Archive | news

sunil lengare

पवईकर सुनील लेंगारे यांना अभिमान महाराष्ट्राचा, महाराष्ट्र राज्य क्रीड़ा पुरस्कार प्रदान

कराटे क्षेत्रामधील केलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कामगिरी बद्दल पवईकर सुनील लेंगारे यांना “अभिमान महाराष्ट्राचा, महाराष्ट्र राज्य पुरस्कार २०२२” हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यासाठी सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. “अभिमान महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार” सोहळ्यामध्ये यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या एलिजा नेल्सन (इंडियन फील्ड हॉकी प्लेअर), निलेश शेलार (अध्यक्ष किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र), यामिनी […]

Continue Reading 0
depression image

सोशल मीडियावर सुसाईड नोट टाकलेल्या वकिलाची हिरानंदानीतून सुटका

आत्महत्येची पोस्ट करून गायब असणाऱ्या ३६ वर्षीय वकिलाला मुंबई पोलिसांनी शोधून काढत त्याच्या कुटुंबाला दिलासा दिला आहे. वकिलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तीन तासांच्या आत त्याचा शोध घेण्यात आला. पवई येथील जंगल परिसरात तो बसलेला पोलिसांना मिळून आला आहे. पोलिसांनी सांगितले की, नाशिकचे रहिवासी असलेले वकील ४५ दिवसांपूर्वी घाटकोपर, मुंबई येथे आपल्या […]

Continue Reading 0
MLA dilip mama lande review Powai Lake clean-up work1

पवई तलाव स्वच्छतेची आमदारांकडून पाहणी

पवई तलावाची (Powai Lake) दुर्दशा होत चाललेली असतानाच स्थानिक आमदार (MLA) आणि नगरसेविका (Corporator) यांच्या पाठपुराव्याने पवई तलावाने पुन्हा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेतर्फे (BMC) पवई तलावातील जलपर्णी (water hyacinth) काढण्याच्या कामाला आमदार दिलीप मामा लांडे (MLA Dilip Mama Lande) यांच्या हस्ते सोमवारपासून सुरुवात झाली असून, आमदार लांडे यांनी आठवड्याभरानंतर आज, २३ जानेवारीला या […]

Continue Reading 0
Powai police within half an hour recovered passengers lost laptop

पवई पोलिसांनी अर्ध्या तासात शोधला प्रवाशाचा हरवलेला लॅपटॉप

मुंबई पोलीस (Mumbai Police) जगात उच्चस्थानी का आहे याची प्रचीती पवई पोलिसांनी (Powai Police) पुन्हा करून दिली आहे. आपले तपासाचे कौशल्य दाखवत पवई पोलिसांनी केवळ अर्ध्या तासात एका प्रवाशाने नकळतपणे विसरलेली लॅपटॉप बॅग (laptop bag) शोधून काढत त्याला परत मिळवून दिली आहे. पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावणारे हे काम असून, त्यांच्या या कामगिरीबद्दल मुंबई पोलीस वरिष्ठ […]

Continue Reading 0
Mumbai Congress ward 122 Distributed ration kits to the disabled

‘अन्नदान सर्वश्रेष्ठ दान’ मुंबई काँग्रेस प्रभाग १२२च्या उपक्रमांतर्गत दिव्यांगाना रेशन किटचे वाटप

मुंबई काँग्रेस प्रभाग क्रमांक १२२च्या ‘अन्नदान सर्वश्रेष्ठ दान’ उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा काळ लक्षात घेऊन सुमारे १०० गरजू दिव्यांगांना रेशन किट वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, पवई अशा अनेक भागातील लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आणि मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या सेवेत सक्रिय सहभाग घेतला. कोविड – १९ महामारीपासून देशाला काही काळ विश्रांती मिळाल्यानंतर […]

Continue Reading 0
pp1

रोटरी क्लब निर्मित पवई पोलीस ठाणे ऑफिसर रूमचे उदघाटन

पवई पोलीस ठाणेतील ऑफिसर रूमचे उदघाटन गुरुवारी रोटरी क्लबचे डिस्ट्रिकट गव्हर्नर राजेंद्र अग्रवाल आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) महेश्वर रेड्डी (DCP Maheshwar Reddy) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी रोटरी क्लब प्रेसिडेंट अमित सेठ, प्रोजेक्ट डायरेक्टर हनुमान त्रिपाठी, नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत (SPI Budhan Sawant), सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी उपस्थित होते. मुंबई पोलीस (Mumbai […]

