गांधीनगरजवळ भरधाव कार पलटली, दोन जण जखमी

भरधाव कार पलटलीपवईकडून कांजुरमार्गच्या दिशेने जाणारी भरधाव मोटार कार गांधीनगर पुलाजवळ पलटली. बुधवार, २४ जूनला संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चालकासह एक महिला सुद्धा जखमी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०३ बीएस ८४२८ डस्टर कार जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून (जेविएलआर) मुलुंडच्या दिशेने चालली होती. “भरधाव वेगात जाणारी ही कार पवईतील आयआयटी मार्केट गेट पासून सर्विस रोडवरून वळण पार करून ट्रिनीटी चर्चच्या पुढे जाताच उतारावर अचानक पलटली,” असे प्रत्यक्षदर्शीने याबाबत बोलताना सांगितले.

“कार पलटताच रस्त्यावरील इतर वाहनचालक आणि नागरिक यांनी धाव घेत गाडीत अडकलेल्या चालक आणि एका महिलेला गाडीतून बाहेर काढले. दोघेही जखमी झाले आहेत. गाडी खूप भरधाव चालली होती. चालकाने नशा केली असल्याचे जाणवत होते,” असेही याबाबत बोलताना घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी सांगितले.

संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळात ही घटना घडल्याने या ठिकाणी काही काळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र पोलीस प्रशासनाने त्वरित गाडी बाजूला करत वाहतूक काही वेळातच सुरळीत केली.

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!