केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर ८ ऑगस्टला झालेल्या विमान दुर्घटनेत १९० प्रवाशांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पावलेले विमानाचे कॅप्टन (विंग कमांडर) दिपक साठे यांच्यावर आज (मंगळवारी) विक्रोळीतील हिंदू स्मशानभूमीत शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या अतुलनीय कामगिरीने प्रेरणादायी इतिहास रचल्याबद्दल चांदिवली नहार येथील त्यांच्या राहत्या घरी भारतीय वायुसेना आणि मुंबई पोलीस दल यांच्यातर्फे मानवंदना देण्यात आली. […]




















