मुंबईत रिक्षाने फिरण्यासाठी आणि गंमत म्हणून रिक्षा चोरी करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला पवई पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. शाहदत हुसेन शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो पवईतील फिल्टरपाडा भागात राहतो. पवईतील विविध भागातून रिक्षा चोरी झाल्याची तक्रार पवई पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. साकीविहार रोड येथून रिक्षा क्रमांक एमएच ०३ बीवाय १५०९ […]
Archive | Powai News
जेव्हीएलआरवर रिक्षातील प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर पवईतील एनएसजी कॅम्पसमोरील भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या लोकांचे मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सागर चंदू ठाकूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरोनाच्या मोठ्या ब्रेकनंतर मुंबई हळूहळू आता पूर्व पदावर येत आहे. याचवेळी गुन्हेगारी प्रवूत्तीत सुद्धा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पवईतील काही भागात चालत्या […]
आमदार लांडेंकडून पावसाळापूर्व कामांची पाहणी; ओपन जिमचे उद्घाटन
मुंबईत पाठीमागील काही दिवसात पावसाच्या हलक्या सरी बरसत मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिलेले आहेत. अशावेळी आपल्या विभागातील पावसाळापूर्व नाले, बंदिस्त गटारे, मलनि:स्सारण वाहिन्या यांच्या स्वच्छतेची कामे व्यवस्थित रित्या झालेली आहेत का? याचा शुक्रवार, १७ जून रोजी स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांनी पाहणी करून आढावा घेतला. तसेच हिरानंदानी येथील उद्यानात बनवण्यात आलेल्या ओपन जिमचे उद्घाटन त्यांच्या […]
पवईची मेरी कोम: किकबॉक्सिंग स्पर्धेत किमिक्षाचे पुन्हा सुवर्ण
बंट संघाच्या एसएम शेट्टी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या किमिक्षा सिंगने ‘ऑल महाराष्ट्र कॅडेट आणि ज्युनिअर किकबॉक्सिंग चम्पिअनशिप २०२२’मध्ये आपली चुणक दाखवत पुन्हा एकदा अजून एक सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आणि अहमदनगर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विध्यमाने बंधन लॉन येथे पार पडली. स्पर्धेत महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यातील १४६० स्पर्धक सहभागी झाले […]
स्काईप कॉलवर चाचणी; सिव्हिल इंजिनिअरला परदेशी नोकरीच्या बहाण्याने नऊ लाख रुपयांचा गंडा
एका खाजगी कंपनीत काम करणारा ५२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअर नुकताच परदेशी नोकरीच्या फसवणुकीला बळी पडला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी त्याला यूकेमध्ये नोकरीची ऑफर दिली आणि व्हिसाची व्यवस्था आणि इतर विविध शुल्कासाठी ९ लाख रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. फसवणूक करण्यापूर्वी एक बनावट व्हिडिओ मुलाखतही घेतली. साकीनाका पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, १३ […]
बॉलीवूड संगीत दिग्दर्शकाला सायबर चोरट्यांचा २० हजारांचा गंडा
एका बॉलीवूड संगीत दिग्दर्शकाची २०,००० रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच पवईमध्ये घडली आहे. सायबर चोरट्यांनी पाठवलेल्या एका संदेशावर विश्वास ठेवून त्यातील लिंकवर क्लिक केल्याने संगीत दिग्दर्शकाला २० हजार रुपये गमवावे लागले आहेत. संदेशामध्ये पॅन कार्ड अपडेट न केल्यामुळे त्याचे बँक खाते निलंबित केले जाणार आहे, खाते निष्क्रिय करणे टाळण्यासाठी पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले आणि त्याचे […]
पंचसृष्टी रोडच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा नारळ फुटला; मंगळवारपासून कामाला सुरुवात
केवळ हलकी वाहने आणि स्थानिक रहिवाशांच्या वाहनांना या मार्गावरून जाण्यास अनुमती असणार आहे. इतर वाहतूक डीपी रोड क्रमांक ९वरून वळवण्यात आली आहे. पंचसृष्टी रोडच्या विकास कामाचा नारळ फोडल्याच्या वर्षभरानंतर अखेर या कामाला मुहुर्त लागला असून, मंगळवारपासून रोडच्या कामाची सुरुवात होणार आहे. चांदिवलीकडून हिरानंदानीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर (पश्चिम भागात) या कामाची सुरुवात होणार असून, केवळ हलकी […]
पवई सायकल मार्गिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला राखून
पवई तलावा लगत उभारण्यात येत असलेल्या सायकल मार्गिकेच्या बांधकामाला उच्च न्यायालयात देण्यात आलेल्या आव्हानाचा निर्णय उच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला. पवई तलावा लगत उभारण्यात येत असलेल्या सायकल मार्गिकेच्या बांधकामाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला. या निर्णयावर पालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहणार की जाणार हे अवलंबून असणार […]
ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात पवई, चांदिवलीमध्ये साजरी झाली शिवजयंती
सोमवारी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने दणाणला, निमित्त होते ते शिवजन्म उत्सव. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार शिवजयंती जन्मोत्सव सोमवारी साजरा झाला. पवई, चांदिवली भागात देखील सोमवारी मोठ्या उत्साह, जल्लोष आणि ढोल ताशांच्या गजरात महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. पवई चांदिवली भागात शिवप्रेमी तसेच विविध मंडळानी ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात […]
पवई – चांदिवली रंगली होळीच्या रंगात
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते पवई चांदिवलीत विकास कामांचे उदघाटन
