पवई तलावातील जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात
पर्यटकांचे खास आकर्षण असणाऱ्या पवई तलावाची पाठीमागील काही वर्षात दुर्दशा होत चालली आहे. पवई तलावात सोडले जाणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणी दूषित होवून तलावात जलपर्णी निर्माण झाल्या आहेत. तलावाच्या किनाऱ्यावरील सुशोभिकरण दुर्लक्षित झाल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पालिका आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे पवई तलावाला हे दिवस भोगावे लागले आहेत. मात्र आता या संकटापासून तलावाला मुक्ती मिळणार असून, […]
जेविएलआरवर कचऱ्याच्या ट्रकने महिलेला चिरडले; एक किरकोळ जखमी
शनिवारी एका कचऱ्याच्या ट्रकने जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून (जेविएलआर) प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला चिरडल्याची दुर्दैवी घटना पवईमध्ये घडली. महिला आपल्या मुलासोबत मोटारसायकलवरून प्रवास करत होती. या घटनेत महिलेचा मुलगा किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवई पोलिसांनी ट्रक चालक अलाउद्दीन सालौद्दिन शेख (२२) याला अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी […]
बुधन सावंत यांनी स्वीकारला पवई पोलीस ठाण्याच्या वपोनि पदाचा पदभार
पवई पोलीस ठाण्याचे (Powai police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) आबुराव सोनावणे यांची पदोन्नती झाल्यानंतर गेल्या महिनाभर रिक्त पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बुधन सावंत (SPI Budhan Sawant) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी त्यांनी आपला हा पदभार स्वीकारला. यापूर्वी साकीनाका पोलीस ठाणे (Sakinaka Police Station) येथे कार्यरत असल्याने परिसराची […]
रोटरी क्लब निर्मित पवई पोलीस ठाणे ऑफिसर रूमचे उदघाटन
पवई पोलीस ठाणेतील ऑफिसर रूमचे उदघाटन गुरुवारी रोटरी क्लबचे डिस्ट्रिकट गव्हर्नर राजेंद्र अग्रवाल आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) महेश्वर रेड्डी (DCP Maheshwar Reddy) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी रोटरी क्लब प्रेसिडेंट अमित सेठ, प्रोजेक्ट डायरेक्टर हनुमान त्रिपाठी, नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत (SPI Budhan Sawant), सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी उपस्थित होते. मुंबई पोलीस (Mumbai […]
ज्येष्ठ पत्रकार दिलीप हजारे यांचे निधन
@रविराज शिंदे झोपडपट्टीवासियांचे ज्वलंत प्रश्न सातत्त्याने आपल्या लेखणीतून मांडणारे ज्येष्ठ पत्रकार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी मुंबई मुख्य संघटक तसेच पवई महात्मा ज्योतिबा फुलेनगरचे संस्थापक दिलीप हजारे यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने वयाच्या ५९व्या वर्षी निधन झाले आहे. जे जे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. […]
मी कुणासाठीही थांबत नाही
@ परिस ( प्रसाद वाघ ) समुद्राच्या किनाऱ्यावरुन तो धावत सुटला होता. मी त्याला मागून कितीतरी हाका मारल्या. वाळूत रुतलेल्या त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत मी रेंगाळत होतो. पठ्ठ्या काही थांबायचे नाव घेईना. शेवटी मी त्याच्या पावलांवर पाऊल टेकवायचा खुळा नाद सोडून दिला. थोडीशी गती वाढवली आणि त्याच्या शेजारी येवून पळायला लागलो. हाय ! _ हाय […]
पवई तलावाजवळ कारला आग
पवई तलाव मुख्य गणेशघाटाजवळ एका कारला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, घटनेत गाडीचे जळून मोठे नुकसान झाले आहे. टूअर्स अंड ट्राव्हल कंपनीसाठी काम करणारे राजेंद्रकुमार मेहतो हे नेहमी प्रमाणे आपल्या वेगेनॉर गाडीतून (क्रमांक एमएच ०४ जिडी ५१६७) प्रवासी घेवून जेवीएलआर मार्गे कांजूरच्या दिशेने जात होते. […]
