साकीनाका पोलीस ठाणेचे संघर्षनगरजवळ स्थलांतर; खा. पूनम महाजनांच्या हस्ते उद्घाटन

साकीनाका पोलीस ठाण्याच्या चांदिवली म्हाडा येथील इमारतीच्या पुनर्बांधणी प्रकल्पाच्या योजनेमुळे येथील पोलीस ठाणे काही काळासाठी संघर्षनगर येथील एमएमआरडीए इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. मंगळवार २० सप्टेंबरला खासदार पुनम महाजन यांच्या हस्ते या स्थलांतरित पोलीस ठाण्याचा उद्घाटन सोहळा पार पडला असून, येथून कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी खा. महाजन यांच्यासोबतच मुख्य अतिथी म्हणून मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक) विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) महेश्वर रेड्डी, सहाय्यक आयुक्त भारतकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख आणि स्थानिक आमदार दिलीप लांडे उपस्थित होते.

चांदिवली म्हाडा येथे असलेल्या साकीनाका पोलीस ठाणे इमारतीच्या दुरावस्थेमुळे पाठीमागील अनेकवर्ष येथील पोलीस कर्मचारी जिवावर उदार होऊन आपले कर्तव्य निभावत होते. पावसाळ्यात तर अनेकदा या पोलीस ठाण्यात पाणी भरल्याचे पहावयास मिळत होते. याबाबत स्थानिक प्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी सरकार दरबारी सतत पाठपुरावा करत होते. त्याला आता यश प्राप्त झाले असून, या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होत आहे.

तसेच साकीनाका पोलिसांना व्यवस्थित आणि चांगल्या वातावरणात काम करता यावे यासाठी स्थानिक खासदार पूनम महाजन यांच्या प्रयत्नातून जुन्या पोलीस ठाणेपासून काहीच अंतरावर असणाऱ्या संघर्षनगर जवळील एमएमआरडीए इमारतीत हे संपूर्ण पोलीस ठाणे हलवण्यात आले आहे. नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीपर्यंत येथूनच साकीनाका पोलीस ठाण्याचे सर्व कामकाज चालवण्यात येणार असल्याचे साकीनाका पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!