महिला सक्षमीकरण: रविकिरण शिक्षण संस्थेतर्फे महिलांचा सन्मान

महिला सक्षमीकरणासाठी मोलाचे योगदान देत असणाऱ्या रविकिरण शिक्षण संस्थेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधत ९ मार्चला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सन्मानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ पवईच्या संचालिका सविता गोविलकर, अध्यक्षा कल्पना जयशंकर यांचा सत्कार करण्यात आला.

गोविलकर आणि जयशंकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला पालक आणि महिला शिक्षकांना मानचिन्हे देत त्यांचा सन्मान करण्यात आला. गोविलकर यांनी यावेळी महिलांच्या सक्षमीकरणावर उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी महिला पालक आणि शाळेतील मुलींनी उत्साहाने करमणुकीचे कार्यक्रम सादर केले.

संस्थेच्या संस्थापक पवार यांनी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईने महिलांच्या मदतीसाठी वेळोवेळी पुढे केलेल्या मदतीच्या हाताबद्दल त्यांचे आभार मानत, पुढील काळात देखील त्यांचे सहकार्य असेच मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d