मुंबईतील कुपर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पवईतील १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाकडून शनिवारी, १८ एप्रिलला रात्री उशिरा देण्यात आली. काही दिवसांपासून रुग्णालयात ही तरुणी उपचार घेत आहे. या बाधित रुग्णामुळे पवई पोलिसांच्या हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या ११ वर पोहचली आहे, तर पवईतील कोरोना बाधितांची संख्या ९ वर पोहचली आहे. […]
