करन्सी एक्स्चेंजच्या नावाखाली महिलेला ५ लाखाचा गंडा

करन्सी एक्स्चेंजच्या नावाखाली गंडा

प्रातिनिधिक

ऑस्ट्रेलिया येथील क्रुज जहाजावर सुरक्षा अधिकारी असणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेला चलन विनिमयच्या (करन्सी एक्स्चेंज) नावाखाली २ महिलांनी ५ लाखाचा गंडा घातला आहे. मरीना गोन्साल्वीस असे फसवणूक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. यासंदर्भात तिने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

एक ६० वर्षीय महिला आणि तिची विशीतील महिला साथीदार यांनी मिळून मरीनाची फसवणूक केली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भारतीय चलन डॉलरमध्ये करन्सी एक्स्चेंज करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या महिलांनी तक्रारदार महिलेला आपल्या जाळ्यात ओढले होते. १३ फेब्रुवारीला साकीनाका मेट्रो स्टेशन येथे या महिलांनी तक्रारदार महिलेला बोलावून पैशांची (डॉलर) पिशवी सुपूर्द केली. मरीनाला आपल्या बॅगेत पैशांऐवजी कागद भरून दिले असल्याचे लक्षात आल्यावर तिने सीसीटीव्ही फुटेजसह साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!