पवई विहार कॉम्प्लेक्स रोडच्या कामाला सुरुवात; रस्ता वाहतूकीसाठी बंद
पाठीमागील अनेक वर्ष दुरावस्थेत असलेल्या पवई विहार कॉम्प्लेक्सच्या अंतर्गत रोडच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आवर्तन पवईने याबाबत पालिका आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. गेल्या आठवड्यात ‘पवई विहारचा रस्ता खड्यात; नागरिक विद्यार्थ्यांचे हाल’ अशा मथळ्याखाली बातमी करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधले होते. खड्डे विषयक तक्रारींवर २४ तासांच्या आत खड्डे […]
आयपीएस अधिकारी असल्याचे भासवत तरुणींची फसवणूक, भामट्याला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या
आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत लग्न जुळवणाऱ्या साईटवर तरुणींशी ओळख वाढवून त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या साकीनाका पोलिसांनी गुरुवारी मुसक्या आवळल्या आहेत. अभिजीत परमेश्वर गाढवे (२६) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घाटकोपर येथून अभिजीतला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. साकीनाका पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यातील फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुण यांची काही दिवसांपूर्वी एका मॅट्रीमोनी साईटवर […]
मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात तरुणीला अटक; भंगारात मिळाली मोटारसायकल
मोटारसायकल चोरी म्हणजे पुरुषाचा सहभाग असा समज आहे. पवई येथील एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात मात्र या उलट घडले आहे. पवई पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात एका २१ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पवई पोलिसांनी देवनार डम्पिंग ग्राउंड येथून तिने चोरी केलेली गाडी हस्तगत केली आहे. २६ वर्षीय तक्रारदार किरण पठाडे हे स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम […]
२.८३ लाखाच्या मोबाईलची चोरी; तडीपार आरोपीला ४ तासात बेड्या
पवई पोलीस ठाणेसह मुंबईच्या हद्दीतून तडीपार असतानाही परिसरात येवून २.८३ लाखाचे मोबाईल चोरी करून पोबारा केलेल्या सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी गुन्ह्याच्या ४ तासातच बेड्या ठोकल्या आहेत. सुरेश दत्ता काकडे (वय २८ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यातील फिर्यादी निशा दास या शुक्रवार, ०८ जुलैला झोपेत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घरात रात्री […]
संडासच्या डब्यावरून भांडण; तरुणाचा खून; पसार झालेल्या दोघांना सोशल मीडियाच्या आधारे दोन तासात अटक
संडासचा डब्बा वापरण्यावरून सुरु झालेल्या वादातून शाब्दिक शिवीगाळ केल्यानंतर मयतावर धारदार शस्त्राने हल्ला करत खून करून आरोपी पसार झाले होते. View this post on Instagram A post shared by AVARTAN POWAI (@avartanpowai) शाब्दिक भांडणानंतर २१ वर्षीय तरुणाची पवई येथे हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यासंदर्भात सोशल मिडीयाच्या मदतीने पवई पोलिसांनी पसार झालेल्या अजय […]
पवई हिरानंदानी मधील हायको सुपरमार्केट इमारतीमध्ये भीषण आग
गुरुवार, ७ जुलैला पहाटे मुंबईत पावसाचे धुमशान सुरू असतानाच पवईतील हिरानंदानी संकुलमधील हायको सुपरमार्केटच्या इमारती मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी सुपरमार्केट बंद असल्यामुळे आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. तळमजला अधिक पाच मजली इमारत असणाऱ्या हायको सुपारमार्केट इमारती मधील पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून अचानकपणे धूर येत असल्याचे येथील […]
पवईत नाल्यातील पाण्याचा डिस्को डान्स; उघडा डोळे, बघून चाला, होणारा अपघात टाळा