Continue Reading 0
Senior journalist Dilip Hazare passes away

ज्येष्ठ पत्रकार दिलीप हजारे यांचे निधन

@रविराज शिंदे झोपडपट्टीवासियांचे ज्वलंत प्रश्न सातत्त्याने आपल्या लेखणीतून मांडणारे ज्येष्ठ पत्रकार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी मुंबई मुख्य संघटक तसेच पवई महात्मा ज्योतिबा फुलेनगरचे संस्थापक दिलीप हजारे यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने वयाच्या ५९व्या वर्षी  निधन झाले आहे. जे जे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. […]

Continue Reading 0
A car caught fire near Powai Lake

पवई तलावाजवळ कारला आग

पवई तलाव मुख्य गणेशघाटाजवळ एका कारला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, घटनेत गाडीचे जळून मोठे नुकसान झाले आहे. टूअर्स अंड ट्राव्हल कंपनीसाठी काम करणारे राजेंद्रकुमार मेहतो हे नेहमी प्रमाणे आपल्या वेगेनॉर गाडीतून (क्रमांक एमएच ०४ जिडी ५१६७) प्रवासी घेवून जेवीएलआर मार्गे कांजूरच्या दिशेने जात होते. […]

Continue Reading 0
online-cheating-2

चीनमधील कंपनीचे बनावट ईमेल खाते तयार करून व्यावसायिकाची ३.३ लाख रुपयांची फसवणूक

पवईस्थित एका ५५ वर्षीय व्यावसायिकाची चीनस्थित कंपनीकडून व्यवसायासाठी सुटे भाग मागवण्याच्या बहाण्याने ३.३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदाराने खात्यात पैसे पाठवल्यानंतरही जेव्हा त्याला शिपमेंट प्राप्त झाले नाही तेव्हा त्याने कंपनी आणि बँकेकडे तपासणी केली असता त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात फसवणूक आणि तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

Continue Reading 0
Youth Power Calendar published by Naka Workers

युथ पॉवर दिनदर्शिकेचे नाका कामगारांच्या हस्ते प्रकाशन

नवतरूणांची संघटना म्हणून कार्यरत असणाऱ्या युथ पॉवर संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पवईत संपन्न झाले. दैनंदिन काम करून घरातील उदरनिर्वाह चालवणाऱ्या कष्टकरी नाकाकामगार बांधव यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. नागरिकांच्या पॉकेटमध्ये बसेल अशी ही मिनी दिनदर्शिका असून, महापुरूषांचे कार्य तसेच इतर माहीती, तारीख वेळेनुसार या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. पवईतील चैतन्यनगर परिसरात असलेल्या कामगारांच्या […]

Continue Reading 0
Cricket tournament in memory of late Chittaranjan sharma

पवई शिल्पकार चषक २०२१’ क्रिकेट स्पर्धेचा उत्साह

रविराज शिंदे पवई युवा प्रतिष्ठानच्यावतीने स्व. मा. चित्तरंजन शर्मा यांच्या स्मरणार्थ ‘पवई शिल्पकार चषक २०२१’ या दोन दिवसीय क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. पवई आयआयटी मेनगेट येथील सिनेमा ग्राऊंडमध्ये भरवण्यात आलेल्या या सामन्यांमध्ये मुंबईभरातील अनेक संघ सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या क्रिकेट स्पर्धेत बेस्ट ऑफ नाईन टिम यांनी प्रथम पारितोषिक २५,००० रूपये सहीत […]

Continue Reading 0
Galleria Circle named as Bharat Ratna Atal Bihari Vajpayee chowk

गलेरिया सर्कलला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव

पवई, हिरानंदानी गार्डन्स येथील गलेरिया सर्कल म्हणजेच काला खंबा चौकाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, सुदीप्तो लाहीरी, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, बिजेपी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. भारताचे माजी पंतप्रधान […]

Continue Reading 0
powai police mohalla committee meeting1

प्रभावी पोलिसिंगसाठी पवईत मोहल्ला कमिटीची बैठक

प्रभावी पोलिसिंगसाठी आणि नागरी समस्या जाणून घेण्यासाठी २३ डिसेंबर रोजी पवई पोलीस ठाण्याच्या बीट क्रमांक ४ येथे मोहल्ला कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. परिमंडळ-१० पोलीस उपायुक्त महेश्वरी रेड्डी यांनी या बैठकीला संबोधित केले. प्रमुख सणांच्या काळात परिसरात शांतता राखण्यासाठी समित्यांच्या विशेष बैठका बोलावल्या जातात. बैठकीला परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी, प्रभारी वरिष्ठ पोलीस […]