चीनमधील कंपनीचे बनावट ईमेल खाते तयार करून व्यावसायिकाची ३.३ लाख रुपयांची फसवणूक
पवईस्थित एका ५५ वर्षीय व्यावसायिकाची चीनस्थित कंपनीकडून व्यवसायासाठी सुटे भाग मागवण्याच्या बहाण्याने ३.३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदाराने खात्यात पैसे पाठवल्यानंतरही जेव्हा त्याला शिपमेंट प्राप्त झाले नाही तेव्हा त्याने कंपनी आणि बँकेकडे तपासणी केली असता त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात फसवणूक आणि तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला […]
कोविडच्या नावाखाली विद्यार्थ्याची ४५,००० रुपयांची फसवणूक
मुंबईतील पवईमध्ये रहावयास असणाऱ्या एका विद्यार्थ्याला सायबर चोरट्यांनी ४५,००० रुपयाला गंडवले आहे. सायबर चोरट्याने दिल्लीहून त्याचा मेहुणा बोलत असल्याचा दावा करत तक्रारदार यांना फसवले आहे. तक्रारदार राहुल अग्रवाल (२२) यांनी आपल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, फोन करणार्याचा आवाज त्यांच्या मेहुण्यासारखा नसल्यामुळे संशय आला होता, परंतु कॉलरने दावा केला की, त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असून, […]
युथ पॉवर दिनदर्शिकेचे नाका कामगारांच्या हस्ते प्रकाशन
नवतरूणांची संघटना म्हणून कार्यरत असणाऱ्या युथ पॉवर संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पवईत संपन्न झाले. दैनंदिन काम करून घरातील उदरनिर्वाह चालवणाऱ्या कष्टकरी नाकाकामगार बांधव यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. नागरिकांच्या पॉकेटमध्ये बसेल अशी ही मिनी दिनदर्शिका असून, महापुरूषांचे कार्य तसेच इतर माहीती, तारीख वेळेनुसार या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. पवईतील चैतन्यनगर परिसरात असलेल्या कामगारांच्या […]
१०० कोटीचे लोन करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक
व्यवसायासाठी १०० कोटीचे लोन करून देतो असा बहाणा करून एका व्यावसायिकाला २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिलीप सिंग (४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचे इतर दोन साथीदारांचा शोध सुरु आहे. अटक आरोपीकडून पोलिसांनी फसवणूक केलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे. फिर्यादी प्रणव जानी यांचा विलेपार्ले येथे गारमेंटचा […]
खंडणीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगाराला अटक
मिलिंदनगर येथे एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवत धमकावून त्याच्या घरांपैकी एक घर किंवा २ लाख रुपये खंडणी मागितल्याबद्दल गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगार अमीन मोमीन खान (३८) याला बेड्या ठोकल्या आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक कांबळे हे मिलिंदनगर येथे राहतात. २७ नोव्हेंबर रोजी ते आपल्या परिसरात असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास अमीन खान […]
भविष्य निर्वाह निधी परत करण्याच्या बहाण्याने पवईत ७२ वर्षीय वृद्धाची ₹३ लाखांची फसवणूक
भविष्य निर्वाह निधी (provident fund) परत करण्याच्या बहाण्याने ७२ वर्षीय व्यक्तीची ₹३ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल पवई पोलिसांनी फसवणुकीचा (cheating) गुन्हा दाखल केला आहे. ईपीएफओचे अधिकारी असल्याचे भासवून सायबर चोरट्याने हा डाव साधला आहे. फसवणूक करणाऱ्याने ₹६ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी शिल्लक आहे आणि ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शुल्काच्या बहाण्याने पैसे देण्यास भाग पाडले. ७ […]
