आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरोधात पवई पोलिसात गुन्हा दाखल

आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ३५ वर्षीय व्यक्तीविरोधात पवई पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश वळवी याची पत्नी सततच्या भांडणाला कंटाळून जानेवारीपासून तिच्या आई-वडिलांसोबत राहत आहे. शनिवारी वळवी आरे रोड येथील तिच्या सासरच्या घरी गेला होता. आपल्या पत्नीला त्याच्याकडे परत पाठवण्याची तो मागणी करत असताना यावरून वाद निर्माण झाला. “वादात रागाच्या भरात वळवी याने स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतले.” असे पवई पोलिसांनी सांगितले.

सासरच्या लोकांनी त्याच्या बचावासाठी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यात आली. “वळवीच्या पोटाला दुखापत होऊन तो बचावला आणि घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर त्याच्या सासरच्या माणसांनी याबाबत पोलिसांना सूचित केले, त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून वळवीविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!