shivsena

पवईत शिवसेनेचा विकास कामांचा सपाटा

स्थानिक नगरसेवकांनी लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं असतानाच उद्यानांची डागडुजी, घर घर शौचालय अंतर्गत मलनिसारण वाहिनी टाकण्याचे काम, गर्दुले – नशेखोरांनी मांडलेला उच्छाद मोडून काढण्यासाठी सुरक्षा उपाययोजना, शाळेच्या बसची वाट पाहत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत अशा अनेक प्रश्नांना मार्गी लावत शिवसेनेच्यावतीने पवईत कामाचा सपाटा लावला आहे. मुंबईच्या शिरपेचाचा तुरा असणाऱ्या पवईला गेल्या काही वर्षात अनेक समस्यांनी ग्रासलेले […]

Continue Reading 0
online-scam

सोशल नेटवर्क साईटवर मैत्री करून महिलेला दोन लाखाचा गंडा

पवईतील एका ३४ वर्षीय महिलेशी सोशल नेटवर्किग साईटवर मैत्री करून, भेटवस्तू पाठवण्याच्या बहाण्याने १.७३ लाखाचा गंडा घातल्याचे नुकतेच समोर आले आहे. याबाबत पवई पोलिसांनी भादवि आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. गिता पारेख (बदललेले नाव) या पवईतील अशोकनगर भागात आपल्या दोन मुलींसोबत राहतात. त्यांचे पती मर्चंट नेव्हीमध्ये कामाला […]

Continue Reading 0
wwd

पवईत ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय संस्था तफिसातर्फे जगभर संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ या जागतिक उपक्रमाचा एक भाग म्हणून  ‘ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्टस ॲड फिटनेस फॉर ऑल’च्या वतीने रविवारी हेरिटेज गार्डन हिरानंदानी येथे ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ आणि ‘टेक युवर स्ट्रीट बॅक’चे आयोजन केले गेले होते. यावेळी जगदगुरु सुर्याचार्य कृष्णानंद देवनंदगिरी (मथुरापीठ), अवधूतानंद सरस्वती शंकराचार्य, […]

Continue Reading 0
voter-registration

पवईकरांना मतदार यादीत नाव नोंदवण्याची सुवर्ण संधी

१७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०१६ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३० तिरंदाज शाळेत मोहीम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची, दुरुस्ती करण्याची व ठिकाणाच्या बदलाच्या नोंदणीची सुवर्णसंधी पवईमधील जनतेस चालून आली आहे. आय आय टी येथील तिरंदाज शाळेत यासाठी मतदार नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. स्थानिक नगरसेवक चंदन चित्तरंजन शर्मा यांच्यावतीने तिरंदाज मनपा शाळेत १७ ऑक्टोबर […]

Continue Reading 0
accident

साकीनाका येथे बसखाली येऊन एका तरुणाचा मृत्यू तर एक जण जखमी

मोटरसायकलवरून जात असताना संतुलन बिघडल्याने बेस्ट बसखाली येऊन एका तरुणाचा मृत्यू, तर एक तरुण जखमी झाल्याची घटना काल साकीनाका खैरानी रोडवर घडली. प्रवीण दिलीप पुजारी (२६) असे मृत तरुणाचे नाव असून, पाठीमागे बसलेला सुमित राजेंद्र चंदनशिवे (१७) हा तरुण जखमी झाला आहे. साकीनाका पोलिसांनी बस चालक तानाजी कुंभार (४१) याला अटक करून कोर्टात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली […]

Continue Reading 0
riy-vs-rs

रुपयाच्या बदल्यात रियाल देण्याचा बहाणा करून ठगणाऱ्या ६ जणांना पवई पोलिसांनी केली अटक

पवईत वाटसरू आणि रिक्षाचालकांना रुपयाच्या बदल्यात मोठ्या रकमेचे रियाल देण्याचा बहाणा करून, प्रत्यक्षात मात्र त्यांना कागदी बंडल सोपवून ठगणाऱ्या ६ जणांना पवई पोलिसांनी मुंब्रा येथे चिखलातून पाठलाग करून अटक केली आहे. गोदू शहा उर्फ जुनैद (२८), शाहीद काझी (३५), रिपन फकीर (२५), आलम शेरीफ (३५), उबेद्दुल खान (२३) आणि लियाकत आली (३२) अशी अटक केलेल्या […]

Continue Reading 0
fake-cert

पवई किडनी रॅकेट: खोटी कागदपत्रे बनवणाऱ्या आरोपीला अटक

हिरानंदानी रुग्णालयातून उध्वस्त करण्यात आलेल्या किडनी रॅकेटसाठी खोटी कागदपत्रे बनवून देणाऱ्या व्यक्तीचा सुरु असलेला पवई पोलिसांचा शोध अखेर संपला आहे. पोलिसांसोबत लपाछपीचा डाव खेळत असणाऱ्या सईद अहमद खान (६७) याला पवई पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केली आहे. खानने किडनी रॅकेटचा मुख्य सूत्रधार भेजेंद्र भिसेन याला सर्व खोटी कागदपत्रे पुरवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शनिवारी […]

Continue Reading 0
bmc-ward-no-122

महानगरपालिका निवडणुकीत पवईला आरक्षण

रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रभागांचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. या निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना झाली असून यावेळी महापालिकेच्या २२७ पैकी १५ वॉर्ड अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. पवईतील प्रभाग क्रमांक ११५ चे १२२ तर ११६ चे १२१ प्रभागात विभाजन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १२२ हा ओबीसी महिला आरक्षित झाला आहे, […]

