कोविडच्या नावाखाली विद्यार्थ्याची ४५,००० रुपयांची फसवणूक
मुंबईतील पवईमध्ये रहावयास असणाऱ्या एका विद्यार्थ्याला सायबर चोरट्यांनी ४५,००० रुपयाला गंडवले आहे. सायबर चोरट्याने दिल्लीहून त्याचा मेहुणा बोलत असल्याचा दावा करत तक्रारदार यांना फसवले आहे. तक्रारदार राहुल अग्रवाल (२२) यांनी आपल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, फोन करणार्याचा आवाज त्यांच्या मेहुण्यासारखा नसल्यामुळे संशय आला होता, परंतु कॉलरने दावा केला की, त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असून, […]
युथ पॉवर दिनदर्शिकेचे नाका कामगारांच्या हस्ते प्रकाशन
नवतरूणांची संघटना म्हणून कार्यरत असणाऱ्या युथ पॉवर संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पवईत संपन्न झाले. दैनंदिन काम करून घरातील उदरनिर्वाह चालवणाऱ्या कष्टकरी नाकाकामगार बांधव यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. नागरिकांच्या पॉकेटमध्ये बसेल अशी ही मिनी दिनदर्शिका असून, महापुरूषांचे कार्य तसेच इतर माहीती, तारीख वेळेनुसार या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. पवईतील चैतन्यनगर परिसरात असलेल्या कामगारांच्या […]
१०० कोटीचे लोन करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक
व्यवसायासाठी १०० कोटीचे लोन करून देतो असा बहाणा करून एका व्यावसायिकाला २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिलीप सिंग (४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचे इतर दोन साथीदारांचा शोध सुरु आहे. अटक आरोपीकडून पोलिसांनी फसवणूक केलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे. फिर्यादी प्रणव जानी यांचा विलेपार्ले येथे गारमेंटचा […]
खंडणीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगाराला अटक
मिलिंदनगर येथे एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवत धमकावून त्याच्या घरांपैकी एक घर किंवा २ लाख रुपये खंडणी मागितल्याबद्दल गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगार अमीन मोमीन खान (३८) याला बेड्या ठोकल्या आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक कांबळे हे मिलिंदनगर येथे राहतात. २७ नोव्हेंबर रोजी ते आपल्या परिसरात असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास अमीन खान […]
भविष्य निर्वाह निधी परत करण्याच्या बहाण्याने पवईत ७२ वर्षीय वृद्धाची ₹३ लाखांची फसवणूक
भविष्य निर्वाह निधी (provident fund) परत करण्याच्या बहाण्याने ७२ वर्षीय व्यक्तीची ₹३ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल पवई पोलिसांनी फसवणुकीचा (cheating) गुन्हा दाखल केला आहे. ईपीएफओचे अधिकारी असल्याचे भासवून सायबर चोरट्याने हा डाव साधला आहे. फसवणूक करणाऱ्याने ₹६ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी शिल्लक आहे आणि ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शुल्काच्या बहाण्याने पैसे देण्यास भाग पाडले. ७ […]
पवई सायकल ट्रॅकच्या ‘सार्वजनिक सभेबाबत नागरिकांची पालिका आयुक्तांना तक्रार; सार्वजनिक सभा झाल्याचे पालिकेने नाकारले
वादग्रस्त पवई सायकल ट्रॅक प्रकल्पाबाबत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांच्या गटांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे “सार्वजनिक सभे”बाबत तक्रार केली आहे. चहल यांना लिहिलेल्या पत्रात, रहिवाशांनी तक्रार केली आहे की ‘पवई तलावाचे पुनरुज्जीवन” या विषयावर २७ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु केवळ काही रहिवासी आणि कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आणि अधिकारी त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे […]
आयआयटी मार्केट सिग्नल बंद ठेवत नागरिकांच्या जीवाशी खेळ
