खून करून पसार झालेल्या दोन्ही आरोपींच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चांदिवली येथे खानावळ चालवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाचा चाकूने भोकसून खून करून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पवई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. उधारीवर जेवण देण्यास नकार दिला म्हणून हा खून करण्यात आला होता. विपुल सोळंकी (२२) आणि प्रकाश सोळंकी (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकल सुद्धा हस्तगत केली आहे.

चांदिवली येथे असणाऱ्या आरिफ अन्सारी यांच्या खानावळीवर रविवार, २५ ऑक्टोबर रोजी विपुल हा जेवणासाठी गेला होता. यावेळी आरिफने उधारीवर जेवण देण्यास नकार देत त्याला आधीच्या महिन्याचे शिल्लक बिल भरण्यास सांगितले. चिडून विपुल याने आपला भाऊ प्रकाश याला बोलावून नित्यानंद गॅरेजजवळ आरिफला चाकूने भोकसून तेथून पळ काढला होता.

gaurav sweets

राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान आरिफ याचा मृत्यू झाला होता. भाऊ असिफ याने दिलेल्या जवाबावरून पवई पोलीस सोळंकी बंधूविरुद्ध भादवि कलम ३०२, ३४ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करत होते.

“आरोपी हे मालाड येथील आपल्या नातेवाईकांकडे गेले असल्याची गुप्त माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी विपुल याला तेथून अटक करण्यात आली होती”, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“गुन्हा केल्यानंतर दोन्ही आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणी पळाले होते. प्रकाश हा फोन वापरत नसल्याने मोबाईल लोकेशन मिळवणे सुद्धा शक्य नव्हते. आम्ही आमच्या खबऱ्याचे जाळे कार्यरत करून त्याच्या जाण्याच्या सगळ्या जागेंवर पाळत ठेवून होतो. शनिवारी तो विरार येथील आपल्या एका मित्राकडे आल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळताच आम्ही त्याला अटक केली आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

“अटक दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे,” असे पवई पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दळवी यांनी सांगितले.

गुन्ह्यात वापरलेल्या चाकूचा उपयोग वाढदिवसाचा केक कापण्यासाठी

आरोपी सोळंकी बंधू यांनी खुनाच्या गुन्ह्यात वापरलेला चाकू हे ते नेहमीच आपल्या जवळ बाळगत असत. यापूर्वी आपल्या स्वतःच्या आणि मित्रांच्या वाढदिवसांचे अनेक केक कापण्यासाठी त्यांनी याच चाकूचा वापर केला असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

https://www.facebook.com/alinasalonpowaiiपळून जाण्यासाठी चोरीच्या मोटारसायकलचा वापर

पोलिसांनी आरोपींकडून पळून जाण्यास वापरलेली अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकल सुद्धा हस्तगत केली आहे. “ही मोटारसायकल आरोपींनी चारकोप भागातून चोरी केली असून, याबद्दल तेथे चोरीचा गुन्हा नोंद आहे,” असेही याबाबत बोलताना लाड यांनी सांगितले.

अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!