बॉलीवूड संगीत दिग्दर्शकाला सायबर चोरट्यांचा २० हजारांचा गंडा

एका बॉलीवूड संगीत दिग्दर्शकाची २०,००० रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच पवईमध्ये घडली आहे. सायबर चोरट्यांनी पाठवलेल्या एका संदेशावर विश्वास ठेवून त्यातील लिंकवर क्लिक केल्याने संगीत दिग्दर्शकाला २० हजार रुपये गमवावे लागले आहेत. संदेशामध्ये पॅन कार्ड अपडेट न केल्यामुळे त्याचे बँक खाते निलंबित केले जाणार आहे, खाते निष्क्रिय करणे टाळण्यासाठी पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले आणि त्याचे बँकिंग तपशील अपलोड केले.

संगीत दिग्दर्शकाने दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिस ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “सायंकाळी संगीत दिग्दर्शक घरी असताना त्यांनी सानेशामध्ये असलेल्या लिंकवर क्लिक केले आणि वन-टाइम पासवर्ड टाकल्यानंतर त्यांच्या खात्यातून त्यांनी पैसे गमावले,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जेणेकरून त्यांच्या खात्यात आणखी काही गैरप्रकार घडू नये म्हणून संगीत दिग्दर्शकाने याबाबत आपल्या बँकेला फसवणुकीच्या व्यवहाराची माहिती दिली आहे. पोलिसांना दिलेल्या जवाबात संगीत दिग्दर्शकाने म्हटले आहे की, त्यांचे खाते निलंबित केले जाईल असा मजकूर असणारा संदेश वाचून ते चिंतित झाल्याने त्यांनी पाठवलेल्या वेबलिंकवर क्लिक केले. लिंकने त्यांना एका पृष्ठावर निर्देशित केले जेथे त्यांनी त्याचे पॅन कार्ड तपशील प्रविष्ट केले आणि सेव्ह पर्याय दाबल्यानंतर त्यांना एक ओटीपीही मिळाला. मात्र माझ्या खात्यातून २०,००० रुपये डेबिट झाल्याचा संदेश प्राप्त होताच माझी फसवणूक झाल्याचे माझ्या लक्षात आले.

आमच्या सायबर पथकाने बँकेकडून पैसे कोणत्या खात्यात जमा झाले याचा तपशील मागवला आहे. तसेच लिंकचा इंटरनेट प्रोटोकॉल आयडी तपशील गोळा करत आहोत, ज्याच्या आधारावर आरोपीला शोधण्यास आणि पकडण्यात मदत होईल,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले, “बँकांकडून ग्राहकांना वारंवार चेतावणी आणि अलर्ट पाठवले जात असतानाही, लोक अशा फसव्या संदेशांमुळे घाबरून सतत अशा सायबर गुन्हेगारांना बळी पडत आहेत.”

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!