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेविएलआर) सुरु असणाऱ्या मेट्रो-६च्या कामाच्या नावाखाली बंद ठेवण्यात आलेल्या आयआयटी मार्केटजवळील सिग्नलमुळे स्थानिक नागरिकांना जीवावर उदार होत रस्ता क्रॉस करावा लागत आहे. यामुळे या परिसरात अपघाताची शक्यता वाढली असून, लोकांच्या जीव गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. पाठीमागील काही महिन्यांपासून जोगेश्वरी विक्रोळी मार्गावरून जाणाऱ्या मेट्रो ६ […]
पवई शिल्पकार चषक २०२१’ क्रिकेट स्पर्धेचा उत्साह
रविराज शिंदे पवई युवा प्रतिष्ठानच्यावतीने स्व. मा. चित्तरंजन शर्मा यांच्या स्मरणार्थ ‘पवई शिल्पकार चषक २०२१’ या दोन दिवसीय क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. पवई आयआयटी मेनगेट येथील सिनेमा ग्राऊंडमध्ये भरवण्यात आलेल्या या सामन्यांमध्ये मुंबईभरातील अनेक संघ सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या क्रिकेट स्पर्धेत बेस्ट ऑफ नाईन टिम यांनी प्रथम पारितोषिक २५,००० रूपये सहीत […]
गलेरिया सर्कलला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव
पवई, हिरानंदानी गार्डन्स येथील गलेरिया सर्कल म्हणजेच काला खंबा चौकाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, सुदीप्तो लाहीरी, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, बिजेपी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. भारताचे माजी पंतप्रधान […]
प्रभावी पोलिसिंगसाठी पवईत मोहल्ला कमिटीची बैठक
प्रभावी पोलिसिंगसाठी आणि नागरी समस्या जाणून घेण्यासाठी २३ डिसेंबर रोजी पवई पोलीस ठाण्याच्या बीट क्रमांक ४ येथे मोहल्ला कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. परिमंडळ-१० पोलीस उपायुक्त महेश्वरी रेड्डी यांनी या बैठकीला संबोधित केले. प्रमुख सणांच्या काळात परिसरात शांतता राखण्यासाठी समित्यांच्या विशेष बैठका बोलावल्या जातात. बैठकीला परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी, प्रभारी वरिष्ठ पोलीस […]
पवईत भाजीच्या टेम्पोने शिक्षिकेला उडवले
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर एका भाजीच्या टेम्पोने शिक्षिकेला उडवल्याची घटना आयआयटी मेनगेटजवळ घडली आहे. या संदर्भात पोलिसांनी भादवि कलम २७९, ३३८ नुसार गुन्हा नोंद करत टेम्पो चालक विजय यादव याला अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा येथून भाजी भरून टेम्पो क्रमांक एमएच ४७ एएस ५०५१ हा पहाटे गोरेगाव येथे भाजी पोहचविण्यासाठी जात […]
मासातर्फे पवईत मासेमारी स्पर्धा
महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशन म्हणजेच मासा संस्थेतफे पवईत मासेमारी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या दरम्यान पवई तलाव येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मेंटोर आली हुसेन यांच्या स्मरणार्थ आयोजित या फिशिंग चम्पिअनशिप २०२१ स्पर्धेत पहिले बक्षीस रोख रक्कम १०००१, दुसरे बक्षीस ५००१ तर तिसरे बक्षीस […]
५० वर्षीय लॅपटॉप चोराला अटक
हिरानंदानी भागातून लॅपटॉप चोरी करून पसार झालेल्या ५० वर्षीय चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उमेश रतिलाल परमार असे अटक आरोपींचे नाव असून, तो कार चालक म्हणून काम करतो. पोलिसांनी आरोपीकडून चोरीचा लॅपटॉप हस्तगत केला आहे. भारतीय शसस्त्र सेनेत कॅप्टन म्हणून कार्यरत असणारे फिर्यादी अमित राय हे आपल्या एका मित्रासोबत हिरानंदानी येथील पवई सोशलमध्ये जेवणासाठी […]
पवई पोलिसांनी अर्ध्या तासात शोधली प्रवाशाची हरवलेली बॅग
