य दाखवत रिक्षाचालक आणि त्याच्या एका नातलगाकडून त्यांनी दागिने हस्तगत करत वृद्ध दाम्पत्यास परत मिळवून दिले आहेत. विशेष म्हणजे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे शाखेने त्या दोघांना ताब्यात घेवून, पिशवीतील एका […]

Continue Reading 0
atm-skimming

डेबिट कार्ड क्लोनिंगद्वारे पवईकराचे १.५ लाख सायबर चोरट्याने पळवले

४२ वर्षीय पवईकराच्या खात्यातील १ लाख ५ हजार रुपयांवर कार्ड क्लोनिगच्या माध्यमातून सायबर चोरट्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पवईमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर येथे राहणारे राम शर्मा (४२) हे सुतारकाम करतात. त्यांचे इंडीयन बँकेच्या भांडूप […]

Continue Reading 3
प्रातिनिधिक छायाचित्र

चांदिवली मर्डर केस: संपत्तीच्या वादातून भावानेच केली भावाची हत्या; आरोपी भावाला अटक

चांदिवली संघर्षनगर येथील एका खोलीच्या वादातून आपल्याच मावस भावाचा खून करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. राहुल शहा (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. साकीनाका येथील चांदिवली फार्म रोडकडून संघर्षनगरकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या एमसीजीएम पार्क जमीन भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत कोपऱ्यात पडल्याचा […]

Continue Reading 0
house breaking

नेपाळी सुरक्षारक्षकांच्या टोळीची पवईत ५६ लाखाची चोरी

इमारतीच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या नेपाळी सुरक्षारक्षकांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून फ्लॅटमध्ये घुसून मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत ५६ लाखाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी पवई परिसरात घडला आहे. घरातील मंडळी सुट्टीसाठी परदेशी गेल्याचा फायदा घेत चोरटयांनी आपला डाव साधला आहे. याप्रकरणात पवई पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंद करून सुरक्षारक्षकांचा शोध सुरु केला आहे. कुर्ला […]

Continue Reading 0
lake home

लेकहोममध्ये पुन्हा आग, ३ गंभीर जखमी

चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात […]

Continue Reading 0
Eco Friendly Ganeshas

युवा पर्यावरण प्रेमींनी बनवला इको गणेशा, यंग एन्वायरमेंटलिस्ट्स ट्रस्टचा उपक्रम

गणेशोत्सवाची सगळीकडे धूमधाम सुरु आहे. या उत्सवादरम्यान पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून मिठी नदी आणि पवई लेकच्या मातीपासून शेकडो पर्यावरण प्रेमी तरुणांनी लोकांनी पर्यावरणपूरक गणेशाची निर्मिती केली. यंग एन्वायरमेंटलिस्ट्स प्रोग्राम ट्रस्टने यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी निसर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘इको फ्रेंडली’ गणेशाची कार्यशाळा […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!