मिलिंद विद्यालयाचे संचालक सदानंद रावराणे सर यांच्या संकल्पनेमधून मिलिंद विद्यालय आणि मिलिंद विद्यालय माजी विद्यार्थी संघटना, अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन यांच्या सहकार्याने पवईमध्ये भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
रविवार ११ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत हा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, पालक, पवईमधील नागरिक तसेच आपल्या सर्वांचे गरजू नातेवाईक, मित्रमंडळी यांना माहिती देऊन सहभाग घ्यावा. तसेच इतर गरजू व्यक्तींना या रोजगार मेळावाची माहिती द्यावी, असे आवाहन रावराणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी पुढील अर्जाच्या ( गुगल फॉर्म) लिंकवर जाऊन माहिती भरावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe8moRMbcx6mrgdOIEemepV3YI-fNm3Ma9R_THMY5olocEy-Q/viewform





No comments yet.