मुंबई पोलीस हे जगातील दुसऱ्या क्रमांकावर का आहे याची पुष्टी करणारी घटना नुकतीच पवई परिसरात समोर आली आहे. आपले कौशल्य दाखवत पवई पोलिसांनी पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावणारे हे काम केले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मुंबई पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच मुंबईकरांकडून सुद्धा त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे. शिक्षिका असणाऱ्या प्रियांका साळुंखे यांनी सोमवारी पवईतील हिरानंदानी भागातून […]
दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक, ९ मोटारसायकली जप्त
पोलिसांनी दोन मोटारसायकल चोरांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४.५५ लाख रुपये किंमतीच्या नऊ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यातील एक मोटारसायकल या चोरट्यांनी पवई परिसरातून चोरी केली आहे. जितेश सुरेश काळुखे (२५) आणि अरुण मतांग (२४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, दोघेही घाटकोपरचे रहिवासी असून, पार्ट-टाईम केटरिंगचे काम करतात. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ […]
रहेजा विहारमध्ये वकिलाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
रहेजा विहार येथे राहणाऱ्या ६३ वर्षीय वकिलांनी इमारतीच्या २० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक दाजी जाधव असे आत्महत्या करणाऱ्या या व्यक्तीचे नाव असून, स्मृतीभृंश झाला असल्याने त्यांनी हे पाउल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहेजा विहार येथील सिल्वर क्रेस्ट इमारतीत राहणारे जाधव हे व्यवसायाने वकील होते. कोरोना […]
एस एम शेट्टी शाळेजवळ दोन अपघातात एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी
पवईतील एसएम शेट्टी शाळेजवळ घडलेल्या विविध दोन अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या घटनेत एक मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत वाहनचालकांना अटक केली आहे. सलग घडत असलेल्या अपघाताच्या घटनांनी या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, या मार्गावर किमान २ ते ३ स्पीड ब्रेकर बनवण्याची मागणी […]
लोकसभेत सायकल ट्रॅकचा मुद्दा उपस्थित; प्रकल्प बंद करण्याची खासदार मनोज कोटक यांची मागणी
७ डिसेंबर रोजी पवई तलावावरील सायकल ट्रॅक प्रकल्पाचा मुद्दा भाजप खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत उपस्थित केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅकमुळे पवई तलावातील जैवविविधतेला धोका असल्याने हा प्रकल्प लवकरात लवकर थांबवावा अशी मागणी कोटक यांनी केली. पर्यावरण तज्ज्ञांच्या समितीने यापूर्वी सायकल ट्रॅकच्या बांधकामाचे सर्वेक्षण करून हे काम तातडीने थांबविण्याची मागणी केली होती. […]
पवईत भरधाव डंपर मेट्रो बॅरिकेडवर धडकला; सुरक्षारक्षक जखमी
पवईतील बांधकामाधिन मेट्रो साइईटवर बुधवारी पहाटे एका वेगवान डंपरने बॅरिकेडला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात येथे तैनात असलेला ५३ वर्षीय सुरक्षा रक्षक जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला, मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. पवई पोलिसांनी डंपर चालक रेहमान शेख (३२) याला भादवि कलमांखाली बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी आणि जीव धोक्यात घातल्याप्रकरणी अटक केली आहे. ही […]
चांदिवलीत मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन म्हणून ‘सावली सेवा फाऊंडेशन’च्यावतीने १८ डिसेंबर रोजी सकाळीं १०:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत एकदिवसीय कोविड लसीकरण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. चांदिवली येथील सिंहगड कॉलेज, म्हाडा कॉलनी येथे ही लसीकरण मोहीम राबवली जाणार असून, कोविड-१९ पासून सुरक्षेसाठी शासन मान्य पहिला आणि दुसरा कोव्हीशिल्ड (Covishild) लसीचा डोस यावेळी […]