Continue Reading 0
Security-wall-IIT

संरक्षक भिंतीचा प्रश्न म्हाडा आणि पालिका प्रशासनाच्या फेऱ्यात

@ रविराज शिंदे आयआयटी पवई येथील टेकडी भागातील वस्त्यांमध्ये संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, ज्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांना नाहक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जुनाट झालेल्या या संरक्षक भिंतींची डागडुजी करण्यात यावी तसेच काही भागात नवीन संरक्षक भिंत उभारावी अशी  मागणी युथ पॉवर संघटने तर्फे करण्यात आली होती. मात्र याची जबाबदारी चक्क एकमेकांवर […]

Continue Reading 0
dengu-powai

पवईला डेंग्यूचा विळखा, पालिकेकडून नागरिकांमध्ये जनजागृती

@रविराज शिंदे हवामानातील बदलामुळे मुंबईत साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पवईत सुद्धा डेंगू, मलेरिया सारख्या आजारांनी तोंड वर काढले आहे. पवईतील हिरानंदानी हॉस्पिटल, निहाल हॉस्पिटल, पवई हॉस्पिटल,महात्मा फुले महानगर पालिका रुग्णालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर महानगर पालिका रुग्णालयामध्ये डेंग्यूने ग्रस्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. याआजारांबाबत महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागाकडून विशेष जनजागृती अभियान राबवले […]

Continue Reading 0
छायाचित्र: वैभव जाधव, प्रमोद चव्हाण

हिरानंदानीतील ‘के ३’ आगीत जळून खाक

हिरानंदानी मधील वेन्चुरा इमारतीमध्ये असणारे प्रसिद्ध नाष्टा आणि मिठाई दुकान के ३ मंगळवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, मात्र तोपर्यंत संपूर्ण फर्निचर जळून दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पवईकरांच्यात आपले हक्काचे नाष्ट्याचे ठिकाण नष्ट झाल्याची खंत व्यक्त होत आहे. याबाबत पवई पोलिसांनी […]

Continue Reading 0
RTE---ok-image---traffic-ou

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हिरानंदानीतील रस्ते होणार ‘वन वे’

हिरानंदानी परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडीला फोडण्यासाठी हिरानंदानी विकासकाने पाऊले उचलत, आकार अभिनव कन्सल्टंट माध्यमातून वाहतूक समस्येचा अभ्यास केला आहे. समोर आलेल्या माहितीच्या आधारे वाहतूक विभागाला याचा अहवाल सोपवला आहे. या अहवालानुसार हिरानंदानीतील काही रस्ते एकमार्गी (वन वे) करण्याचे सुचवले आहे. गेल्या काही महिन्यात हिरानंदानीत वाहतुकीच्या समस्येने स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. दररोज वाढत जाणाऱ्या या […]

Continue Reading 0
हिरानंदानी येथील बिबट्याचे संग्रहित छायाचित्र

हिरानंदानीत पुन्हा बिबट्या

हिरानंदानीतील सुप्रीम बिसिनेस पार्क जवळील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या स्टोर रूममध्ये येथील कामगाराला गुरुवारी सकाळी बिबट्या आढळून आल्याने परिसरात पुन्हा घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेली तीन वर्ष इथून काही अंतरावरील जंगलात वास्तव्य असणारा बिबट्या खाली उतरून आल्याने पवईकरांची चिंता वाढली आहे. गेल्या तीन वर्षापासून ठराविक कालावधीने हिरानंदानी येथे असणाऱ्या टेकडीवरील जंगल भागात लोकांना बिबट्याचे दर्शन […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

  एका १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी ५ वाजता पवईतील महात्मा फुलेनगरात घडली. पूजा सिद्धार्थ भदरगे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव असून, ती कॉम्पुटर शिक्षण घेत होती. याबाबत पार्कसाईट पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. पूजा ही आपल्या आईवडील व भावंडांसोबत पवईतील फुलेनगरमध्ये राहते. सोमवारी दुपारी […]

Continue Reading 0
छायाचित्र: माझी मेट्रो

साकीनाका येथे मेट्रो समोर तरुणाची आत्महत्या

बिहार येथील एका २५ वर्षीय तरुणाने साकीनाका मेट्रो स्थानकात मेट्रोसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ९.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. मेट्रोच्या समोर आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे सेवा बराचकाळ विस्कळीत झाली होती. मात्र, काही तासाच्या खोळंब्यानंतर हळूहळू सेवा पूर्वपदावर आली. बिहारच्या मधुबनी येथील उदय कुमार मिश्रा (२५) हा सकाळी ९.२० वाजता घाटकोपरकडे जाणारी […]

Continue Reading 0
markant-lila-final

आयआयटी कॅम्पसमध्ये ‘माकड’ चेष्टा

भारतीय प्राध्योगिकी संस्थान (आयआयटी) पवईच्या कॅम्पसमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. वसतिगृहात घुसून, परिसरात कचरा टाकून घाण करणे, सुकण्यासाठी टाकलेली कपडे फेकून देणे, विद्यार्थ्यांच्या वस्तू चोरी करणे अशा कुरापती ही माकडे करत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. साईन – थिटा सारखी अवघड अभियांत्रिकी गणिते सोडवणाऱ्या येथील इंजिनिअर्सना आता या माकडांना पीटा म्हणावे लागत आहे. […]

Continue Reading 0
1

महेश गौडाच्या न्यायासाठी स्थानिकांचा मूक कॅंडल मार्च

विसर्जन काळात जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या महेशच्या मृत्यूस सुरक्षाव्यवस्था आणि विसर्जन व्यवस्था जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी घेऊन मंगळवारी रात्री पवईतील नागरिकांनी पवई प्लाझा ते गणेशनगर गणेश विसर्जन घाट असा मूक कॅंडल मार्च काढला. बुधवारी प्रतिनिधींनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन आपली मागणी ठेवली. रविवारी गणेश विसर्जनासाठी तलावात गेलेल्या महेश […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!