पवईत जेविएलआरवर दोन अपघातात एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

पवईत जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर सोमवारी संध्याकाळी मोटारसायकलला पाठीमागून धडक देवून झालेल्या दोन भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत दोन्ही अपघातात निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांना अटक केली आहे.

पवईतील रामबाग परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय आरती शंकर हारके या सोमवारी संध्याकाळी १० वाजता आपले मित्र राकेश राठोड यांच्यासोबत मोटारसायकलवरून (एमएच ०३ बीआर ७६६७) जोगेश्वरीवरून पवई येथील आपल्या घराच्या दिशेने प्रवास करत होते. “ते पवई मिलिंद नगर भागात आले असताना याच मार्गावरून पनवेलला जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ४६ बीबी ०७८५ याने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गाडी घसरून आरती रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाल्या”, असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “राकेश यांनी त्यांना मरोळ येथील सेवन हिल रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले.”

या संदर्भात पवई पोलिसांनी भादवि कलम २७९, ३०४ अ, ३३७, ३३८, ३३६ सह मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ, ब) नुसार गुन्हा नोंद करून ट्रक चालक शाम देविदास चव्हाण (२५) याला अटक केली आहे.

दुसऱ्या घटनेत पवई, मोरारजी नगर भागात राहणारे अक्षय कुशवा यांचा मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय असून, सोमवारी संध्याकाळी ते आपली मोटारसायकलवरून (एमएच ०३ डीटी २३७२) महाकाली भागात मोबाईल दुरुस्तीसाठी लागणारे सामान पोहचवण्यासाठी जात होते.

“एल एंड टी बायपास मार्गे सर्विस रोडवरून जोगेश्वरी विक्रोळी मार्गावर येत असताना पवईकडून जोगेश्वरीकडे जाणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रक क्रमांक एमएच ४८ बीएम १५२४ याने त्यांच्या एवेंजर मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर पडून, वाहन अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत”, पवई पोलीस म्हणाले.

सदर बाबत पवई पोलिसांनी भादवि कलम २७९, ३३८ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ (अ,ब) नुसार गुन्हा नोंद करत हयगयीने वाहन चालवून गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यात मिक्सर चालक अर्जुन यादव याला अटक केली आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!