पहिल्याच पावसात पवईच्या नालेसफाईची पोलखोल View this post on Instagram A post shared by AVARTAN POWAI (@avartanpowai) पावसाळ्याच्या सुरुवातीला नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्व कामे पूर्ण झाल्याचा गाजावाजा करणाऱ्या पालिका आणि लोकप्रतिनिधींची पहिल्याच पावसात पोलखोल होत असते. पवईमध्ये देखील सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे पालिका आणि लोक प्रतिनिधींनी केलेल्या कामांचे पितळ उघडे पडलेले पाहायला मिळाले. दोन दिवस […]
पवई तलाव भरुन वाहू लागला
१८९० मध्ये ४० लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक ०५.०७.२०२२) सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरली जाते. गेल्या काही दिवसात या […]
पवई कैलासनगर भागात दरड कोसळली
मंगळवारी मुंबईसह उपनगरात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पवई कैलासनगर भागात दरड कोसळण्याची घटना घडली. मंगळवार दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने नागरिकांची कसलीही हानी झाली नाही. दरड कोसळल्याने मोठे दगड रस्त्यात आल्याने रस्ता बंद झाला होता. शिवसेना माजी नगरसेविका सौ चंद्रावती मोरे यांना कळताच त्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्ता साफ […]
हिरानंदानीत ज्वेलरला बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी; सतर्क पोलिस अंमलदारामुळे टळला अनर्थ
गुन्ह्यात वापरलेली होंडा अमेझ कार; चौकटीत गुन्हातील मुख्य सुत्रधार यतीन जैन आणि अमित सिंग एका ज्वेलरला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याची घटना हिरानंदानीतील हायको मॉलसमोर घडत असतानाच पवई पोलीस ठाण्याच्या पोलिस अंमलदार सुनील मसुगडे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मसुगडे यांनी दाखवलेल्या शौर्य आणि सतर्कतेसाठी पोलीस उपायुक्त डॉ महेश्वर रेड्डी यांनी त्यांचे कौतुक करत सन्मान […]
पवई विहारचा रस्ता खड्डयात; नागरिक विद्यार्थ्यांचे हाल
पवई विहार येथील अंतर्गत रस्त्याला बनवण्याचा कामाचा मोठा धुमधडाक्यात गाजावाजा करत शुभारंभ करूनही अखेर या पावसाळ्यात ही रस्ता खड्डयात गेल्याचे समोर येत आहे. यामुळेच या भागात राहणाऱ्या नागरिकांची आणि येथील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच दैना झाली असून, प्रवाशाला येथून घेवून जाण्यास रिक्षावाले मनाई करू लागले आहेत. त्यामुळे किमान रस्ता दुरुस्त तरी करा अशी मागणी आता […]
पवईमध्ये मुंबईतील पहिले झीरो वेस्ट रनचे आयोजन
ब्रूकफील्ड प्रॉपर्टीज, द रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या सहयोगाने पवईमध्ये ‘११व्या पवई रन’चे आयोजन करण्यात आले होते. हे मुंबईतील पहिले झीरो वेस्ट रनचे आयोजन होते. #BreakThePlasticHabitला पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच शून्य कचरा वातावरणात आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्याच्या प्रमुख उद्देशाने ही ४ किमी अंतराची मॅरेथॉन घेण्यात आली. २००० पेक्षा जास्त व्यक्तींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला […]
पवई तलावात मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीचा हल्ला
पवई तलावात शनिवारी मासेमारी करत असताना एका ४० वर्षीय आदिवासी व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. व्यक्तीच्या पायाला मगरीने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. विजय काकवे असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पवई तलावात मोठ्या प्रमाणात […]
मुलींना फॉलो करून त्यांच्याकडे फोन नंबरची मागणी करणाऱ्या २ जणांना एक वर्षाची शिक्षा
मुलींचा पाठलाग केल्याबद्दल सत्र न्यायालयाने मंगळवारी दोन जणांना एक वर्षाचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. २५ नोव्हेंबर २०१३ रोजी एका पॅकेजिंग कंपनीत काम करणारी पीडित साकीनाका येथे कामावरून परतत असताना ही घटना घडली होती. तिच्या एका मैत्रिणीसोबत घरी जात असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचे दोन्ही मुलींच्या लक्षात आले. एका […]