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार, १३ मार्च रोजी पवई, चांदिवली येथील विकास कामांच्या उदघाटनांचा नारळ फुटला. चांदिवली संघर्षनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम, पवई येथील बौद्ध विहाराचे नुतनीकरण, विस्तार सोबतच समाजकल्याण केंद्र उभारणे आणि स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती स्थळ सुशोभिकरण कामाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थानिक आमदार […]
हेल्पिंग हँड्स फॉर ह्युमॅनिटी व एमबीए फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; महिलांचा पुढाकार
१३ मार्च रोजी हेल्पिंग हँड्स फॉर ह्युमॅनिटी, एमबीए (गॉड्स) फाउंडेशन आणि डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गरजू रुग्णांसाठी रक्ताची जाणवणारी तीव्र टंचाई असून, रक्तपेढ्यांमध्ये सुद्धा तुटवडा जाणवत आहे. ही गरज ओळखून हे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले होते. यावेळी हिरानंदानी हॉस्पिटलचे सीईओ डॉ. सुदीप चॅटर्जी, मीनाक्षी बालसुब्रमण्यम […]
जागतिक महिला दिनी पवई पोलिसांकडून सन्मान ‘ती’च्या कर्तुत्वाचा
८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पवई पोलिसांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला. आपआपल्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचा परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त डॉ महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. चांदिवली येथील मेगारुगास हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका […]
पवई तलावात पुन्हा मगर दर्शन
मुंबईच्या पर्यटन स्थळांपैकी एक असणाऱ्या पवई तलावाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे असणाऱ्या मगरी. पाठीमागील काही वर्षापासून त्यांचे येथील दर्शन दुर्लभ झाले होते, मात्र काही दिवसांपूर्वी पवई तलावावर पुन्हा एकदा मगरीचे दर्शन घडले. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरी असल्याचे सांगितले जाते. आयआयटी मुंबईतील पवई तलाव जवळील परिसर, रेनिसंस हॉटेलजवळील भाग, पवई उद्यानातील तलावाला लागून असणारा […]
मनसेकडून आदिवासी महिलांना कुकर वाटप
मराठी भाषा निमित्ताने महिलांना ऊर्जा बचतीचे धडे देण्याचे प्रयत्न मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आदिवासी महिलांना कुकर वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला असून, या संकल्पाला पवईमधून सुरुवात झाली आहे. मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष तसेच फ्लाय फाऊंडेशनचे अध्यक्ष मुनाफ ठाकूर यांनी हा उपकम आयोजित केला असून, आगामी महिनाभरात विविध ठिकाणच्या आदिवासी पाड्यांवर १ […]
रोटरी लेकर्सतर्फे पवई पोलीस ठाण्यातील अधिकारी रूमचे नूतनीकरण
रामबाग येथील पवई पोलीस ठाण्यातील अधिकारी रूमचे नूतनीकरण रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सतर्फे नुकतेच करण्यात आले आहे. शुक्रवारी रोटरी क्लब ऑफ मुंबईचे डिस्ट्रीक गव्हर्नर डॉ राजेंद्र अग्रवाल, रोटरी लेकर्स अध्यक्ष निमिष अग्रवाल आणि पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते या रूमचे उद्घाटन पार पडले. यावेळी सिटीझन्स ऑफ पवईचे संजय तिवारी, रोटरी क्लबचे हनुमान त्रिपाठी, दिपक […]
पवईत मनसेकडून लतादीदींना श्रद्धांजली
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. याच दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी आपल्या आवडत्या स्वरसम्राज्ञीला श्रद्धांजली वाहण्यात आली. सोमवारी पवई वॉर्ड क्रमांक १२५ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने लता दीदींना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी पवईतील दीदींचा चाहतावर्ग उपस्थित होता. “लता दीदींना कोणीच विसरु शकत नाही. त्यांची स्मृती गीतातून अजरामर राहील” असे मनसे उपशाखा […]
चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी; ‘जी-पे’वर घेतले जबरी चोरीचे पैसे
आयआयटी मुंबईमध्ये (IIT Mumbai) शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला दोन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी (Robbery) केल्याची घटना पवईत घडली. विशेष म्हणजे जबरी चोरीची रक्कम आरोपींनी आपल्या ‘जी-पे’ (google pay) अकाऊंटवर घेतली होती. पवई पोलिसांनी (Powai police) काही तासातच या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आयुष राजभर (वय १९ वर्ष) आणि सतिश यादव (वय […]
आई-वडिलांनी शाळेत जावू दिले नाही म्हणून बहिण-भावाची सायकलने शाळेकडे धाव
आई वडिलांनी शाळेत जावू दिले नाही म्हणून पवईतील एका भाऊ – बहिणीने बुधवारी सायकलने शाळेकडे धाव घेतली. मात्र मुले न सांगता अचानक गायब झाल्याने पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. माहिती मिळताच पवई पोलिसांनी काही मिनिटातच तांत्रिक माहितीच्या साहाय्याने त्यांना शोधून काढून पालकांच्या स्वाधीन केले. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेज सुरु […]
आजपासून शाळा सुरु, विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
आजपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून राज्यात शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापेक्षा जास्त काळ रिकाम्या पड्लेल्या शाळा आज विध्यार्थ्यांच्या रूपात पुन्हा भरल्या. पवईमध्ये सुद्धा आज अनेक शाळांनी सुरुवात केली. मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवत शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मुलांचे शाळेत स्वागत केले. १ फेब्रुवारीला शाळा सुरु होण्यापूर्वी ३० आणि ३१ जानेवारीदरम्यान शाळांमधील स्वच्छता आणि […]