पवई सायकल ट्रॅकच्या ‘सार्वजनिक सभेबाबत नागरिकांची पालिका आयुक्तांना तक्रार; सार्वजनिक सभा झाल्याचे पालिकेने नाकारले
वादग्रस्त पवई सायकल ट्रॅक प्रकल्पाबाबत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांच्या गटांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे “सार्वजनिक सभे”बाबत तक्रार केली आहे. चहल यांना लिहिलेल्या पत्रात, रहिवाशांनी तक्रार केली आहे की ‘पवई तलावाचे पुनरुज्जीवन” या विषयावर २७ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु केवळ काही रहिवासी आणि कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आणि अधिकारी त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे […]
आयआयटी मार्केट सिग्नल बंद ठेवत नागरिकांच्या जीवाशी खेळ
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेविएलआर) सुरु असणाऱ्या मेट्रो-६च्या कामाच्या नावाखाली बंद ठेवण्यात आलेल्या आयआयटी मार्केटजवळील सिग्नलमुळे स्थानिक नागरिकांना जीवावर उदार होत रस्ता क्रॉस करावा लागत आहे. यामुळे या परिसरात अपघाताची शक्यता वाढली असून, लोकांच्या जीव गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. पाठीमागील काही महिन्यांपासून जोगेश्वरी विक्रोळी मार्गावरून जाणाऱ्या मेट्रो ६ […]
पवई शिल्पकार चषक २०२१’ क्रिकेट स्पर्धेचा उत्साह
रविराज शिंदे पवई युवा प्रतिष्ठानच्यावतीने स्व. मा. चित्तरंजन शर्मा यांच्या स्मरणार्थ ‘पवई शिल्पकार चषक २०२१’ या दोन दिवसीय क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. पवई आयआयटी मेनगेट येथील सिनेमा ग्राऊंडमध्ये भरवण्यात आलेल्या या सामन्यांमध्ये मुंबईभरातील अनेक संघ सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या क्रिकेट स्पर्धेत बेस्ट ऑफ नाईन टिम यांनी प्रथम पारितोषिक २५,००० रूपये सहीत […]
गलेरिया सर्कलला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव
पवई, हिरानंदानी गार्डन्स येथील गलेरिया सर्कल म्हणजेच काला खंबा चौकाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, सुदीप्तो लाहीरी, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, बिजेपी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. भारताचे माजी पंतप्रधान […]
प्रभावी पोलिसिंगसाठी पवईत मोहल्ला कमिटीची बैठक
प्रभावी पोलिसिंगसाठी आणि नागरी समस्या जाणून घेण्यासाठी २३ डिसेंबर रोजी पवई पोलीस ठाण्याच्या बीट क्रमांक ४ येथे मोहल्ला कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. परिमंडळ-१० पोलीस उपायुक्त महेश्वरी रेड्डी यांनी या बैठकीला संबोधित केले. प्रमुख सणांच्या काळात परिसरात शांतता राखण्यासाठी समित्यांच्या विशेष बैठका बोलावल्या जातात. बैठकीला परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी, प्रभारी वरिष्ठ पोलीस […]
पवईत भाजीच्या टेम्पोने शिक्षिकेला उडवले
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर एका भाजीच्या टेम्पोने शिक्षिकेला उडवल्याची घटना आयआयटी मेनगेटजवळ घडली आहे. या संदर्भात पोलिसांनी भादवि कलम २७९, ३३८ नुसार गुन्हा नोंद करत टेम्पो चालक विजय यादव याला अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा येथून भाजी भरून टेम्पो क्रमांक एमएच ४७ एएस ५०५१ हा पहाटे गोरेगाव येथे भाजी पोहचविण्यासाठी जात […]
मासातर्फे पवईत मासेमारी स्पर्धा
महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशन म्हणजेच मासा संस्थेतफे पवईत मासेमारी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या दरम्यान पवई तलाव येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मेंटोर आली हुसेन यांच्या स्मरणार्थ आयोजित या फिशिंग चम्पिअनशिप २०२१ स्पर्धेत पहिले बक्षीस रोख रक्कम १०००१, दुसरे बक्षीस ५००१ तर तिसरे बक्षीस […]