आमदार दिलीप लांडे शिंदे गटात सामिल; संतप्त शिवसैनिकांनी पोस्टर फाडले, पोस्टरला काळे फासले
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच २३ जूनपर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगणारे चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी शुक्रवारी सरळ गुवाहाटीत पोहचत एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. दिलीप लांडे शिंदे गटात सामिल झाल्याचे समजताच शिवसैनिकांचा राग अनावर झाल्याने त्यांनी दिलीप लांडे यांचे पोस्टर फाडत आपला राग व्यक्त केला. तर काही शिवसैनिकांनी त्यांचे कार्यालय […]
महा राजकारण: मनसे पोस्टर वॉरमध्ये सामील, ‘आता कसं वाटतंय’ म्हणत शिवसेनेला टोला
मुंबईतील साकीनाका परिसरात मनसेतर्फे शिवसेनेला उपहासात्मक संदेश देणारे पोस्टर्स लागले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मैदानात उतरली आहे. उपहासात्मक पोस्टर लावत ते या मैदानात उतरले आहेत. ‘शिवसेना’ आणि ‘एकनाथ शिंदे गट’ यांच्यातील सत्तेची चढाओढ सुरू असतानाच मुंबईतील साकीनाका परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे फोटो असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मनसे […]
तरुणी ऑनलाईन फसवणुकीची शिकार; ६ हजारांच्या कर्जाच्या बदल्यात २२ हजारांची मागणी, अश्लील व्हिडिओही बनवला
इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या या जगात ऑनलाइन फसवणूक सामान्य झाली आहे. दररोज अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत ज्यामध्ये लोक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडतात. अशीच एक घटना साकीनाका परिसरात घडली आहे. येथे एका विद्यार्थ्याने ऑनलाईन लिंकवर क्लिक करून ६ हजारांचे कर्ज घेतले. यानंतर ठगांनी तिच्याकडून १० हजार आणि २२ हजार रुपयांची मागणी केली आणि मुलीने नकार […]
एटीएम चोरी करण्यासाठी हरियाणातून विमानाने मुंबईत; साकीनाक्यातून एकाला अटक
कल्याण पूर्व येथील दोन एटीएम फोडून २७ लाख रुपये चोरणारे कुशल आणि हायटेक चोर आपल्या सहकाऱ्यांना चोरीचे मार्गदर्शन करण्यासाठी हरियाणामधून विमानाने मुंबईत आणि तेथून कल्याणमध्ये आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी साकीनाका येथून एकाला अटक केली आहे. सरफुद्दीन खान असे साकीनाका येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरीच्या प्रकरणात […]
पवईला स्वतंत्र वाहतूक विभाग; डॉ. सूर्यवंशींकडे नेतृत्व
पाठीमागील अनेक वर्षांपासून साकीनाका वाहतूक विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या पवई परिसराला आता स्वतःचा स्वतंत्र वाहतूक विभाग मिळाला आहे. साकीनाका पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असणाऱ्या पवई विभागाला डिसेंबर २००२ला स्वतंत्र करत पवई पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती आणि आता २०२२च्या सुरुवातीला पवईला स्वतंत्र वाहतूक विभाग देण्यात आला आहे. पवई वाहतूक विभागाचे प्रमुख पद पोलीस निरीक्षक डॉ. उत्तम […]
गंमत म्हणून चोरायचा रिक्षा; पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबईत रिक्षाने फिरण्यासाठी आणि गंमत म्हणून रिक्षा चोरी करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला पवई पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. शाहदत हुसेन शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो पवईतील फिल्टरपाडा भागात राहतो. पवईतील विविध भागातून रिक्षा चोरी झाल्याची तक्रार पवई पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. साकीविहार रोड येथून रिक्षा क्रमांक एमएच ०३ बीवाय १५०९ […]

