राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने पवई तलाव भागात ‘क्लीन अप मोहीम’ आयोजित केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण, शालेय विद्यार्थी आणि पवईकरांनी यात सहभाग नोंदवला. आपल्या सर्वांना जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच ताजी हवा, हिरवेगार सभोवतालचे वातावरण आणि स्वच्छ पाण्याची गरज आहे. अर्थातच पर्यावरण रक्षण ही सध्या मोठी गरज होवून बसली आहे. […]



