Continue Reading 0
teacher-injured-in-vegetable-tempo-accident-in-powai

पवईत भाजीच्या टेम्पोने शिक्षिकेला उडवले

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर एका भाजीच्या टेम्पोने शिक्षिकेला उडवल्याची घटना आयआयटी मेनगेटजवळ घडली आहे. या संदर्भात पोलिसांनी भादवि कलम २७९, ३३८ नुसार गुन्हा नोंद करत टेम्पो चालक विजय यादव याला अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा येथून भाजी भरून टेम्पो क्रमांक एमएच ४७ एएस ५०५१ हा पहाटे गोरेगाव येथे भाजी पोहचविण्यासाठी जात […]

Continue Reading 0
Fishing competition in Powai by MSAA – Maharashtra state angling association

मासातर्फे पवईत मासेमारी स्पर्धा

महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशन म्हणजेच मासा संस्थेतफे पवईत मासेमारी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या दरम्यान पवई तलाव येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मेंटोर आली हुसेन यांच्या स्मरणार्थ आयोजित या फिशिंग चम्पिअनशिप २०२१ स्पर्धेत पहिले बक्षीस रोख रक्कम १०००१, दुसरे बक्षीस ५००१ तर तिसरे बक्षीस […]

Continue Reading 0
bike accident

एस एम शेट्टी शाळेजवळ दोन अपघातात एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

पवईतील एसएम शेट्टी शाळेजवळ घडलेल्या विविध दोन अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या घटनेत एक मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत वाहनचालकांना अटक केली आहे. सलग घडत असलेल्या अपघाताच्या घटनांनी या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, या मार्गावर किमान २ ते ३ स्पीड ब्रेकर बनवण्याची मागणी […]

Continue Reading 0
525 persons vaccinated in free vaccination campaign organized by MNS Ward 122

मनसे प्रभाग १२२तर्फे आयोजित मोफत लसीकरण मोहिमेत ५२५ जणांचे लसीकरण

सोमवार ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रभाग क्रमांक १२२ तर्फे आयोजित एक दिवसीय मोफत लसीकरण मोहिमेत ५२५ जणांना कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. पवईतील गोखलेनगर येथील मनसे कार्यालयात या एकदिवसीय लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. कोविड – १९ या महामारीने जगाला वेठीस धरले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत […]

Continue Reading 0
Spontaneous response to the blood donation camp organized by Powai Runi Foundation.jpeg

पवईत ऋणी फाऊंडेशन आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; रक्तदात्यांचा आकडा २०० पार !

@अविनाश हजारे पवईत ऋणी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपक्रम यशस्वी केला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे पालिका रुग्णालयाच्या ट्रॉमा हेल्थ केअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल २०० तरुणांनी आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन स्वयंस्फूर्तीने यावेळी रक्तदान केले. महाराष्ट्रावर आणि देशावर कोरोनाचे संकट […]

Continue Reading 0
Sunish Subramanian Kunju honoured with “Pillar of the Democracy” Award

प्राणीमित्र सुनिश कुंजू यांना “पिलर ऑफ डेमोक्रसी” पुरस्कार

प्राणीमित्र सुनिश सुब्रमण्यम कुंजू यांना “पिलर ऑफ डेमोक्रसी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ज्येष्ठ पत्रकार डॉ. वैदेही तमन यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कुंजू यांना प्रदान करण्यात आला. कुंजू एक प्राणी प्रेमी, पर्यावरण कार्यकर्ते, प्लांट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी – मुंबई (PAWS-मुंबई) आणि अम्मा केअर फाउंडेशनचे […]

Continue Reading 0
Mumbai Congress Block 122 protest against rising inflation in the country1

महागाईच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस ब्लॉक १२२ तर्फे पदयात्रेचे आयोजन

देशात वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने सुरू केलेल्या जन जागरण अभियानाअंतर्गत ब्लॉक क्रमांक १२२च्यावतीने २८ नोव्हेंबर रोजी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई काँग्रेस सचिव डॉ. त्रिलोकीनाथ मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत कपिल देव सिंग, जिल्हा उपाध्यक्ष विजय तिवारी, महेश लिप्चा, गणेश शिंदे, ब्लॉक अध्यक्ष प्रदीप वर्मा, सुनील सिंग, भरत सिंग, अजमत अली […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!